Home » चारधाम यात्रेची सांगता….

चारधाम यात्रेची सांगता….

by Team Gajawaja
0 comment
Chardham Yatra
Share

उत्तराखंडची प्रसिद्ध चारधाम यात्रा (Chardham Yatra) यावर्षासाठी नोव्हेंबर महिन्यात थांबणार आहे.  उत्तराखंडमध्ये होणारी प्रचंड बर्फवृष्टी पहाता ही चारधाम यात्रा थांबवण्यात येते.  आता पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात पुन्हा ही पवित्र यात्रा चालू होईल.  मात्र ही यात्रा जेव्हा थांबते तेव्हा चारही मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात.  हा सगळा सोहळा पहाण्यासाठीही हजारो भाविक उपस्थित असतात.  याची सुरुवात गंगोत्री धामचे दरवाजे बंद करुन झाली.  त्यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे बंद झाले,  नंतर यमुनोत्री धामचे दरवाजे बंद झाले आणि सर्वात शेवटी  बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद केले जाणार आहेत.  यावर्षी ही चारधाम यात्रा सर्वाधिक भाविकांची ठरली आहे.  केदारनाथ मंदिरालाच सुमारे 15 लाख भाविकांनी भेट दिल्याची नोंद झाली आहे.  बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद होतांनाही तीन हजार भाविक उपस्थित होते.  भर बर्फवृष्टीत भाविकांची ही संख्याही जास्त असल्याचे सांगण्यात येते.  या चारधाम यात्रेसाठी (Chardham Yatra) केलेली सुविधा आणि वाहतुकीची साधने वाढल्यानं भाविकांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते.  

चारधाम यात्रा (Chardham Yatra) करणे हे प्रत्येक हिंदूधर्मीयांचे स्वप्न असते.  ही चारधाम यात्रा करण्यासाठी मात्र धार्मिकबळ जेवढे मोठे लागते, तेवढीच शारीरिक आणि मानसिक बळही लागते.  कारण अत्यंत कठीण अशी ही यात्रा मानली जाते.  ही यात्रा सुरु करण्याची जशी प्रक्रीया असते, तशीच ही यात्रा बंद होतांनाही मोठा धार्मिक विधी पार पाडला जातो.  हिवाळ्याची बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर धामांचे दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  त्याची सुरुवात गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यापासून झाली.  गंगोत्री धामचे दरवाजे त्यानंतर बंद करण्यात आले.  यमुनोत्री धाममध्येही भाऊबीजच्या दिवशी दरवाजे बंद करण्यात आले.  बद्रीनाथ धामचे दरवाजे सर्वात शेवटी म्हणजे 19 नोव्हेंबरला दुपारी 3.35 वाजता बंद होणार आहेत.  हा सर्व सोहळा बघण्यासाठी प्रत्येक धामवर हजारो भक्त उपस्थित असतात.  या मंदिरापर्यंत जाण्यासाठीचा सर्व मार्ग हिवाळ्यात होणा-या बर्फवृष्टीने झाकला जातो.  प्रवासातील दुर्गमता बघता ही मंदिरे बंद करुन बर्फ कमी झाल्यावर त्यांचे दरवाजे पुन्हा उघडण्यात येतात.  

चारधाम यात्रेच्या (Chardham Yatra) समारोपासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवाजे बंद करण्याच्या तारखा जाहीर केल्या जातात.  त्यासाठी मुहूर्तानुसार तारीख आणि वेळ निश्चित करण्याची परंपरा आहे. त्याआधारे नियोजित तारखेला चार घमांचे दरवाजे बंद करण्याची तयारी सुरू होते.  प्रथम गंगोत्री धाममधील दरवाजे बंद करून पूजा करण्यात येते. गोवर्धन पूजेनंतर, हे दरवाजे बंद होतात.  त्यानंतर भाऊबिजेच्या दिवशी यमुनोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात आले.  यासोबत येथील श्री हेमकुंड साहिब आणि लक्ष्मण मंदिराचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत.  यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे बंद करण्यात आले.  दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथ धामला भेट देऊन पूजा केली.  त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.  

उत्तराखंडच्या उच्च गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या जगप्रसिद्ध केदारनाथ धामचे दरवाजे भाऊबिजेच्या दिवशी भाविकांसाठी बंद करण्यात आले. यावेळी  मराठा रेजिमेंट ऑफ आर्मीच्या बँडने धुन सादर केली.  हा सगळा सोहळा बघण्यासाठी तीन हजाराहून अधिक भक्त उपस्थित होते.  त्यांनी  ‘बम बम भोले’ चा जयजयकार केला आणि बाबा केदारनाथ यांना उखीमठमध्ये विराजमान करण्यात येईल.  तिथे जाऊन भाविक बाबा केदारनाथचे दर्शन घेऊ शकतात.  पारंपारिक आर्मी बँडसह बाबा केदारनाथ यांची डोली रवाना झाली आहे.  ही डोली (Chardham Yatra)आता दुस-या दिवशी  उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात जाणार आणि तिथे बाबा केदारनाथ यांचा मुक्काम असणार आहे.  या चारधामयात्रेतील चौथो स्थान म्हणजे बद्रीनाथ धामचे दरवाजे 19 नोव्हेंबरला बंद होणार आहेत. विजयादशमीच्या दिवशी धामचे दरवाजे बंद करण्याची तारीख जाहीर करण्यात आली. 15 नोव्हेंबरला पंचपूजेने बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या दिवशी संध्याकाळी श्री गणेशाचे दरवाजे बंद केले जातील. आदि केदारेश्वर मंदिराचे दरवाजे 16 नोव्हेंबरला बंद होणार आहेत. 17 नोव्हेंबर रोजी खड्ग ग्रंथाचे पूजन व वेद पठण बंद राहणार आहे.  18 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मातेला कढई भोग अर्पण करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी श्री उद्धवजी आणि भगवान कुबेर यांना मंदिराच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. रावळजींच्या स्त्रीच्या वेशात श्री बद्री विशालाजवळ माता लक्ष्मीची प्रतिष्ठापना केली जाईल. बद्रीनाथ धामचे दरवाजे 19 नोव्हेंबरला दुपारी 3.35 वाजता बंद होतील.

========

हे देखील वाचा : मानवाने आगीवर नियंत्रण मिळवणे कधी शिकले होते?

=======

3 मे 2022 पासून चार धाम यात्रेला सुरुवात झाली.  या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडून चार धाम यात्रेला सुरुवात झाली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. त्याचवेळी गंगोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 6 मे रोजी उघडण्यात आले.  हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चारधामचे दरवाजे भाविकांसाठी बंद केले जातात. त्यानंतर आणि पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये पुन्हा उघडले जातात. गढवाल प्रदेशाचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. या वर्षी सहा महिन्यांच्या प्रवासाच्या हंगामात 43 लाखांहून अधिक यात्रेकरू चारधामला पोहोचले. केदारनाथमध्ये 15,61,882 भाविकांनी बाबांच्या चरणी नतमस्तक झाले.  आता भाविकांना आता पुढच्या वर्षीच्या चारधाम यात्रेचे वेध लागले आहेत.  स्थानिक प्रशासनही पुढच्यावर्षी यापेक्षाही अधिक सुविधा देण्यासाठी काय काय करता येईल याची योजना आखत आहे.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.