दीर्घकाळापासून वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अत्यंत मेहनतीने उभारण्यात आलेल्या जम्मू-कश्मीर मध्ये जगातील सर्वाधिक मोठा रेल्वे पूलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. नुकतेच पुलाचा अखेरचा जोड लावण्यात आला. यावेळी कामगारांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाच पण अजादी का अमृतमोहत्सव ही साजरा केला. तर अर्ध चंद्रासारखा दिसणारा चिनाब ब्रिज हा जगातील सर्विध आर्च ब्रीज आहे. तो चिनाब नदीवर उभारला जात आहे. पुलाची उंची ही नदीच्या सपाटीपासून ३५९ मीटर उंच आहे. म्हणजेच कुतुबमीनार पेक्षा ही जवळजवळ पाचपट अधिक उंचीवर ट्रेन धावणार आहे. ऐवढेच नव्हे तर या पुलाची लांबी ही पॅरिस मधल एफिल टॉवरपेक्षा ही ३५ मीटर अधिक आहे.(Chenab Bridge)
चिनाब पुलाची उभारणी मुंबईतील दिग्गज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी AFCONS द्वारे केले जात आहे. नुकताच याचा ओवरआर्च डॅक लावण्याचे काम पूर्ण झाले. आता अशी अपेक्षा केली जात आहे की, हा पुल डिसेंबर पर्यंत रेल्वे या मार्गावरुन धावू शकते. ब्रिजची उभारणी कोंकण रेल्वे उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी जवळजवळ २८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १११ किमी लांब कटरा आणि बनिहार मार्गावर रेल्वे ब्रिज झाल्यास कश्मीर रेल्वेमार्गाच्या माध्यमातून देश जोडला जाणार आहे.

काय आहे खासियत?
जगातील सर्वाधिक उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौडी दरम्यान तयार करण्यात आला आहे. या पुलाची लांबी १.३१५ किमी असून त्याच्या आर्चचे एकूण वजन १०,६१९ मीट्रिक टन आहे. पुल्स १७ केबल्सवर उभारला आहे. याची खासियत अशी की, ना त्याला भुकंपाचे धक्के जाणवतील किंवा जोरदार हल्ल्यांचा सुद्धा त्यावर परिणाम होणार नाही आहे. ब्रिजवर जवळजवळ १०० किमीच्या वेगाने ट्रेन धावणार आहे. ती २६० किमीच्या वेगाने वाऱ्यांमध्ये सुद्धा अत्यंत सुरक्षितरित्या धावू शकते.
जगातील सर्वाधिक आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येणाऱ्या या ब्रिजवर जरी एखाद्या मिसाइलच्या माध्यमातून हल्ला केला तरीही त्याला काहीही होणार नाही. याच्या आर्चमध्ये स्टिलमध्ये जे बॉक्स आहेत आणि त्या पुलाला स्थिरता देण्यासाठी त्यामध्ये कॉक्रिट भरण्यात आले आहे.(Chenab Bridge)
हे देखील वाचा- ५५० वर्षांपूर्वीचा ममी, बसल्या जागीच भिक्षुने त्यागले होते प्राण
२००४ पासून सुरुय याचे काम
पुलाच्या उभारणीचे काम २००४ पासून सुरु झाले आहे. परंतु हा पूल २००९ पर्यंत बांधून पुर्ण होईल असा अंदाज लावला जात होता. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव काहीवेळेस प्रोजेक्टच्या साइटवर काम थांबवण्यात आले होते. पण आता लवकरच या मार्गावरुन रेल्वे धावणार आहे.
