Home » भारतात मोठा भूकंप येण्याची शक्यता?

भारतात मोठा भूकंप येण्याची शक्यता?

by Team Gajawaja
0 comment
Earthquake
Share

तुर्कीसारखा भूकंप (Earthquake) उत्तराखंडमध्येही होऊ शकतो, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तुर्कीमध्ये झालेल्या भुकंपाबाबत इशारा देणारे शास्त्रज्ञ फ्रँक हगरबीट्स यांनीही काही दिवसांपूर्वी असाच इशारा दिला आहे. आता नव्यानं दिलेल्या इशा-यात भारतात तुर्की आणि सीरियासारखा भूकंप झाल्यास मोठा विनाश होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  

तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यातून अजूनही सावरता आले नाही. तसाच भूकंप भारतात झाल्यास त्याची तिव्रता अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा भूकंप उत्तराखंड प्रदेशात येण्याची शक्यता आहे. नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट चे भूकंपशास्त्राचे (Earthquake) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. तुर्कस्तानपेक्षाही मोठ्या भूकंपाचा धोका उत्तराखंडवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  डॉ. राव यांनी हा इशारा दिल्यावर फ्रँक हगरबीट्स यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फ्रँक हगरबीट्स भारतीय उपखंडात मोठा भूकंप झाल्यास काय होऊ शकते हे सांगत आहेत.  फ्रँक यांच्या मते हा भूकंप (Earthquake) हिंद महासागर क्षेत्रात म्हणजेच भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या आसपासच्या अनेक भागात होऊ शकतो.

नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट चे भूकंपशास्त्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव यांनीही अशाच प्रकारचा धोका आपल्या देशावर असल्याचे म्हटले आहे. डॉ. राव यांच्या म्हणण्यानुसार,  उत्तराखंडवर लक्ष केंद्रित संस्थेनं हिमालयीन प्रदेशात सुमारे 80 भूकंप केंद्रे स्थापन केली आहेत.  तिथे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात येत आहे. यातून मिळालेल्या माहितीतून या सर्व भागात ब-याच काळापासून भूभार्गात अतिरिक्त हालचाली हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.  या परिसरातील हालचाली टिपण्यासाठी आधुनिक प्रणालीचाही वापर करण्यात येत आहे.  येथे  जीपीएस नेटवर्क आहे. जीपीएस पॉइंट पृष्ठभागाच्या खाली होत असलेले बदल दर्शवीत आहेत. हे सर्व बदल टिपतांना येणा-या भूकंपाची चाहूल लागत असली तरी अचूक वेळ आणि तारीख सांगू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तराखंडमध्ये कधीही मोठा भूकंप होऊ शकतो.  तसेच बद्रीनाथ आणि केदारनाथ सारख्या तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्‍या जोशीमठ येथील भूस्खलनाबाबतही त्यांनी चितां व्यक्त केली आहे.  

येत्या काही महिन्यात चार धाम यात्रा सुरु होणार आहे. या दरम्यान उत्तराखंडच्या डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी होते.  मात्र सध्या जोशीमठ येथे होणा-या भूस्थलनाबाबतही चिंता व्यक्त झाली आहे.  त्यातच या भागात अशाच विनाशकारी भूकंप (Earthquake) झाल्यास त्याचा फटका स्थानिकांसोबत लाखो यात्रेकरुंनाही बसू शकतो.  त्यामुळे यासर्वांचा यात्रा नियोजनात विचार करावा अशीही मागणी आहे.  तुर्कस्तानमध्ये भूकंपाची (Earthquake) तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. तिथे मृतांचा आकडा पन्नास हजाराच्या आसपास गेला आहे.  त्यामुळे एवढा मोठा भूकंप भारतात झाल्यास काय होईल, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.  डॉ. राव यांच्या म्हणण्यानुसार जम्मू आणि काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या हिमालयीन प्रदेशात 8 पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप (Earthquake) होण्याची शक्यता आहे.  भुकंप झाल्यावर होणारे नुकसान हे लोकसंख्येची घनता, इमारतींच्या बांधकामाची गुणवत्ता, पर्वत किंवा मैदाने आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते.  संपूर्ण हिमालयीन प्रदेश भूकंपास (Earthquake) प्रवण पट्ट्यात येत असल्याची माहितीही डॉ. राव यांनी दिली आहे. 

=======

हे देखील वाचा : म्युचअल फंड्सच्या माध्यमातून सहज घेता येते कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

=======

डॉ. राव यांनी हिमानयीन पट्ट्यातील भूकंपाची (Earthquake) शक्यता वर्तवल्यावर पुन्हा  फ्रँक हूगरबीट्स यांचे नाव चर्चेत आले आहे.  तुर्कीच्या भूकंपाची भविष्यवाणी करणारे संशोधक फ्रँक हुगरबीट्स यांनी भारतीय उपखंडाबद्दलही अशीच काहीशी भविष्यवाणी केली आहे.  डच संशोधक फ्रँक हुगरबीट्स यांनी तुर्की आणि त्याच्या शेजारच्या भागात धोकादायक भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. फ्रॅंक यांनी हा इशारा दिल्यावर काही दिवसातच प्रत्यक्षात भूकंप झाला होता.  आता या फ्रॅंक यांनी आपला नवा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये फ्रँक हगरबीट्स भारतीय उपखंडात मोठा भूकंप होऊ शकतो असा दावा करत आहेत. फ्रँक हूगरबीट्स असेही म्हणत आहेत की हा भूकंप हिंद महासागर क्षेत्रात म्हणजेच भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या आसपासच्या अनेक भागात होऊ शकतो.  फ्रँकने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह हिंद महासागर क्षेत्रातही जोरदार भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. फ्रँक सांगतात की, अफगाणिस्तानपासून सुरू होऊन हा भूकंप (Earthquake) हिंदी महासागरापर्यंत पोहोचेल.  फ्रँकने असेही सांगितले की,  या भूकंपाचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र निश्चितपणे काही सांगता येत नाही.  अर्थात फ्रॅंक यांनी सावधानतेचा इशारा दिला असला तरी भारतीय संशोधन संस्था भूकंपप्रवण भागात सध्या सतर्कपणे कार्यरत आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.