जर तुमचे बँकेत खाते असेल तर नक्कीच चेक बुक सुद्धा असेल. चेकवर तुमच्या खात्याचा क्रमांक दिलेला असतो. त्याव्यतिरिक्त काही क्रमांक सुद्धा लिहिलेले असतात. हे क्रमांक चार हिस्स्यात विभागलेले असतात. तु्मच्यापैकी बहुतांशजणांनी पाहिले असेल की पण नक्की ते कशासाठी आहेत या बद्दल कळले नसेल. खरंतर हे क्रमांक तुमच्या चेकला सुरक्षित ठेवतात. याच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यासंबंधितची माहिती मिळते. (Cheque number)
जर तुम्ही विचार करत असाल हे गरजेचे का आहे तर याच बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कारण अशा प्रकारची माहिती तुम्हाला स्मार्ट बनवू शकते. जसे MICR कोडने सुरु झालेले तीन अंक सोडल्यास पुढील तीन अंक त्या बँकेबद्दल अधिक माहिती देते, जो प्रत्येक बँकेचा एक युनिक कोड असतो.
चेकवरील लिहिलेल्या क्रमांकांचा अर्थ
चेकवर 23 क्रमांक विविध चार हिस्स्यात लिहिलेला असतो. या 23 मध्ये आधीपासून सहा डिजिट क्रमांक तुमचा चेक क्रमांक सांगतो. प्रत्येक चेकवर वेगवेगळा असतो. खरंतर एखाद्या चेकवर 000042 आहे तर पुढील चेकवर 000043 असेल. जर तुम्ही चेक एखाद्याला देत असाल तर किंवा घेत असाल तेव्हा चेक नंबर लिहून ठेवला पाहिजे. चेक हरवल्यास किंवा पैसे खात्यात जमा न झाल्यास तर तुम्ही या क्रमांकावरुन चेकचे स्टेटसची माहिती मिळवू शकता.
तर दुसऱ्या हिस्स्यात 9 क्रमांक लिहिलेले असतात. ते MICR कोड म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नाइजेशन असते. हे क्रमांक तीन वेगवेगळ्या हिस्स्यात विभागले जातात. यावरुन चेक जारी होणारे शहर, बँक आणि ब्रांन्च बद्दल कळते. हा एक प्रकारे तुमच्या बँक ब्रांन्च बद्दल सांगतो. या क्रमांकाला पाहून तुम्हाला कळू शकते की, कोणत्या शहरातून चेक आला आहे. पुढील तीन अंक बँकेचे युनीक कोड असतात. या कोडच्या माध्यमातून तुम्ही बँकेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. अखेरचे तीन डिजिट ब्रांन्च कोड असतात. प्रत्येक बँकेचा आपला एक वेगळा ब्रांन्च कोड असतो. हा कोड बँक संदर्भातील सर्व ट्रांजेक्शनमध्ये या कोडचा वापर केला जातो. (Cheque number)
हेही वाचा- चेकवर स्वाक्षरी करताना करु नका ‘या’ चुका
शेवटच्या सहा डिजिटचा अर्थ
तिसऱ्या हिस्स्यात छापलेल्या सहा डिजिटचा अर्थ असा होतो की, तुमचे खाते आरबीआय द्वारे मेनटेन केले जाते. जेव्हा चेक आरबीआय मध्ये प्रोसेसिंगसाठी जातो तेव्हा हा क्रमांक मदत करतो. अखेरचे दोन डिजिट ट्रांजेक्शन कोड असतात. यावरुन कळते की, चेक करंट अकाउंटचा आहे की, सेविंग्स अकाउंटचा.