Home » सेलो स्किन म्हणजे काय? जाणून घ्या याची कारणे आणि उपचार

सेलो स्किन म्हणजे काय? जाणून घ्या याची कारणे आणि उपचार

सेलो स्किनबद्दल कधी ऐकले आहे का? खरंतर तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग बदलून तो पिवळसर दिसतो त्याला सेलो स्किन असे म्हटले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Cello Skin
Share

सेलो स्किनबद्दल (Cello Skin) कधी ऐकले आहे का? खरंतर तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग बदलून तो पिवळसर दिसतो त्याला सेलो स्किन असे म्हटले जाते. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. वाढत्या वयासह त्वचा कोरडी होणे, सुरकुत्या येणे अशा समस्या निर्माण होतात. काही लोकांमध्ये वृद्धत्वाची लक्षणे आधीच दिसून येऊ लागतात. सेलो स्किनमागे काही कारणे असू असतात. पण या स्किनवर उपचार करणे शक्य आहे.

त्वचेची समस्या ओळखा
त्वचा पिवळसर अथवा फिकट होत असल्यास, चेहऱ्यावर पिंपल्स, ड्रायनेसची समस्या वाढत असेल तर स्किनचे टेक्चर बिघडल्यासारखे दिसते. यालाच सेलो स्किन समस्या म्हटले जाते.

पोषण तत्त्वांची कमतरता
सेलो स्किनमागील सर्वाधिक मोठे कारण म्हणजे, बिघडलेली लाइफस्टाइल आणि अनहेल्दी फूड. शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे मिळाली नाहीत तर सेलो स्किनची समस्या उद्भवते. खरंतर त्वेचीवरी पेशी तयार होणे हेल्दी राहण्यासाठी व्हिटॅमिन व खनिजांची आवश्यकता असते. जेव्हा पुरेसे पोषण तत्त्वे शरीराला मिळत नाही तेव्हा त्याचा त्वचेवर देखील परिणाम होतो. त्वचा काळवंडलेली दिसते. यामुळे गरजेचे आहे, शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे मिळाली पाहिजेत. व्हिटॅमिन एस बी-12 , व्हिटॅमिन सी, ई, के सारख्या पोषण तत्त्वांचा आहारात समावेश करावा.

अॅनिमिया
अॅनिमियाच्या कारणास्तव सेलो स्किनची समस्या उद्भवू शकते. रक्तातील आरबीसीच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या निर्माण होते. जेव्हा शरीरातील पेशींना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा त्वचा काळवंडली जाते. त्वचा पिवळसर, फिकट दिसून येऊ लागते. अॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी आहारात लोह, व्हिटॅमिन बी-12 चे सेवन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी पालक, भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट याचे सेवन करू शकता. (Cello Skin)

उपाय
-दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवावा. यासाठी केमिकल फ्री फेसवॉशचा वापर करावा
-आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला एक्सफोलिएट करा. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाईल
-त्वचेला मॉइश्चराइझ करणे विसरू नका
-बाहेर जातानाच नव्हे तर घरात देखील सनस्क्रिन लावा
-व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करावा
-मेकअपसाठीचे प्रोडक्ट्स सावधगिरीने निवडावेत
-त्वचा हाइड्रेट राहण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या

टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


हेही वाचा: गरजेपेक्षा अधिक परफ्युम वापरणे आरोग्यासाठी ठरेल घातक


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.