चॅरिटी बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या एक प्रकारच्या सामाजिक संघटना असतात ज्या गरजू लोकांना किंवा आपत्कालीन स्थितीत पीडितांना मदत करतात. ही मदत आर्थिक किंवा एखाद्या सामानाच्या माध्यमातून केली जाते. शासनाच्या प्रयत्नांव्यतिरिक्त काही लोकांची परिस्थिती अगदी दयनीय असते त्यांच्या मदतीसाठी चॅरिटी पुढे येते.परंतु गरजवंतांच्या मदतीखाली फसवणूकीचे प्रकार ही केले जातात.वाईट मानसवृत्ती असलेली लोक चॅरिटीच्या नावावर लोकांकडून पैसे जमा करतात आणि नंतर पळ काढतात. किंवा पैशांचा चुकीचा वापर करतात. आजकाल दान धर्माच्या नावाखाली सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. (Charity Fraud)
चॅरिटीच्या नावावर आजकाल फसवणूक करणे सामान्य झाले आहे. अशी काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये चॅरिटीच्या नावावर लोकांकडून पैसे वसूल केले जातात. त्याचा चुकीचा वापर केला जातो. अशातच तु्म्हाला आता आठवेल की, तुम्ही सुद्धा कधीतरी एखाद्या चॅरिटीसाठी पैसे दान दिले असतील.
खरंतर चॅरिटीच्या नावाखाली सामाजिक कार्यांसाठी तुमच्याकडून पैसे घेतले जातात. त्यामुळे लोक ही याकडे समाजकार्य म्हणून पैसे देतात. परंतु तुम्हाला नक्की माहिती असते का, खरंच हे पैसे गरजूंना पोहचणार आहेत का? चॅरिटीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीतील लोक त्यांच्या खासगी उद्देशांसाठी सुद्धा तुमच्याकडून पैसे वसूल करु शकतात. त्यामुळे एखाद्या चॅरिटीला पैसे दान करण्यापूर्वी त्यांच्या चॅरिटीचे नाव आणि त्या संबंधित वेरिफिकेशन जरुर करा.
चॅरिटीच्या नावाखाली पैसे वसूल करणारी लोक एका आपत्कालीन स्थितीची वाटच पाहत असतात. खरंतर आपत्कालीन स्थितीत पीडित लोकांना मदतीची गरज असते आणि तेव्हा चॅरिटी काम करते. लोकांकडून पीडित लोकांसाठी देणगी मागितली जाते. अशातच संधीसाधू लोक याचा गैरफायदा घेतात. पीडितांच्या मदतीसाठी मागितलेल्या देणगीचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या संस्थेला ऑनलाईन पद्धतीने देगणी देत असाल तरीही त्यांची वेबसाईटचे वेरिफिकेशन जरुर करा. (Charity Fraud)
हेही वाचा- खाद्यपदार्थांवरील Expiry Date नंतर खरंच पदार्थ खराब होतात का?
असे रहा सावध!
-कोणत्याही वेरिफिकेशनशिवाय अज्ञात क्रमांकावर किंवा खात्यावर पैसे पाठवू नका
-गुगलवर मिळालेल्या एखाद्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका
-नेहमीच शासकीय वेबसाइट किंवा डेटाबेस चॅरिटी संघटनांचे क्रेडेंशियल क्रॉस चेक करा
-ज्या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही देणगी देत आहात त्याचे ही वेरिफिकेशन करा, कारण बनावट वेबसाइट ही खऱ्या वेबसाइट सारखीच दिसू शकते
-तत्कालन देगणी मागण्या वेबसाइट्सपासून दूर रहा, कारण देणगीच्या नावाखाली तुमच्यावर ते भावनिक दबाव टाकू शकतात