दररोज महिला वर्गाला पडणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेवायला काय बनवावे? रोज घरातील महिला कायम आपल्या कुटुंबातील सदस्यांना आज जेवणात काय बनवू? हा प्रश्न विचारत असतात. ‘आज काय बनवू’ हा जागतिक प्रश्न जाहीर करावा अशीच प्रत्येक स्त्रीची इच्छा असावी. दररोज सकाळ, संध्याकाळ काय बनवावे हा प्रश्न या जगातील प्रत्येक महिलेसमोर आ विसरून उभा असतो. अनेकदा महिला आठवड्याचे वेळापत्रक देखील बनवून ठेवतात. मात्र त्याचा कधीतरीच उपयोग होतो. अशावेळस महिलांना वाटते ज्या महिला स्वयंपाक करत नाही त्या किती नशीबवान आहेत. अशा महिलांना अनेकदा सामान्य गृहिणींना हेवा देखील वाटतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाची गोष्ट सांगणार आहोत, जिथे महिलांना घरात स्वयंपाक करायची गरजच पडत नाही. ऐकून आश्चर्य वाटले ना…? (Marathi)
भारतात एक असे गाव आहे, जिथे महिलांना आपल्या घरात स्वयंपाक करण्याची गरजच पडत नाही. आता तुम्ही म्हणाल, स्वयंपाक करण्याची गरज पडत नाही मग या गावात लोकं जेवत नाही का?, की जेवण बनवण्यासाठी माणसं, बायका ठेवल्या आहेत? असे काहीच नाहीये. भारतातील गुजरात राज्यातील चंदनकी नावाचे एक गाव खूपच लोकप्रिय होत आहे. लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे, या गावात कोणाच्याही घरात स्वयंपाक केला जात नाही. ऐकून आश्चर्य, विचित्र जरी वाटत असले तरी याच प्रथेमुळे हे गाव चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi Headline)

सुमारे १००० लोकसंख्येच्या चंदनकी या गावात सामुदायिक स्वयंपाकघराची अनोखी परंपरा चालत आली आहे. या संपूर्ण गावात जेवण रोज एकाच जागी तयार केले जाते. गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील चंदनकी हे गाव देशातील इतर गावांपेक्षा वेगळे गाव ठरले आहे. कारण या गावात सर्व सोयी-सुविधा आहे. वीज, पाणी, पक्के रस्ते, स्वच्छता, शाळा, दवाखाना, बँक सर्व काही आहे. स्वच्छता, शौचालय आहे. पण या गावात कोणत्याच घरी स्वयंपाक केला जात नाही. या गावातील बहुतांश लोकं हे व्यवसायाच्या, नोकरीच्या निमित्ताने अमेरिका, इंग्लड आदी देशांमध्ये आणि भारतातील विविध शहरांमध्ये सेटल झाले आहेत. (TOp Marathi News)
गावात वय वर्षे ४० वरील लोकं आणि अनेक वृद्ध नागरीक राहतात. या लोकांना वयपरत्वे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळेच या गावात दोनशे अडीचशे लोकांसाठी येथे एक सामुहिक स्वयंपाक घर आहे. तिथे माणसं कामाला आहेत. सकाळच्या नाष्ट्यापासून ते दुपारचे आणि रात्रीच्या जेवणापर्यंत येथे गावातील लोकांना स्वयंपाक करावा लागत नाही. एकाच ठिकाणी सर्व समाजाचे लोक रोज जेवण आणि नाष्टा करतात. स्वातंत्र्यापासून या गावात निवडणुकच झालेली नाही. येथे सर्वच सोयी-सुविधा आहेत. या गावात पाहुणा जरी आला तरी त्याची जेवणाची व्यवस्था या सामुहिक स्वयंपाक घराकडूनच केली जाते. या गावातील घरात कित्येक वर्षांपासून चुल पेटलेली नाही. (Top Stories)
========
Falgun Binnendijk : आई, कुठे शोधू तुला…
========
हे गुजरातमधील एकमेव गाव आहे, जिथे रोज सामुहिक स्वयंपाकघरात भोजन तयार होते आणि गावकरी एकाच ठिकाणी बसून त्याचा आस्वाद घेतात. जेवणाचा रोजचा वेगवेगळा मेन्यू असतो. जेवण शाकाहारी आणि चांगले असावे यासाठी एक समिती त्याची गुणवत्ता तपासते. यासाठी प्रति व्यक्ती २००० रुपये महिना जमा केला जातो. याठिकाणी पारंपारिक गुजराती जेवण दिले जाते. चव आणि दर्जा दोन्ही कडे विशेष लक्ष दिलं जातं. दररोज १०० गाववाले रोज जेवण शिजवण्याची जबाबदारी स्वत: वाटून घेतात. त्यामुळे कोणावर ओझं पडत नाही. डाळ, भाज्या, चपात्या सर्वजण एकत्र येऊन तयार करतात. तसेच सणासुदीला आणि खास निमित्ताने वेग-वेगळी पक्वाने देखील तयार केली जातात. (social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
