महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा अर्थात मल्हार मार्तंड यांचा वर्षातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येणारी ‘चंपाषष्ठी’. खंडोबाला भगवान शिवाचे अवतार मानले जाते. चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव आहे, जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो. २०२५ मध्ये हा उत्सव २६ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी साजरा केला जाईल. षष्ठी तिथी २५ नोव्हेंबर रात्री १०:५६ वाजता सुरू होईल आणि २७ नोव्हेंबर पहाटे १२:०१ पर्यंत चालू राहील. (Khandoba)
चंपा षष्ठीचा उत्सव सहा दिवस चालतो, जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो. हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते. भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात. दररोज सकाळी उठून स्नान करुन खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा अखंड दिवा लावून आरती करतात. पुण्याजवळील जेजुरी हे ठिकाण खंडोबाचे मुख्य ठिकाण आहे. महाराष्ट्रात तर जवळपास प्रत्येक घरामध्ये चंपाषष्ठीचा सण साजरा केला जातो. यादिवशी कांदे आणि वांग्याचे पदार्थ बनवण्यास महत्त्व आहे. याच पदार्थांचा नैवैद्य देवाला देखील दाखवला जातो. आषाढी एकादशीच्या दिवसापासून जेव्हा चातुर्मास चालू होतो, तेव्हा अनेक घरांमध्ये या चार महिन्यांच्या काळात कांदे आणि वांगे खाल्ले जात नाही. मात्र चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य दाखवला की, कांदे वांगे खाणे सुरु होते. (Champashashthi)
चंपाषष्ठीच्या दिवशी अजून एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे, ‘तळी भरणे’. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार असतो, त्यामुळे घरोघरी तळी भरतात. पौराणिक कथेनुसार, ‘मणि आणि मल्ल’ या दैत्यांचा पराभवानंतर सर्वांना आनंद झाला. या आनंदोत्सवात खंडेरायाचा जयजयकार करण्यात आला. त्याचेच प्रतीक म्हणजे ‘तळी भंडारा’ आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्ठीला तळी भरली जाते. यात ताम्हणात विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये तळी उचलली जाते. (Marathi News)
घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर जमीनावर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडार वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. त्यानंतर खंडेरायाला भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जाते. तसेच भंडारा उधळत भंडारा आणि गुळ-खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो. जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. (Todays Marathi Headline)

तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य
कुळातील खंडोबा देवाचा टाक, खोबरे वाटी – २, सुपारी – ५, विड्याची पाने – ११, तांब्याचा कलश – १, तांब्याचे ताम्हण – १, भंडारा (हळद), कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी, आसन, दिवा, अगरबत्ती
तळी कशी भरावी?
तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात. त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर तांब्याचा कलशात पाणी भरून त्यात ५ विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी. ताम्हणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक अन् भंडारा ठेवावा. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे. (Top Marathi News)
तळी भरण्यासाठी तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी बसावे. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’ असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे. त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी अन् त्यावर ताम्हण ठेवावे. देवाला भंडार अर्पण करुन प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावावा. आणि पुन्हा एकदा ‘सदानंदाचा येळकोट’ या गजरात ताम्हण उचलावे. शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे. ताम्हण वरखाली करताना ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयजयकार करावा. हे करताना खंडोबाची आरती म्हणावी. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. (Latest Marathi Headline)
तळी भरताना काय म्हणावे?
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी । (Top Trending News)
निळा घोडा, पाव में तोडा ।
मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।
अंगावर शाल, सदाही लाल ।
म्हाळसा सुंदरी, आरती करी ।
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।
बोला सदा आनंदाचा येळकोट
खंडेराव महाराजकी जय
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदय उदय
भैरीचा चांग भले
सदानंदाचा येळकोट (Top Stories)
========
Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व
========
खंडेराव महाराज की जय
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
चिंतामणी मोरया
आनंदाचा उदय उदय
भैरीचा चांग बले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय (Social News)
(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
