भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौ-यावर आहेत. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मॉरिशसच्या पंतप्रधानांसह अवघे मंत्रीमंडळ हजर होतं. शिवाय मॉरिशसमधील 200 प्रतिष्ठित, पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला हजर होते. पंतप्रधान मोदी हे 10 वर्षांनी मॉरिशसच्या दौ-यावर गेले आहेत. त्यांना मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी खास आमंत्रण दिले होते. वरवर पाहता हा दौरा सहज वाटत असला तरी पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशस दौ-यासाठी जी वेळ साधली आहे, त्यामुळे अवघ्या युरोप, अमेरिका आणि चीनचेही या दौ-याकडे लक्ष लागले आहे. त्यामागे कारण आहे ते चागोस बेटांचे. आता मॉरिशसच्या ताब्यात असलेल्या या बेटांवर इंग्लड, अमेरिका आणि चीनचीही नजर आहे. इंग्लडनं त्यांचा ताबा मॉरिशसकडे दिला असला तरी सागरी संरक्षणासाठी या बेटांचे महत्त्व किती आहे, याची जाणीव त्यांना आहे. (Chagos Islands)
आशिया आणि सर्व जगावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बघणा-या चीनचीही नजर या चागोस बेटांवर आहे. या बेटांवर लष्करी तळ उभारण्याचे स्वप्न हा देश बघत असून त्याद्वारे त्यांना भारतीय नौदलाच्या हालचालींवर नजर ठेवायची आहे. अमेरिकाही या बेटांचा ताबा मिळवण्यासाठी उत्सुक आहे. कारण अमेरिकेला, भारताच्या वाढच्या नौदल सामर्थ्याचे महत्त्व कळले आहे. भारत आशियात मजबूत झाल्यास त्यांचे वर्चस्व कमी होईल, याची जाणीव अमेरिकेला आहे. त्यातच अमेरिकेचा कायम आशियाच्या राजकारणात रस राहिला आहे. याच बेटांच्या ताब्यासाठी त्यांना बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण केल्याचा आरोप आहे. मात्र या सर्वात मॉरिशसच्या सरकारची भूमिका ही कायम भारताप्रती मैत्रीची राहिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या दौ-यात चागोस बेटांबाबत चर्चा होणार आहे. शिवाय दौ-याचे निमित्त साधत भारताच्या नौदलाचे जहाज, इम्फाळ तिथे पोहोचले आहे. यामुळे भारत चागोस बेटांवर लष्करी तळ उभारणार अशी चर्चा सुरु झाली आहे. (International News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरिशसमध्ये झालेले भव्य स्वागत हा चर्चेचा विषय ठरला आहे. मॉरिशस मोदी यांना देत असलेला मान हा ब्रिटन, अमेरिका आणि चीन या देशांना नक्कीच खटकणारा आहे. कारण याच दौ-याच्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चागोस बेटांवर अमेरिका-ब्रिटिश लष्करी तळाच्या भविष्याबाबतच्या कराराला पाठिंबा दर्शविला आहे. ब्रिटन चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला सोपवण्यासाठी कराराला अंतिम रूप देत असतांनाच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. (Chagos Islands)
तेव्हाच पंतप्रधान मोदी आणि भारतीय नौदलाच्या नौका मॉरिशसमध्ये दाखल झाल्या आहेत. चागोस द्वीपसमूहाबाबत ब्रिटनसोबत मॉरिशसच्या होणा-या कराराबरोबरच अमेरिकेच्या डिएगो गार्सिया येथील मुख्य लष्करी तळाचे भविष्यही निर्धारीत आहे. यासर्वात आता भारताची भूमिका महत्त्वाची असेल, तसेच भारताच्या निर्णयावर ब्रिटन आणि अमेरिकाच्या लष्करी तळांचे भवितव्य अवलंबून असेल याची जाणीव ट्रम्प यांना झाली आहे. त्यामुळेच मोदी यांच्या दौ-याआधी त्यांनी अमेरिका आपल्यावर लक्ष ठेऊन असल्याचे सूचित करत चागोस बेटांचा उल्लेख केला आहे. चागोस बेटे ही हिंद महासागरातील 60 हून अधिक बेटांचा समावेश असलेल्या सात प्रवाळ पर्वतांचा समूह आहे. यात सर्वात मोठे बेट हे डिएगो गार्सिया आहे. हे डिएगो गार्सिया बेट 1970 पासून संयुक्त ब्रिटिश-अमेरिकन लष्करी तळ म्हणून वापरले जाते. गेल्या वर्षी, ब्रिटनने चागोसचे सार्वभौमत्व मॉरिशसला देण्याची तयारी दाखवली. (International News)
वास्तविक या बेटाचा ताबा मिळवण्यासाठी आणि येथे लष्करी तळ उभारण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेच्या सैन्यानं या बेटावरील स्थानिकांना अत्याचार करत हाकलून लावले. मात्र या स्थानिकांनी कायम या सैन्याला आणि लष्करी तळाला विरोध केला. त्यांनी या दोन्ही देशातील सैन्यानं बेटाचा ताबा सोडावा म्हणून संयुक्त राष्ट्रामध्येही दाद मागितली आहे. 1968 मध्ये मॉरिशस स्वतंत्र झाला तरी ब्रिटननं चागोसवर आपले नियंत्रण ठेवलेच त्यातही डिएगो गार्सियावर लष्करी तळ उभारला. 1966 मध्ये ब्रिटननं परस्पर डिएगो गार्सिया बेट अमेरिकेला भाड्याने दिले. तेव्हापासून मॉरिशर या बेटांचा ताबा आपल्याकडे यावा म्हणून लढा देत आहे. आता याच बेटांचा ताबा देण्याची मागणी मान्य करत ब्रिटननं आपले सैनिक माघारी बोलावले आहेत. शिवाय अमेरिकन सैन्यालाही माघारी बोलावण्यात आले आहेत. मात्र यामुळे आशियावरील आपले वर्चस्व कमी होईल, याची जाणीव या दोन्ही देशांना आहे. आता भारताचे पंतप्रधान मोदी मॉरिशस दौ-यावर असतांना त्यांनी भारताच्या नौदलाची ताकद दाखवणा-या बोटी मॉरिशसच्या बंदरात दाखल केल्या आहेत. (Chagos Islands)
=============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?
=============
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात भारतीय सशस्त्र दलांची एक तुकडी, भारतीय नौदलाची एक युद्धनौका आणि भारतीय हवाई दलाची आकाश गंगा ‘स्कायडायव्हिंग टीम’ सहभागी होणार आहे. यामुळेच मॉरिशस भारताला चागोस बेटांचा ताबा देणार अशी शंका ब्रिटन आणि अमेरिकेला आहे. भारत आणि मॉरिशसनं यासंदर्भात आपल्या कार्यक्रम दौ-यात कुठेही उल्लेख केला नसली तरी हा छुपा अजेंडा असल्याचे मत या दोन देशातील लष्करी तज्ञांचे आहे. असे झाल्यास आशियात भारताचे वर्चस्व निर्विवाद प्रस्थापित होणार असल्याची जाणिव झाल्यामुळेच अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांचे पूर्ण लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या या मॉरिशस दौ-यावर आहे. (International News)
सई बने