सप्टेंबर २०१९ चा पहिला आठवडा होता, भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान-2 च्या अभियानातील विक्रम लँन्डरवर होते. जे अभियानाच्या ऑर्बिटरला मागे सोडल्यानंतर प्रज्ञान रोवर संदर्भात चंद्रासंदर्भात एक इतिहास रचला जाणार होता. मात्र ६ सप्टेंबर २०१९ रोजी इतिहास होता होता राहिला. भारत त्या तीन देशांच्या लिस्टमध्ये सामील होणार होता ज्यामध्ये चंद्रावर यशस्वी लँन्डिग करण्यात आले होते. याच सूचीत आज सुद्धा तीन देश आहेत. मात्र भारताने पुन्हा एकदा चंद्रयान-3 च्या माध्यमातून तो प्रयत्न केला आहे. यावेळी चंद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून इस्रोकडून हा दुसरा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु सॉफ्ट लँन्डिंगची चर्चा अधिक केली जात आहे. तर जाणून घेऊयात सॉफ्ट लँन्डिंग म्हणजे नक्की काय? (Chandrayaan-3)
या मोहिमेत सॉफ्ट लँन्डिंगची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. कारण चंद्रयान-3 हे चंद्रयान- 2 पेक्षा फार वेगळे नाही. चंद्रयान-2 मोहिम पूर्णपणे अयशस्वी झालेले नव्हते. केवळ सॉफ्ट लँन्डिंगचा हिस्सा होता जो अयशस्वी झाला होता. त्या मोहिमेत प्रक्षेपित करण्यात आलेला ऑर्बिटर यशस्वीपणे काम करत आहे आणि तेव्हा रोवर, लँन्डर आणि ऑर्बिटर अशा तिघांचे प्रक्षेपण सुद्धा यशस्वीपणे झाले.
आता पर्यंत जगभरात आणि मीडियात सुद्धा चंद्रयान-3 बद्दल अधिक चर्चा केली जात नाही आहे, जेवढी त्याच्या लँन्डिंग बद्दल केली जात आहे. कारण अशा प्रकारच्या मोहिमेत सर्वाधिक कठीण हिस्सा लँन्डिंगचा असतो.
खरंतर सॉफ्ट लँन्डिंग म्हणजे कोणतेही अंतराळयान चंद्राच्या किंवा अन्य ग्रहावर यशस्वीपणे उतरण्याची ती प्रक्रिया आहे ज्या दरम्यान यान किंवा त्याच्या कोणत्याही भागाला कोणत्याही प्रकारचे नुकसन पोहचू नये. तर हार्ड लँन्डिंग आणि क्रॅश मध्ये फरक असा असतो की, हार्ड लँन्डिंगमध्ये पृष्ठभागावर उतरणाऱ्या यानाला काही नुकसान पोहचू शकते. दोन अंतराळ मोहिनेच्या संदर्भात खुप नुकसानीचे कारण ठरु शकतो आणि यामध्ये यानासह पाठवण्यात आलेल्या उपकरणांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते. (Chandrayaan-3)
तर चंद्रयान-2 ची लँन्डिंग वास्तवात अनपेक्षित रुपात सॉफ्ट लँन्डिंगवरुन हार्ड लँन्डिंग झाली होती. तसेच लँन्डर सोबतचा त्याचा संपर्क तुटला गेला होता. परंतु चंद्रयान-3 चे काम केवळ विक्रम लँन्डरची लँन्डिंग करुन प्रज्ञान रोवरला सहजतेने सक्रिय करण्याचे आहे. म्हणजेच अभियानाचे यश किंवा अपयश हे पुढील 42 दिवसांत निश्चित होऊ शकते. मात्र जर या अभियाना दरम्यान कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर त्यामुळे रोवरला थेट नुकसान पोहचू शकते.
परंतु इस्रोने चंद्रयान-2 च्या अयशस्वी लँन्डिंमधून काही गोष्टी लक्षात घेत फेलियर बेस्ड डिझाइन केले आहे. त्यामुळे अपयशाची शक्यता फार कमी होणार आहे. ऐवढेच नव्हे तर लँन्डिंग दरम्यान चंद्रयान-3 ची उपकरणे लँन्डिंगच्या प्रक्रियेची संपूर्ण फोटो मिळवत इस्रोला पाठवणार आहेत.
चंद्रावर लँन्डिंग करताना चंद्रयान-3 चे तीन प्रमुख हिस्से असणार आहेत. एक म्हणजे लँन्डर मॉड्युल, प्रपल्शन मॉड्युल आणि एक रोवर. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या लँन्डिंग साइटमध्ये सुद्धा विस्तार करण्यात आला आहे. आता 500 मीटर X 500 मीटरच्या क्षेत्राच्या ठिकाणी विक्रमजवळ उतरण्यासाठी 2.5 किमी X 2.5 किमीची जागा असणार आहे. चंद्राशिवाय वातावरणाच्या परिस्थितीनुसार लँडरची खास रचना करण्यात आली आहे.(Chandrayaan-3)
हेही वाचा- मून मिशन करण्यामागील उद्देश काय?
गेल्या वेळी चंद्रयान-2 च्या लँन्डिंगवेळी विक्रिम लँन्डरने येथील जमीनीचे फोटो घेतले होते. यामुळे सुद्धा वैज्ञानिकांना आपले सॉफ्ट लँन्डिंग नियोजित करण्यासाठी मदत मिळाली आहे. त्यांना हे कळले आहे की, लँन्डरला कुठे क्रेटर आणि दगडाचे तुकडे मिळू शकतात. जमीनीचे फोटो घेऊन लँन्डर स्वत:जुन्या फोटोंशी तुलना करुन लँन्डिंगसाठी निर्णय घेईल. एकूणच यावेळी इस्रोचे वैज्ञानिक उत्तमरित्या तयारीत आहे.