आर्य चाणक्य माहित नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आर्य चाणक्य हे महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजेशाही सल्लागार होते. त्यांनी त्यांच्या जीवनात सर्वच गोष्टींचा विपुल अभ्यास केला. त्यांनी एक नैतिकतेचे धोरण तयार केले, ज्यात त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित आदी अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख केला आहे. आर्य चाणक्य यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती या त्यांच्या पुस्तकामध्ये जीवनात येणाऱ्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजेत हे सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनात कायम यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असते. मात्र त्याच्याच वाईट सवयी त्याचा घात करताना दिसतात. माणसाच्या याच सवयी कोणत्या हे आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे. (Bad Habits)
राग
राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती सर्वकाही असूनही हरते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कधीच रागावू नका.
आळस
चाणक्य नीतीनुसार, माणसाने नेहमी शिस्तीने जगले पाहिजे, प्रत्येक कामासाठी एक निश्चित वेळ असावी, कारण जर माणूस आळशी असेल तर तो आपले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. (Marathi News)
व्यसन
माणसाने कधीही कोणत्याही प्रकारची नशा करू नये, कारण नशा हे तुमच्या विनाशाचे मूळ आहे; यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक नुकसान होते. नशा करणारी व्यक्ती वाईट संगतीत अडकते, ज्यामुळे त्याचे भविष्य खराब होते. त्याच वेळी नशा माणसाला एके दिवशी मृत्यूकडे घेऊन जाते.
खराब संगत
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी वाईट संगतीपासून दूर राहिले पाहिजे, कारण माणूस ज्या संगतीत राहतो तसाच बनतो. तसेच वाईट संगतीत अडकून माणूस आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवतो. तसेच, समाजात आणि कुटुंबात त्याला आदर मिळत नाही. (Todays Marathi Headline)

अति झोप काढणारी लोकं
जे लोक सकाळ ते संध्याकाळ पर्यंत झोपतात, त्यांच्या वर आई लक्ष्मी कधीच कृपा करत नाही. सूर्योदयानंतर झोपणाऱ्या लोकांना नेहमी दारिद्र्याला सामोरी जावं लागत. (Latest Marathi News)
गैरवर्तन करणारी व्यक्ती
आचार्य चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती इतरांसोबत गैरवर्तन करतो त्याला आर्थिक संकटातूनही जावे लागते. आचार्य यांच्या मते, ज्याप्रमाणे आपण नेहमी आदराची अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे आपण इतरांचा आदर करण्यात कोणतीही कसर सोडू नये. प्रगतीसाठी उद्धटपणा, टोमणे किंवा इतरांचा अपमान करणे हे एक प्रकारचे पाप आहे आणि त्याची शिक्षा उशिरा का होईना भोगावी लागते. (Top Marathi Headline)
अति खाण्याची सवय
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात म्हटले आहे की, खादाड स्वभावाचा माणूस फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि नेहमी खाण्याची ही सवय त्याला संपत्ती जमा करू देत नाही. अशा प्रकारे, माणूस पैशाच्या कमतरतेशी झुंजत राहतो. (Top Trending News)
========
Sliver : पुरुषांनी हातात चांदीचे कडे घातल्यास होतील ‘हे’ मोठे लाभ
========
वायफळ खर्च
पैसे जमा न करण्याची सवय माणसाला गरीब बनवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने त्याच्या भविष्यासाठी नेहमीच त्याच्या कमाईचा काही भाग वाचवला पाहिजे. ज्या लोकांना पैसे वाचवण्याची सवय नाही त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. माणसाने कधीही विचार न करता पैसे खर्च करू नये. वाया घालवण्याची सवय माणसाला गरीब बनवू शकते. जर माणूस कोणत्याही कारणाशिवाय पैसे खर्च करत राहिला तर कमाई केल्यानंतरही त्याचा खिसा नेहमीच रिकामा राहील. आचार्य चाणक्य म्हणतात की पैसे नेहमी अशा गोष्टींवर खर्च करावे जिथे ते आवश्यक आहे. (Top Stories)
लोभी व्यक्ती
लोभी व्यक्तीलाही देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. योग्य मार्गाचा अवलंब केल्याने आणि कष्टाने पैसा कमावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण जे लोभी होऊन चुकीचा मार्ग निवडतात, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, हळूहळू त्यांचे सर्व काही नष्ट होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
