Home » शाहरुख खानसोबत काम करायला घाबरतो अनुराग कश्यप? मुलाखतीत सांगितले यामागील कारण

शाहरुख खानसोबत काम करायला घाबरतो अनुराग कश्यप? मुलाखतीत सांगितले यामागील कारण

दिग्दर्शक अनुराग कश्यपने शाहरुख खानसोबत काम करण्यास भीती वाटते असा खुलासा केला आहे. यामागील कारण देखील अनुरागने सांगितले आहे.

by Team Gajawaja
0 comment
Celebrity News
Share

Celebrity News : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने बॉलिवूडमधील एकापेक्षा एक उत्तम सिनेमे तयार केले. अनुरागच्या काही सिनेमांमध्ये ए लिस्टेड कलाकार देखील झळकले आहेत. पण आजवर अनुरागने शाहरुख खान सोबत मिळून काम केलेले नाही. हैराण करणारी गोष्ट अशी की, अनुराग कश्यपला शाहरुख सोबत काम करण्यास भीती वाटते. याचा खुलासा खुद्द अनुरागने केला आहे.

शाहरुख सोबत काम करायला वाटते भीती
अनुराग कश्यपला ह्युमन्स ऑफ सिनेमाला दिलेल्या एका मुलाखतीत असा प्रश्न विचारण्यात आला होता की, शाहरुख फार आवडतो. पण त्याच्यासोबत आजवर काम का केले नाही? यावर अनुरागने म्हटले की, मला शाहरुखचा चक दे इंडिया सिनेमा फार आवडतो. मला अभिनेता म्हणूनही शाहरुख आवडतो. मला शाहरुख सोबत जरुर काम करायचे आहे. पण त्याच्या चाहत्यांमुळे भीती वाटते. या काळात प्रत्येक बड्या स्टारच्या चाहत्यांमुळे घाबरलो आहे. चाहते स्टार्सला टाइमकास्ट करतात. एखादा अभिनेता चाहत्याच्या पसंतीपेक्षा एक हटके सिनेमा करत असल्यास त्याला थेट नाकारतात. प्रेक्षक आपल्या हिरोचा एक जॉनर पाहणे पसंत करतात. मला अशा प्रकारचा सिनेमा तयार करायचा आहे जो मला पसंत आहे. (Celebrity News)

शाहरुखला म्हटले आर्यन मॅन
या मुलाखतीत अनुराग कश्यपने पुढे म्हटले की, बॉलिवूडमधील हिरोला आपल्या देशात एका देवाप्रमाणे मानले जाते. ज्याप्रकारे हॉलिवूडमध्ये आर्यन मॅन आणि अन्य सुपर हिरोज आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे शाहरुख खान आणि सलमान खान आहे. शाहरुखच्या स्टारडमसोबत पंगा घेणे मला जमणार नाही.


आणखी वाचा :
जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार वेब सीरिज
अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलला आदित्य रॉय कपूर, म्हणाला…

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.