प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, धन-वैभव आणि यश मिळावे अशी इच्छा असते. काही वेळा असे होते की., एका चुकीमुळे आयुष्यभरासाठी काही समस्या उद्भवतात. मात्र अशा काळात नेमके काय करावे हे सुद्धा त्या व्यक्तीला कळत नाही. त्यामुळे तो काही वेळेस टोकाचे पाऊल उचलतो. पण योग्य वेळी जर आपण स्वत:ला सावरले आणि आपल्यावर ओढावलेल्या संकटाचा सामना करायचे ठरवल्यास नक्कीच प्रयत्नांना कधी ना कधी यश मिळेल. या व्यतिरिक्त आचार्य चाणाक्यांच्या काही गोष्टी तुम्हाला कठीण काळात ही खंबीर उभे राहण्याची प्रेरणा देतील.(Chanakya Niti)
आचार्यांनी चाणाक्य नितीत शिक्षणाचे महत्व सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आयुष्यात जर यशोप्राप्ती करायची असेल तर शिक्षण योग्य पद्धतीने घेतले पाहिजे. तसेच शास्रांच्या नियमांचा ही सातत्याने अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे आयुष्यात चूक आणि बरोबर मधील फरक कसा करायचा हे स्वत: ला कळेल. ज्या व्यक्तीला चूक काय-बरोबर काय हे अचूक ओखळता येते तोच कठीण काळात त्यावर स्वत: तोडगा काढतो.
हे देखील वाचा- तुमच्या आयुष्याला कलाटणी लावणाऱ्या “लेखणीची ताकद”

या व्यतिरिक्त अशा ठिकाणी कधीच राहू नका जेथे तुमचा सन्मान केला जात नाही. तुमच्याकडे भले नोकरी, मित्र नसला तरीही चालेल पण तुमच्या आत्मसन्माला कधीच ठेच पोहचू देऊ नका. याउलट तुम्ही एखादे काम करतायत पण त्याचे क्रेडिट दुसराच व्यक्ती घेऊन जातोय तर तुमच्या मेहनीचा काय उपयोग. आपल्याला आपली कलाकौशल्ये दाखवण्यासह तुम्ही काय करु शकता हे समोरच्या व्यक्तीला साध्य करुन दाखवा. यासाठी नेहमीच योग्य मार्गाचा वापर करा. गैरमार्गाने केलेली कृती ही नेहमीच अंगलट येऊ शकते हे सुद्धा लक्षात ठेवा. आचार्यांनी असे ही सांगितले आहे की, कठीण परिस्थितीत जो तुमच्या सोबत असतो तोच तुमचा खरा मित्र असतो. कारण अशाच वेळी लोकांची खरी रुप दिसून येतातच पण आपण ज्यांच्यासाठी वेळोवेळी उपयोगी पडलो तेच आपल्याशी कसे वागतात हे कळते.(Chanakya Niti)
आयुष्यात कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे याबद्दल ही चाणाक्यांनी सांगितले आहे. ते असे सांगतात की, मनुष्याला धनाची बचत करता आली पाहिजे. कारण कठीण काळात धन हेच तुमचा खरा साथीदार म्हणून उभा राहतो. परंतु जेव्हा बायकोच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो तेव्हा धनापेक्षा तिला अधिक महत्व दिले पाहिजे. जेव्हा गोष्ट आपल्या आत्मसन्मानाची येते तेव्हा धन आणि पत्नीसह अन्य गोष्टी तुच्छ होतात. अशा स्थितीत आपल्या आत्मसन्मानाची काळजी घेतली पाहिजे. तसेच दुष्ट पत्नी, खोटा मित्र, धूर्त सेवक आणि साप या चार गोष्टी आयुष्यासाठी घातक असतात. त्यांच्यासोबत राहणे म्हणजे आयुष्यात संकट ओढावून घेण्यासारखे आहे. त्यामुळेच आपण कोणासोबत संगत करावी आणि कोणाला कितपत गोष्टी सांगाव्यात हे सुद्धा कळले पाहिजे.