Home » Char Dham 2025 : या तारखांना होणार चारधाम यात्रेचा समारोप

Char Dham 2025 : या तारखांना होणार चारधाम यात्रेचा समारोप

by Team Gajawaja
0 comment
Char Dham 2025
Share

अक्षय तृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आणि हिंदू धर्मात सर्वात पवित्र असलेली चार धाम यात्रा सुरू झाली.  हिंदू धर्मातील या पवित्र यात्रेमध्ये भारताच्या चारही दिशांना असलेल्या गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र तीर्थस्थळांना भेट दिली जाते.  भारतातील ही धार्मिक तीर्थयात्रांची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. चारधाम यात्रा केवळ तीर्थयात्रा नाही तर श्रद्धा, आत्मशुद्धी आणि मोक्षाचा मार्ग म्हणूनही ओळखली जाते. मात्र यावर्षी या यात्रेमध्ये यात्रेकरुंची अधिक परीक्षा घेतली गेली. हवामानाचा सर्वात मोठा फटका या चारधाम यात्रेला बसला. (Char Dham 2025)

उत्तराखंडमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक ढगफुटीच्या आणि भूस्खलनच्या घटना झाल्या.  यामुळे येथील रस्ते गायब झाले आहेत.  ढगफुटीमुळे आलेल्या पाण्याच्या आणि मातीच्या लोंढ्यांमुळे नद्यांवरील पूलही तुटले आहेत.  या सर्वांचा सर्वात मोठा फटका चारधाम यात्रेला बसला.  काही दिवस या यात्रेला एकही यात्रेकरुला जाता आले नाही.  मात्र हे वातावरण निवळल्यावर आता चारधाम यात्रा सुरुळीत सुरु झाली आहे. सोबतच हा चारधाम यात्रा कधी संपणार याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्यामुळे आता अखेरच्या काही दिवसात मोठ्या संख्येनं यात्रेकरु या चारधाम यात्रेला येतील अशी अपेक्षा आहे.  

Char Dham 2025

उत्तराखंडमधील चार धाम मंदिराची यात्रा ही सर्वात पवित्र मानली जाते. या चारधामयात्रेच्या हिवाळ्यातील बंद होण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विजयादशमी आणि भाऊबीजेच्या शुभ प्रसंगी चार धाम मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. चार धाम यात्रा ही उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र स्थळांमध्ये होते. 22 ऑक्टोबर, बुधवार रोजी गोवर्धन पूजा आणि अन्नकूटच्या शुभ दिवशी गंगोत्री धामचे दरवाजे बंद होणार आहेत. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.36 वाजता हिवाळ्यासाठी गंगोत्री धामचे दरवाजे बंद होतील. (Char Dham 2025)

त्यानंतर,  मुखबा गावात माता गंगेचे दर्शन घेता येणार आहे. गंगोत्री धाम हे पवित्र गंगा नदीचे उगमस्थान मानले जाते. गंगोत्री धाममध्ये होत असलेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात धामचे दरवाजे भाविकांसाठी बंद होतात.  त्यापाठोपाठ यमुनोत्री धामचे दरवाजे गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर बंद होतील.  त्यानंतर, पुढील सहा महिने, देवी यमुना मातेचे दर्शन खरसाली या हिवाळी निवासस्थान असलेल्या गावात होईल.  यमुनोत्री धाम हे यमुना नदीचे उगमस्थान आहे. आई यमुनाला समर्पित या मंदिरात पूजा केली जाते.  याचदिवशी केदारनाथ धामचे दरवाजेही बंद करण्यात येणार आहेत.  23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे बंद होतील. 

त्यानंतर केदारनाथ बाबांची डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात नेण्यात येईल.  तिथे भाविकांना केदारनाथ बाबांचे दर्शन घेता येईल.  मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.56 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.  केदारनाथ धामचे दरवाजे बंद होण्यापूर्वी 21 नोव्हेंबर रोजी पंच पूजा सुरू होतील आणि 26 नोव्हेंबरपासून ज्योतिर्मठ येथील नृसिंह मंदिरातून दर्शन दिले जाईल.  बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूंना समर्पित मंदिर आहे.  बद्रीनाथ हे चार मंदिरांपैकी शेवटचे आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते.  हिवाळ्यात हा सर्व परिसर पांढरी चादर घातल्यासारखा झालेला असतो. (Char Dham 2025)

================

हे देखील वाचा : Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

=================

2025 ची ही चारधाम यात्रा भाविकांच्या संख्येमुळे उल्लेखनीय ठरली तशीच या मार्गावर झालेल्या सर्वाधिक पावसामुळेही यात्रा प्रभावित झाली.  2025 च्या चारधाम यात्रेसाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत 2.2 दशलक्षाहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.  जून 2025 च्या अखेरीस 2.1 दशलक्षाहून अधिक यात्रेकरूंनी चारधाम यात्रा केली आहे.   यावर्षी चार धाम यात्रेच्या पहिल्या चार महिन्यांत हवामान बदलामुळे मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यासारख्या आपत्ती आल्या.  याचा फटका यात्रामार्गाला बसल्यामुळे 55 दिवस एकही यात्रेकरू चार धामांपर्यंत पोहोचू शकला नाही.  चारधाम यात्रेमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा नैसर्गिक अडथळा आला.  यात काही यात्रेकरुंची मृत्यूही झाला आहे.  मात्र आता वातावरण निवळल्यानंतर पुन्हा चारधामकडे जाणा-या यात्रेकरुंचा ओघ वाढला आहे.  चारधाम यात्राचा समारोप कधी होणार हे जाहीर झाल्यामुळे अधिक भाविक या यात्रेला गर्दी करणार आहेत.  

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.