केंद्र सरकारने लेफ्टिनेंट जनरल (रिटायर्ड) अनिल चौहान यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ म्हणजेच सीडीएस म्हणून नियुक्त केले आहे. अनिल चौहान सैन्याचे दुसरे सीडीएस असतील, यापूर्वी या पदावर जनरल बिपिन रावत होते. ज्यांचे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत निधन झाले होते. अनिल चौहान गेल्या वर्षातच निवृत्त झाले होते आणि त्यांनी जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवादाच्या विरोधात करण्यात आलल्या खास कामांसाठी त्यांना ओळखले जाते. आता हे पाहणे महत्वाचे असणार आहे की, जेव्हा त्यांचे नाव लिहिले जाईल तेव्हा त्यांचे संपूर्ण नाव लेफ्टिनेंट जनरल (रिटायर्ड) अनिल चौहान PVSM, UYSM, AVSM, SM, VSM असे लिहिले जाईल. (CDS Anil Chauhan)
मात्र तुम्हाला माहिती आहे का, की त्यांच्या नावापुढे जे लिहिले जाईल ते नक्की काय आहे? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.
कोण आहेत सीडीएस अनिल चौहान?
अनिल चौहान सीमेसंदर्भात प्रकरणी तरबेज असून त्यासाठी त्यांना ओळखले जाते. अनिल चौहान हे ११ गोरखा राइफल्स मधील आहेत. त्यांनी १९८१ मध्ये भारतीय सैन्यात एन्ट्री केली होती. सैन्यात त्यांनी ४० वर्ष सेवा दिल्यानंतर ते मेजर जनरल रॅकवर होते तेव्हा त्यांनी नॉर्दन कमानच्या बारामुला सेक्टरमध्ये इन्फ्रेंट्री डिव्हिजन सांभाळले होते. त्यानंतर ते लेफ्टिनेंट जनरल झाले आणि मे २०२१ मध्ये जेव्हा निवृत्त झाले तरी ते त्याच पदावर होते.

नावाच्या पुढे असे का लिहिले जाते?
भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या नावापुढे त्यांच्या पदकांची माहिती लिहिली जाते. त्यामुळे तुम्हाला कळते की, त्यांना कोणती पदक मिळाली आहेत. हे फक्त अनिल चौहान यांच्या नावासमोरच नव्हे तर अन्य अधिकाऱ्यांच्या नावासमोर ही लिहिले जाते. (CDS Anil Chauhan)
हे देखील वाचा- व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलची बाबा वेंगाची ‘ही’ भविष्यवणी खरी झाली तर…
जाणून घ्या पदकांबद्दल अधिक
PVSM- हे आहे परम विशिष्ट सेवा मेडल. हे शांततेच्या काळात विशिष्ट सेवेसाठी दिले जाते. सेवा मेडलची कॅटेगरीमधील हे सर्वौच्च पदक आहे.
UYSM- हे आहे उत्तम युद्ध सेवा मेडल. हे वॉर टाइममध्ये दिले जाणारे खास मेडल असून जे दुसरे सर्वौच्च पदकं असल्याचे मानले जाते.
AVSM- याचा अर्थ अति विशिष्ट सेवा मेडल.हे पीस टाइममध्ये विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे सर्विस मेडल आहे. हे परम विशिष्ट सेवा मेडल नंतरचे दुसरे सर्वौच्च पदक आहे. तर अनिल चौहान यांना PVSM ने सुद्धा गौरवण्यात आले आहे.
SM- हे आहे सैन्य पदकं, सैन्यातील असाधारण सेवेसाठी या पदकाने सन्मानित केले जाते.
VSM- याचा अर्थ असा की, विशिष्ट सेवा पदकं हे पीस टाइमध्ये विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे तिसरे सर्वौच्च पदकं आहे. अनिल चौहान यांना या कॅटेगरीतील अन्य पदकं सुद्धा मिळाली आहेत.