मेक्सिकोच्या अल्टिप्लानो या सर्वात कडक तुरुंगात, जिथे प्रत्येक हालचाल सीसीटीव्हीच्या तीक्ष्ण नजरेत कैद होते, तिथे एक माणूस कैद आहे—जो कोण सामान्य कैदी नाही, तर जगातील सर्वात कुख्यात ड्रग माफिया, “एल चापो” आहे. त्याच्या जेलमध्ये खिडक्या नाहीत फक्त एका कोपऱ्यात छोटासा शॉवर एरिया. 24 तास कॅमेरे त्याच्यावर नजर ठेवतात, प्रत्येक सावली आणि हालचाल टिपली जाते. पण तरीही, हा माणूस या जेलमधून गायब होतो. अर्ध्या तासानंतर जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय येतो तेव्हा ते त्या जेलमध्ये जातात, पण तोपर्यंत पण जगातील सर्वात मोठा ड्रग तस्कर गायब झालेला असतो. तो कसा या जेलमधून पळाला हे जाणून घेऊ. (El Chapo)
जोआकिन गुजमानचे वडील छोटे मोठे ड्रग डीलर होते. त्यांचाच वारसा चालवत जोआकिन गुजमान पण ड्रग डीलर बनला पण तेव्हा त्याला लहान वयातच घरातून हाकलून दिलं. त्याच्याकडे रोजगार नव्हता आणि शोधूनही जेव्हा त्याला काम मिळालं नाही तेव्हा त्याने वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकलं. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने स्वतः ड्रग्स उगवायला सुरुवात केली. तो एखादा सुनसान भाग निवडायचा आणि तिथे गांजा उगवायचा. मग हळूहळू त्याचा धंदा इतका वाढला की मेक्सिकोचे मोठमोठे ड्रग डीलर त्याला आपल्या गँगमध्ये घ्यायला उत्सुक झाले.(Top Stories)
तेव्हाच त्याने स्वत:ला नाव दिलं एल चापो म्हणजे ‘छोटा’, कारण त्याची उंची फक्त 5 फूट 6 इंच होती. १९७० च्या दशकात एल चापोने वेगवेगळ्या ड्रग्स गॅंग जॉइन केल्या. लहान वयातच या धंद्यात उतरल्यामुळे तो Danger झाला होता. जर एखादी डिलिव्हरी उशिरा झाली किंवा जरा जरी चूक झाली, तर तो समोरच्या माणसाला थेट संपवायचा! पुढे 1989 मध्ये एल चापोने स्वतःची गँग बनवली – सिनालोआ कार्टेल! (El Chapo)
तो अमेरिकेत ड्रग्स एक्सपोर्ट करायचा पण अमेरिकेत ड्रग्स पाठवणं सोपं नव्हतं, पण ते इतरांसाठी एल चापोसाठी हे काम म्हणजे एक खेळ होतं. त्याची चतुराई अशी होती की, त्याने तस्करीला कला बनवलं होतं. सुरुवातीच्या काळात, ज्या ड्रग्सचा वास कमी यायचा, जसं की कोकेन, त्याला तो अग्निशामक यंत्रं, मिरचीच्या कॅन किंवा कारच्या रिम्समध्ये लपवायचा. ज्याला ड्रग शोधणारे कुत्रेही ओळखू शकत नव्हते. पण समस्या अशी होती की कोकेनशिवाय इतर ड्रग्स या पद्धतीने तस्करी करता येत नव्हत्या. म्हणून त्याने ड्रग्स Smuggling साठी Advance आणि तेवढीच जुनी टेक्निक वापरली, जी त्याची नंतर ओळख बनली ती टेक्निक म्हणजे जमिनी खालून बोगदे. तो लाखो डॉलर्स खर्च करून एक्स्पर्ट्सकडून जमिनीखाली असे बोगदे बनवायचा, ज्यामध्ये लाईट्स, व्हेंटिलेशन, अगदी रेल्वे सिस्टीमसुद्धा होत्या! (Top Stories)
वीज आणि हवेशीरपणाची संपूर्ण व्यवस्था असायची. या बोगद्यांद्वारे तो अमेरिकेत ड्रग्स तस्करी करायला लागला. 1990 मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे अधिकारी थक्क झाले जेव्हा त्यांना एल चापोचा पहिला बोगदा सापडला. तो बोगदा 300 फूट लांब होता आणि त्यात ही संपूर्ण व्यवस्था होती. हा बोगदा एका घरात उघडत होता, जो एल चापोचं सुरक्षित ठिकाण होतं. म्हणूनच Emergnecy च्या वेळी तो या बोगद्याद्वारे पळून जाऊ शकायचा. एल चापोला या धंद्याचे सगळे नियम माहीत होते, म्हणूनच लाख प्रयत्न करूनही तो पकडला जात नव्हता. त्याने तयार केलेल्या बोगद्यात रेल सिस्टीम होती, ज्याने ड्रग्स आणि कन्स्ट्रक्शनचं मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं जायचं. या बोगद्यांची खासियत अशी होती की ते इतके खोल खणलेले होते की ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार मशीनही त्यांना शोधू शकत नव्हत्या. आणि बोगद्यांचे प्रवेशद्वार तो इतक्या चालाकीने लपवले जायचे जसं की बाथरूमच्या टबखाली, टॉयलेटखाली की कोणालाच शंका यायची नाही! (El Chapo)
