आपल्याकडे चंद्र आणि सूर्य ग्रहणाला खुप महत्वाचे मानले जाते. ५ मे रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी मागे आपल्या सावलीत येतो तेव्हा या खगोलीय स्थितीला चंद्रग्रहणाला म्हणतात.हे तेव्हाच घडू शकते जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या क्रमाने जवळजवळ सरळ रेषेत स्थित असतील. वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण छायाग्रहण असेल. यापूर्वी 20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले होते. तसेच येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात २ ग्रहणे होणार आहेत. यापैकी एक सूर्यग्रहण असेल आणि एक चंद्रग्रहण असेल. 5 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला खूप महत्वाचे मानले जाते कारण चंद्राला मनाचा घटक म्हटले जाते. सूतक कालावधी चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी होतो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण भारतात चंद्रग्रहण दिसणार की नाही आणि सूतक काळ किती काळ टिकेल, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे.आजच्या लेखात जाणून घेऊयात चंद्र ग्रहणाबद्दल सर्व माहिती.(Chandra Grahan 2023)
कधी होते चंद्रग्रहण?
अंतराळात जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तीन खगोलीय पिंड एका रेषेत येतात, तेव्हा ग्रहण होते. जेव्हा एखादा ग्रह किंवा चंद्र दुसर्या खगोलीय पिंडाच्या सावलीतून जातो तेव्हा ग्रहण होते. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते. त्याचवेळी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जातो, तेव्हा अंधार पडतो. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. पूर्ण चंद्रग्रहण, अर्धवट चंद्रग्रहण आणि छाया चंद्रग्रहण असे तीन प्रकारचे चंद्रग्रहण असतात.५ मे रोजी होणारे चंद्रग्रहण हे छायाग्रहण आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या पातळ आणि बाह्य प्रदेशातून जातो तेव्हा ग्रहण होते.
चंद्रग्रहणाची वेळ काय?
2023 सालचे पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे 2023 रोजी होणार आहे, जे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 1 वाजून 2 मिनिटांनी संपेल. हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 18 मिनिटे चालणार आहे.
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
भारतातील हे पहिलं चंद्रग्रहण दिसणार नाही. हे फक्त आशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय युरोपच्या काही भागांमध्ये दिसून येते. त्यामुळे भारतातील लोकांनी चंद्रग्रहणाबाबत घाबरून जाण्याची गरज नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार सूतक काळ फक्त तेथेच वैध असतो जिथे ग्रहण दिसते. आणि भारतात हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, तेव्हा सुतक काळही वैध ठरणार नाही. मात्र तरीही जर काळजी घ्यायची असेल तर काय घेता येईल ते जाणून घेऊयात.सूतक काळ चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी होतो आणि ग्रहण संपल्यानंतर संपतो. जिथे सूतक काळ वैध आहे, तेथे लोकांना काही खबरदारी घेण्याचा विशेष सल्ला दिला जातो. कारण ग्रहणातून येणाऱ्या नकारात्मकतेचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. विशेषत: गरोदर महिलांनी ग्रहणकाळात विशेष खबरदारी घ्यावी.(Chandra Grahan 2023)
================================
हे देखील वाचा: देवघरात चुकूनही ठेऊ नका ‘या’ गोष्टी; जाणून घ्या घरातील मंदिराचे महत्वाचे नियम
================================
सूतक कालावधीत पूजा, शुभ कार्य करत नाहीत. मंदिरांचे दरवाजे ही या दरम्यान बंद केले जातात. काया काळात खाण्या-पिण्यास ही मनाई असते . ग्रहणाचा नकारात्मक परिणाम अन्नावर होऊ नये म्हणून शिजवलेले अन्न, पाणी, दूध, फळे आणि भाज्या इत्यादींमध्ये तुळशीची पाने घातली जातात. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करूनच अन्न खाल्ले जाते. त्याचबरोबर ग्रहणाच्या वेळी निघणाऱ्या हानिकारक लहरींचा गरोदर महिला आणि तिच्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी ग्रहणकाळात गरोदर महिलांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.