Home » Chandragrahan : चंद्रग्रहण ‘या’ राशींसाठी शुभ, तर ‘या’ राशींसाठी अशुभ

Chandragrahan : चंद्रग्रहण ‘या’ राशींसाठी शुभ, तर ‘या’ राशींसाठी अशुभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chandragrahan
Share

आज ७ सप्टेंबर रविवारी रोजी या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होऊन पहाटे १:२६ वाजता समाप्त होईल. विशेष म्हणजे, हे चंद्रग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्यामुळे त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अधिक वाढले आहे. ग्रहण काळात चंद्र पूर्णपणे झाकला जाईल. ज्योतिषशास्त्राच्या माहितीप्रमाणे हे ग्रहण खूपच महत्त्वाचे समजले जात आहे. कारण या चंद्रग्रहणाच्या काळात ग्रहांची स्थिती आगळी वेगळी असणार आहे.

सूर्य आणि केतू सिंह राशीत एकत्र असतील. तर राहू आणि चंद्र कुंभ राशीत एकत्र येणार आहेत. राहू आणि चंद्र एकत्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. त्याचप्रमाणे सूर्य आणि केतूच्या युतीमुळे सुद्धा ग्रहण योग तयार होत आहे. जेव्हा जेव्हा कोणतेही ग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या बारा राशींवर दिसून येतो. कोणते ग्रहण काही राशींसाठी चांगले तर काही राशींसाठी वाईट समजले जाते. आज होणारे चंद्रग्रहण हे कोणत्या राशींसाठी कसे असणार आहे जाणून घेऊया. (Chandragrahan News)

कर्क
हे ग्रहण या राशीच्या लोकांसाठी मिश्रित असणार आहे. कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र असल्यामुळे चंद्रग्रहणाचा थेट परिणाम या राशीवर दिसेल. मानसिक ताण, अस्वस्थता आणि चिंता वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक शंका निर्माण होऊन नातेसंबंधात गोंधळ वाढू शकतो. कौटुंबिक वातावरण बिघडू शकते, तर आरोग्याबाबतची निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो. या राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे चंद्रग्रहण संपल्यावर या राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तू तांदूळ, साखर, दही, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई आदी दान करायला हव्यात. (Marathi News)

सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फारसे फायदेशीर ठरणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की या काळात तुम्हाला वैवाहिक जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पाहिले तर तुमचे वैवाहिक जीवन ग्रहणग्रस्त होऊ शकते. चंद्रग्रहण संपल्यावर सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. तुम्ही पिवळी फळे, पिवळी डाळ आणि पिवळे कपडे दान करू शकता. (Todays Marathi Headline)

Chandragrahan

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा प्रभाव अशुभ आहे. या काळात तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते. चंद्रग्रहणानंतर काळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता. गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळी उडीद डाळ, काळी छत्री, काळे तीळ. (Latest Marathi News)

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ नाहीये. ग्रहणासोबतच अपघात होण्याची शक्यता आहे आणि काही शारीरिक वेदना देखील उद्भवू शकतात. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे कपडे, काळे बूट इत्यादी नक्की दान करा. (Top Marathi Headline)

मीन
या राशीसाठी चंद्रग्रहण बाराव्या घरात होत असल्याने खर्च, नुकसान होऊ शकते. अनियंत्रित खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. झोपेची कमतरता, थकवा आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण संपल्यावर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. गरीब किंवा गरजूंना पिवळी फळे, पिवळे कपडे, पिवळी डाळ इत्यादी दान करा. (Top stories)

मेष रास
७ आणि ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री होणारे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अधिक फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक गोष्टीत अधिक फायदा होईल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रगती कराल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. चंद्रग्रहण संपल्यानंतर या लोकांनी चंद्रग्रहण संपल्यावर मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात. तुम्ही गरीब किंवा गरजूंना लाल रंगाचे कपडे, मसूर डाळ, चणे, गूळ इत्यादी दान करा. (Top Marathi News)

कन्या रास
चंद्रग्रहण कन्या राशीच्या लोकांना खूप शुभ राहणार आहे. या राशीच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रहण सहाव्या घरामध्ये होणार आहे. या काळात आरोग्य उत्तम राहील तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतात. कर्ज असेल तर तुम्ही कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. चंद्रग्रहण संपल्यावर तुम्ही हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. जसे की, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या, हिरवी डाळ इत्यादी. तसेच, गायीला हिरवा चारा खाऊ घालणे. (Latest Marathi Headline) 

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप फायदेशीर राहणार आहे. या राशींच्या लोकांचे दीर्घकाळापासून अडकलेले काम वेळेवर पूर्ण होईल. तसेच कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. या काळात तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना पुढे जाण्यासाठी सुवर्णसंधी मिळतील. चंद्रग्रहण संपल्यावर वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे, फळे, डाळ इत्यादी दान करायला हव्यात. या वस्तूंचे दान तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन करू शकता. (Top Trending News)

=========

ChandraGrahan : २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे?

Chandrgrahan : चंद्रग्रहणात गरोदर स्त्रियांनी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

=========

धनु रास
चंद्रग्रहणाचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. या काळात आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल. तसेच आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिकांना लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी योग्य संधी मिळतील. पुढे जाण्यासाठी योग्य संधी मिळतील. प्रत्येक कामामध्ये सदस्यांचे सहकार्य मिळेल. राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे पिवळी डाळ, पिवळे कपडे आणि पिवळी फळे दान करणे लाभदायक ठरेल. (Social News)

(टीपः ही केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.