एवढं असून सुद्धा 1993 मध्ये मेक्सिकन अधिकाऱ्यांनी शेवटी एल चापोला पकडलं आणि त्याला 20 वर्ष जेल ही शिक्षा ठोठावली. पण हे सुद्धा त्याच्यासाठी त्याचं ऑफिस बनलं. तो तिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाच देऊन सगळ्या सुखसोयी मिळवायचा – फोन, मीटिंग्स, अगदी बाहेरच्या लोकांशी संपर्कसुद्धा! त्याचा धंदा जेलमधूनही चालू होता. 2001 मध्ये मेक्सिकोच्या सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतला, ज्यामुळे अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यान कैद्यांचं हस्तांतरण सोपं झालं. एल चापोला माहित होतं की अमेरिकेत गेलं तर तिथून पळणं अशक्य आहे. म्हणूनच एल चापोने पहिल्यांदा मेक्सिकोच्या जेलमधून पळून जाण्याचा कट रचला. त्याने जेल गार्ड्सना 2 लाख डॉलर्सची लाच दिली आणि कपड्यांच्या टोपलीत बसून तो तिथून पळाला. (Top Stories)
पुढची 13 वर्षे तो बिनधास्त फिरत राहिला. त्याने आपलं सिनालोआ कार्टेल आणखी मजबूत केलं. आपल्या बोगद्यांद्वारे ड्रग तस्करी आणि इतर गुन्ह्यांमुळे अमेरिका आणि मेक्सिकोच्या सरकारच्या नाकीनऊ आणलं, पण पकडला गेला नाही. पण 2014 मध्ये मेक्सिकन अथॉरिटीजना त्याची अचूक लोकेशन मिळाली आणि त्याला पुन्हा पकडलं गेलं. यावेळी त्याला मेक्सिकोच्या सगळ्यात सिक्योर जेलमध्ये, अल्टिप्लानो मॅक्सिमम सिक्योरिटी प्रिझनमध्ये टाकलं गेलं. इथे त्याच्यावर 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जायची. (El Chapo)
===============
हे देखील वाचा : Area-51 : अखेर तो दिवस येणार एलियनसोबत युद्ध होणार…
===============
त्याच्या सेलमध्ये खिडकी नव्हती, फक्त एक शॉवर एरिया होता. 11 जुलै 2015 रोजी, जेव्हा तो आपल्या सेलमध्ये फिरत होता, तेव्हा रात्री 8:50 वाजता त्याला शेवटचं शॉवर एरियाजवळ पाहिलं गेलं. त्याच्या सेलमध्ये फक्त शॉवर एरिया हाच भाग होता जो कॅमेऱ्याच्या नजरेपासून लपलेला होता. सुमारे अर्ध्या तासानंतर जेव्हा तो कॅमेऱ्यावर दिसला नाही, तेव्हा सेल तपासण्यासाठी लॉकअप उघडलं गेलं. जोपर्यंत गार्ड्स आत गेले, तोपर्यंत एल चापो गायब झाला होता. तो धंद्यात ज्यासाठी फेमस होता त्याचाच वापर करून तो तिथून पळाला होता. त्याने मोठ्या चतुराईने शॉवर एरियातील गटार मोठं करून एक बोगदा खणला, जो खाली एका मोठ्या बोगद्याशी जोडला गेला होता. हा बोगदा 1 किलोमीटर दूर एका जवळच्या बांधकाम साइटपर्यंत उघडत होता. जमिनीपासून 33 फूट खाली आणि 5 फूट 7 इंच रुंद हा बोगदा इतका मोठा होता की त्यातून सहज माणूस जाऊ शकत होता. (El Chapo)
पण यावेळी त्याची सुटका जास्त काळ टिकली नाही. 8 जानेवारी 2016 रोजी मेक्सिकन मरीन्सनी लॉस मोचिस इथल्या त्याच्या सेफ हाऊसवर हल्ला केला आणि त्याला पुन्हा पकडलं. यावेळी अमेरिकन सरकारने कोणताही रिस्क घेतली नाही. 2017 मध्ये मेक्सिकोने त्याला अमेरिकेला सोपवलं, आणि आता तो कोलोराडोच्या सुपरमॅक्स जेलमध्ये, जिथे जगातले सगळ्यात खतरनाक गुन्हेगार ठेवले जातात, तिथे तो आजीवन कारावास भोगतोय. पण खरं सांगायचं, कितीही सुरक्षितता असली, तरी अमेरिकन सरकारला नेहमीच ही भीती आहे की कदाचित एल चापो पुन्हा पळून जाईल.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics