जेव्हापासून चला हवा येऊ द्या शोच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली तेव्हापासून हा शो कमालीचा चर्चेत आला आहे. अनेकांना या शो ची प्रतीक्षा होती. शो पुन्हा चालू होतोय याचा आनंद सगळ्यांनाच झाला, मात्र तो जास्त काळ टिकला नाही. कारण या शोचे या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता निलेश साबळे नाही तर अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा प्रसिद्ध ज्योतिषी शरद उपाध्ये यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर अनेक आरोप केले होते. (Marathi News)
निलेश साबळेला गर्विष्ठ, निलेशच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली असे म्हटले. या आरोपांना उत्तर देताना निलेश साबळेने एक व्हिडिओ बनवला, आणि सोशल मीडियावर पोस्ट करत उपाध्ये यांच्या आरोपांवर स्पष्ट उत्तर दिले. या सर्व प्रकारादरम्यान अनेक कालाकारांनी निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत निलेशला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यातच चला हवा येऊ द्या मधल्या एका कलाकाराची पोस्ट समोर आली आहे. (Todays Marathi Headline)
चला हवा येऊ द्या या शोमध्ये काम करणाऱ्या अभिषेक बारहाते पाटील या अभिनेत्याने निलेश साबळेने त्याचे आयुष्य कसे बदलले याबद्दल सांगितले. या शोच्या काही भागांमध्ये अभिनेता अभिषेक बारहाते-पाटील दिसला होता. त्याची किम जोंग उन ही भूमिका प्रचंड गाजली. याच अभिषेकने शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवे केलेल्या टीकेवर त्याच्या भावना व्यक्त करत निलेश साबळेची बाजू घेतली आहे. अभिषेकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, (Top Marathi Headline)
“प्रति
सन्मा.शरद उपाध्ये साहेब
आज तुमची एक पोस्ट वाचली.
डॉक्टर निलेश साबळे यांच्याबद्दलची ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली.त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.
“डोक्यात हवा गेलीय”,
“याला आपणच मोठं केलं…”
“सगळा अभिनय फक्त स्वतःचा शोभा वाढवायला…”
असं किती काही वाचायला मिळालं.आणि खरं सांगायचं, तर राग आला. पण त्याहून जास्त खंत वाटली.
कारण तुम्ही टीका केली त्या माणसावर, ज्यांनी लोकांमध्ये चेहरा नसलेल्या, आवाज नसलेल्या, नाव नसलेल्या मुलांना नाव दिलं, आवाज दिला, आणि स्टेज दिला.
View this post on Instagram
हो, मी गावाकडचा आहे.
शुद्ध भाषेचा अभाव बोलण्याची भीती होती.अभिनय माहीत नसलेला पण तेव्हा कोणीतरी होता ज्याने आमच्या सारख्या गावठी वर विश्वास ठेवला.आम्ही काहीतरी करू शकतो – हे पहिल्यांदा दाखवून दिलं.
डॉक्टर निलेश साबळे आमचे मार्गदर्शक,आमची ओळख.
ज्या शो बद्दल आपण बोलला चला हवा येऊ द्या विषयी
शून्य जाहिरातीतून, शून्य गॉसिपमध्ये राहून…फक्त कामावर विश्वास ठेवत तो शो अविरत पणे चालवला तो साबळे सरांनी आणि बघता बघता –
तो कार्यक्रम १० वर्ष टिकला.
लोक मराठी शो बदलून पाहायचे,
हिंदी कलाकार मराठीत यायला भाग पडले.पहिला मराठी शो ज्याने हिंदी कलाकार मराठी स्टेज वर आणले.आणि एक दिवस असा आला की –
‘चला हवा येऊ द्या शो’ फक्त मुंबईपुरती मर्यादित गोष्ट राहिली नाही.
कोणी तरी म्हणालं – “स्टारडम डोक्यात गेलंय.”
हो, गेलंय कदाचित –
पण ते डोक्यात गेलेलं ‘हवा’ नाही –
तर अनुभव, संघर्ष, आणि हजारोंच्या पाठीशी उभं राहिलेलं आत्मभान आहे.
आमच्यासारख्या पोरांना लोक विचारायचे – “तू कुठून आलास?”
आज विचारतात – “तू त्या शोमध्ये होता ना?”
ही ओळख फुकट मिळत नाही –
ही ओळख मिळवून द्यायला कोणीतरी आयुष्य घालवतं लागतं.
आणि म्हणूनच,
कोणीही काहीही बोलेल, तरी सत्य बदलत नाही.
ज्यांनी निर्माण केलं, त्यांचं योगदान काही पोस्टने मिटत नाही.
हे सरांचं कौतुक नाही, हे आम्हा सर्वांचं उत्तर आहे.
कारण जिथे आमचा आवाज थांबतो,
तिथे त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं.
आणि आज कोणी त्यांच्यावर बोट दाखवत असेल,
तर आम्ही शंभर आवाजांनी त्यांचं नाव पुन्हा पुन्हा उच्चारू.
आमचं शिक्षण, आमचा आत्मविश्वास, आमचं ओळख –
किती मोलाचं असतं हे तुम्हाला समजणार नाही.
कारण तुमचं सगळं काही तयार होतं.
आमचं तर त्यांच्यामुळे सुरू झालं.
तुम्ही टीका करत राहा, आम्ही आदर करत राहू.
कारण तुम्ही नाव घेतलं, आणि आम्ही नाव कमावलं – त्यांच्या बरोबर उभं राहून.
एक गावातला मुलगा
(जो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलाय-एका माणसामुळे)”
=========
हे ही वाचा : Sharad Upadhye : ‘गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते’ शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेवर थेट निशाणा
Nilesh Sable : शरद उपाध्याय यांच्या ‘त्या’ आरोपांना निलेश साबळेने दिले रोखठोक उत्तर
==========
दरम्यान निलेशने १४ मिनिटांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि शरद उपाध्येंच्या टीकेला उत्तर दिले. त्याने अनेक गोष्टी या व्हिडिओमधून स्पष्ट केल्या. यात त्याने तो का या शोचे सूत्रसंचालन करत नाही याचे कारण देखील सांगितले. निलेश आणि भाऊ कदम हे एका सिनेमात काम करत असल्याने त्यांच्या तारखांचा ताळमेळ बसत नसल्याचे निलेशने सांगितले. सोबतच या शोला आणि अभिजित खांडकेकरला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (Social News)