चॅट जीपीटीने (ChatGPT) आपल्या हिंमतीच्या जोरावर संपूर्ण जगाला त्यांचे वेड लावले आहे. कोट्यावधींच्या संख्येने लोक आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित चॅटबॉटचा वापर करत आहेत. ही कंपनी मोठ्या प्रमाणात युजर्सचा डेटा मिळवते. पण डेटा प्रायव्हेसी बद्दल चॅटजीपीटी संदर्भात प्रश्न उपस्थितीत केले जातात. प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, एआय चॅटबॉट लोकांचा डेटा कशा प्रकारे वापरतो. तर तुम्ही सुद्धा OpenAI चा वापर करत असाल येथे जाणून घ्या चॅटजीपीटी तुमच्या डेटाचे नक्की काय करतात.
प्रत्येक एआय चॅटबपॉट प्रमाणे ओपन एआय युजर्सच्या डेटाचा वापर चॅटजीपीला उत्तम बनवण्यासाठी केला जातो. चॅटबॉटला उत्तम बनवण्यासाठी डेटाची गरज असते. युजर्सच्या डेटा व्यतिरिक्त वेब पेज, रेडिट पोस्ट, बुक, सोशल मीडिया साइट या सर्वांचा सुद्धा वापर केला जातो.
कंपनीने आणले प्रायव्हेसी कंट्रोल फिचर
खरंतर चॅटजीपीटी बद्दल बोलायचे झाल्यास ते तुमच्या डेटासोबत नक्की काय करतात हे आपण पाहिले.पण आता चॅटजीपीटीवर तुमच्या डेटासह काय करु शकता हे पाहूयात. ओपनएआयने चॅटजीपीटीसाठी काही फिचर्स लॉन्च केले आहेत. हे फिचर युजर्सला चॅटजीपीटी त्यांचा डेटा वापरु शकतात की नाही ठरवण्यास मदत करते.
चॅट हिस्ट्री होईल बंद
कंपनीने नवी प्रायव्हेसी कंट्रोल जारी केले आहे, जे चॅट हिस्ट्रीला बंद करण्याची परवानगी देईल. यामुळे ओपनएआय तुमच्या डेटाचा वापर चॅटजीपीटीच्या ट्रेनिंगसाठी करु शकत नाही. जर तुम्हाला चॅट हिस्ट्री बंद करायची असेल तर पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (ChatGPT)
-चॅटजीपीचीच्या Setting वर जा
-येथे Chat history % training ऑप्शन मिळेल
-या ऑप्शनच्या टॉगलला तुम्ही बंद करु शकता
-टॉगल बंद केल्यानंतर चॅट हिस्ट्री बंद होईल
दरम्यान, कंपनी चॅट हिस्ट्रीला ३० दिवसांपर्यंत स्टोर करुन ठेवू शकता. पण इटलीने नुकत्याच युजर डेटा संदर्भात चॅटजीपीटीला बॅन केले आहे. ओपनएआयच्या प्रायव्हेसीचे फिचर याच कारणास्तव काढले आहे.
हेही वाचा- तुमचा खासगी डेटा चोरी करु शकतो Ghost Token
दुसऱ्या बाजूला चॅटजीपीटीमुळे नोकरदार वर्ग ते शिक्षण क्षेत्रावर सखोल परिणाम होण्यची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच चॅट जीपीटी आपले नवे मॉडल GPT 4 ला मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. तर GPT-4 ही OpenAi ची चौथी आवृत्ती आहे. यामध्ये यूजर्सना प्रत्येक अवघड आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे ती जीपीटीकडेही उपलब्ध आहे. ओपनएआयचा स्पष्टपणे विश्वास आहे की जीपीटी-4 अनेक प्रकरणांमध्ये मानवी पातळीची कार्यक्षमता देते.