Home » सरव्हायकल कॅन्सरची ही आहेत लक्षणे, असे राहा दूर

सरव्हायकल कॅन्सरची ही आहेत लक्षणे, असे राहा दूर

सरव्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या ग्रीवाजवळ सुरू होतो. हा महिलांमध्ये होणारा चौथा सर्वाधिक मोठा कॅन्सर असल्याचे सांगितले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Cervical Cancer Symptoms
Share

Cervical Cancer Symptoms  : सरव्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या ग्रीवाजवळ सुरू होतो. हा महिलांमध्ये होणारा चौथा सर्वाधिक मोठा कॅन्सर असल्याचे सांगितले जाते. एका आकडेवारीनुसार, भारतातील महिलांमध्ये कॅन्सरमध्ये सरव्हाइल कॅन्सर हा दुसऱ्या स्थानावर आहे. वर्ष 2020 मध्ये 123,000 पेक्षा अधिक रुग्ण सरव्हाइकल कॅन्सरचे समोर आले होते. अशातच जाणून घेऊयात सरव्हाइकल कॅन्सर म्हणजे काय आणि यापासून कसे दूर राहाल.

सरव्हाइकल कॅन्सर म्हणजे काय?
सरव्हाइकल कॅन्सरमध्ये महिलांच्या सर्विक्स कोशिकांना नुकसान पोहोचले जाते. सर्विक्स युट्रसच्या खालचा भाग असून जो थेट वजाइनाशी जोडलेला असतो. सरव्हाइकल कॅन्समध्ये या भागातील कोशिकांना नुसकान पोहोचले जाते. सरव्हाइकल कॅन्सरची बहुतांश प्रकरणे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एचपीवी स्ट्रेन्सच्या कारणास्तव होते. खरंतर, एचपीवी एक सामान्य व्हायरस आहे. जो सेक्स दरम्यान एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्ती पर्यंत फैलावला जाऊ शकतो. एचपीवी एक सामान्य लैंगिक आजार आहे.

सरव्हाइकल कॅन्सरची सुरुवातीची स्टेज
एखाद्याला सरव्हाइकल कॅन्सर झाला असल्यास ते सुरुवातीच्या स्टेजबद्दल कळू शकते. कारण यामध्ये 10 ते 15 वर्षांपर्यंत प्री-कॅन्सरस स्टेज असते. याशिवाय पॅप स्मियर सारख्या सामान्य चाचणीच्या माध्यमातून सरव्हाइकल कॅन्सरच्या पहिल्या स्टेजबद्दल कळू शकते. या चाचणीच्या माध्यमातून सरव्हाइकल कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी उपचार केले जाऊ शकतात. डॉक्टरांद्वारे महिलांना प्रत्येक तीन वर्षांनी पॅप टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय ज्या महिलांचे वय 30 पेक्षा अधिक आहे त्यांना डॉक्टर एचपीवी टेस्ट करण्यास सांगतात.

सरव्हाइकल कॅन्सरचे मुख्य कारण
सरव्हाइकल कॅन्सरची बहुतांश प्रकरणे हाय रिस्क ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसच्या कारणास्तव होते. एचपीवीने संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिंक संबंध ठेवल्याने तो फैलावला जातो. याशिवाय ज्या, महिला एकापेक्षा अधिक पार्टनर सोबत लैंगिक संबंध ठेवतात किंवा ज्यांनी कमी वयातच लैंगिंक संबंध प्रस्थापित केले आहेत त्यांच्यामध्ये सरव्हाइकल कॅन्सर होण्याचा धोका असतो. याशिवाय अधिक गर्भनिरोधक गोळ्या खातात त्यांच्यामध्ये ही सरव्हाइकल कॅन्सरचा धोका वाढला जातो.

सरव्हाइकल कॅन्सरची लक्षणे
एका रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीच्या स्टेजवर सरव्हाइकल कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. याची लक्षणे तेव्हाच दिसण्यास सुरुवात होते जेव्हा कॅन्सर अॅडवान्स स्टेजवर पोहोचला जातो. यामुळे नियमित रुपात आरोग्य तपासणी करावी. जेणेकरुन सरव्हाइकल कॅन्सरची लक्षणे पहिल्याच स्टेजमध्ये दिसून येतील. (Cervical Cancer Symptoms)

सरव्हाइकल कॅन्सरपासून बचाव कसा कराल?
सरव्हाइकल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी एचपीवी लस घेतली पाहिजे. रुग्णालयात 9-26 वर्षातील तरुणी आणि महिलांना ही लस दिली जाते. लस घेतल्यानंतर डॉक्टर्स स्क्रीनिंगचा देखील सल्ला देतात.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
वयाच्या 35 नंतर व्यायाम करताना या गोष्टी ठेवा लक्षात
वयाच्या चाळीशीनंतर चश्मा लावण्याची गरज भासणार नाही, अशी घ्या डोळ्यांची काळजी
90-30-50 च्या डाएट प्लॅनने फटाफट वजन होईल कमी, फॉलो करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.