नव्या वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वत्र पार्टी, धम्माल आणि आनंदाचे वातावरण असणार आहे. तर प्रत्येक पार्टीत शॅम्पेन तर आनंद साजरा करण्यासाठी हमखास असतेच. अशातच ३१ डिसेंबरला शॅम्पेन डे म्हणून साजरा केला जातो. शॅम्पेन संदर्भात गेल्या वर्षात फ्रांस आणि रशिया मध्ये वाद झाला होता. रशियाने शॅम्पेनला स्पार्कलिन वाइनच्या नावाने विक्री करण्याबद्दल बोलले गेले होते. यामुळे फ्रांसमध्ये शॅम्पेन बनवणारे लोक नाराज झाले होते. प्रश्न खुप आहेत. शॅम्पेन म्हणजे नक्की काय, ती कशी तयार केली जाते किंवा त्याचे नाव कसे पडल, ऐवढेच नव्हे तर त्यामध्ये किती अल्कोहोल असते हे सुद्धा सर्वांना जाणून घ्यायचे असते. (Champagne Day)
शॅम्पेन म्हणजे काय?
शॅम्पेनचा अर्थ स्पार्कल वाइन असा होतो. म्हणजेच शॅम्पेन मध्ये वाइन असते आणि ती एका खास पद्धतीने तयार केलेली स्पार्कल वाइन असते. शॅम्पेन मध्ये लहान-लहान बुडबुडे दिसतात आणि याच कारणामुळे गॅस निर्माण होतो. शॅम्पेन स्पार्कलिंग वाइनच असते याचा अर्थ असा नव्हे की, सर्वत स्पार्कलंग वाइन शॅम्पेन असते.
शॅम्पेन कशी तयार होते?
सर्वात प्रथम विविध प्रकारची द्राक्षांचा ज्यूस काढला जातो. त्याचे फर्मन्टेशन केले जाते. यासाठी ते सर्वात प्रथम टॅंकमध्ये भरुन ठेवले जातात आणि नंतर काही महिन्यानंतर किंवा वर्षापर्यंत फर्मन्टेशन प्रोसेस मध्ये ठेवली जातात. त्यानंतर बॉटलमध्ये भरुन उलटी ठेवले जातात, त्यामुळे या मध्ये कार्बनडाइऑक्साइड आणि अल्कोहॉल जनरेट होते.
दीर्घकाळापर्यंत असे केल्यानंतर पुन्हा झाकणाऐवजी कॉर्क लावले जाते. त्यानंतर प्रथम बर्फात ठेवले जाते. अशातच प्रेशरच्या कारणास्तव बर्फ आणि घाण बाहेर येते. त्यानंतर पुन्हा काही दिवसापर्यंत बॉटल उलटी ठेवली जाते. तेव्हा कुठे स्पार्कलिंग वाइन तयार होते.
शॅम्पेन कसे पडले नाव?
फ्रांन्समध्ये एक क्षेत्र आहे, ज्याचे नाव शॅम्पेन आहे. जी स्पार्कलिंग वाइन, जी फ्रांन्सच्या शॅम्पेन क्षेत्रात तयार केली जाते. त्यालाच शॅम्पेन असे म्हटले गेले. अन्य देशांमध्ये जी स्पार्कलिंग वाइन तयार केली जाते तिला वेगळे नाव दिले जाते. मात्र ती भरतात तयार केली जात असेल तर त्याला फक्त स्पार्कलिंग वाइनच म्हटले जाते. (Champagne Day)
हे देखील वाचा- जानेवारी नव्हे तर मार्च महिन्यापासून नवं वर्षाची व्हायची सुरुवात, रोमन कॅलेंडरचा असा आहे इतिहास
शॅम्पेनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती असते?
शॅम्पेन किंवा स्पार्कलिंग वाइनमगध्ये किती अल्कोहोल असते असा प्रश्न विचारला तर त्याची टक्केवारी ११ टक्के आहे. ही एक प्रकारची वाइन आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की, अन्य दारुच्या तुलनेत आरोग्यासाठी अधिक नुकसानकारक नाही आहे.