एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे पासपोर्ट. याच पासपोर्टच्या जोरावर आपल्याला दुसऱ्या देशात प्रवेश मिळतो. प्रत्येक देश आपल्या देशातील नागरिकांसाठी प्रवास करण्याच्या दृष्टीने एक अधिकृत प्रवास दस्तऐवज, तयार करतो याला पासपोर्ट असे म्हटला. परराष्ट्र मंत्रालयामार्फत परदेश प्रवासासाठी पासपोर्ट जारी केला जात असतो. पासपोर्ट हा ओळखपत्रासह तुमची नागरिकत्व सिद्ध करणारे महत्वाचा पुरावा आहे. पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी त्या नागरिकाची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करतो. (Passport)
प्रत्येक देशात पासपोर्ट काढण्यासाठी काही विशिष्ट नियम केलेले असतात. भारतात देखील पासपोर्ट काढण्यासाठी अनेक नियम केले आहेत. आपल्या देशात पासपोर्ट काढणे बंधनकारक नाहीये. मात्र जेव्हा आपण पासपोर्ट काढतो तेव्हा तो सरकारचे नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतरच मिळतो. पासपोर्ट काढण्यासाठी मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर तो मिळतो. (Indian Passport)
===============
हे देखील वाचा :Kolhapuri Chappal : सेनापती कापशी चप्पलेचा नेमका इतिहास काय ?
===============
मात्र आता याच पासपोर्ट कढण्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जर तुम्ही सुद्धा पासपोर्ट काढण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी महत्वाची आहे. पासपोर्ट नियम, १९८० या नियमावलीत या आठवड्यात बदल करण्यात आले आहेत. नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू होतील. हे नवीन नियम कोणते जाणून घ्या.(Indian Passport Rule)
जन्मप्रमाणपत्र
१ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज करताना जन्मदाखला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिका किंवा जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत कोणत्याही तत्सम प्राधिकरणाकडूनच हा जन्म दाखला वितरीत केलेला असावा. १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना हा नियम लागू होत नाही. या तारखेआधी जन्मलेल्या लोकांना १० वीचे मार्कशिट्स किंवा सर्टीफिकीट्स, स्कूल लिव्हींग सर्टीफिकीट, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स वा कोणतेही छायाचित्र असलेले सरकारी कागदपत्र ज्यावर जन्म तारीख असेल ते सादर करावे लागणार आहे. (India)
निवासी पत्ता
आधी पासपोर्टच्या शेवटच्या पानावर व्यक्तीचा राहण्याचा पत्ता दिलेला असायचा. मात्र आता बदललेल्या पासपोर्टच्या नियमानुसार हा पत्ता दिला जाणार नाही. याऐवजी इमिग्रेशन अधिकारी बारकोडला स्कॅन करुन ती माहिती प्राप्त करु शकतील.(Marathi Top Stories)
रंग-कोडींग पद्धत
नव्या नियमानुसार आता पासपोर्टसाठी रंग-कोडींग सुरु करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट, मुत्सद्दी अधिकाऱ्यांना लाल रंगाचा पासपोर्ट आणि सर्वसामान्यांसाठी निळा रंगाचे पासपोर्ट जारी करण्यात येणार आहेत. यामुळे विमानतळावरील कर्मचारी, इमिग्रेशन ऑफीसर यांना तपासणी करणे सोपे जाणार आहे.(Marathi Trending News)
पालकांचे नाव काढणार
जुन्या पासपोर्टमध्ये नागरिकांच्या आई-वडीलांची नावे देखील आपल्याला दिसायची मात्र आता नवीन नियमानुसार नवीन पासपोर्टमध्ये ही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाहीत. या नियमामुळे एकल पालक, वा वेगवेगळ्या कुटुंबातील मुलांना दिलासा मिळणार आहे. शिवाय या लोकांची गोपनियता देखील कायम राहणार आहे.(Top Marathi News)
===============
हे देखील वाचा : America : अमेरिकेत पुन्हा आगीचे तांडव !
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
पासपोर्ट सेवा केंद्रे वाढवणार
येत्या पाच वर्षांत पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या ४२२ ने वाढून ६०० होणार आहे. यामुळे अर्जदारांच्या सुरक्षा, दक्षता आणि सुविधेत वाढ होणार आहे.