Home » पूर्ण झोप झाली तरीही अंग का दुखते?

पूर्ण झोप झाली तरीही अंग का दुखते?

by Team Gajawaja
0 comment
Causes of body pain
Share

वेळोवेळी शरिर दुखणे आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा तिच स्थिती राहणे हे आरोग्यासाठी उत्तम नव्हे. यामागे काही कारणं असू शकतात. पुढे जाऊन हिच कारणे गंभीर आजारात रुपांतरित ही होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमची झोप पूर्ण झाली असेल तरीही अंग दुखत असेल तर डॉक्टरांना जरुर भेटा. परंतु असे नक्की का होत असेल या बद्दल आपण जाणून घेऊयात. (Causes of body pain)

बहुतांश लोकांच्या शरिरातील स्नायू हे आखडलेले असतात त्यामुळे शरिर दुऱत राहते. अशी स्थिती कधी उद्भवते जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा अधिक व्यायाम करता, आपल्या स्नांयूंवर ताण पडेल अशा काही गोष्टी करता, चुकीच्या पद्धतीने अवजड वस्तू उचलणे. त्यामुळे तुमचे शरिर दुखू शकते. या व्यतिरिक्त कोणती कारणं असू शकतात हे पाहू.

-झोपण्याची चुकीची पद्धत
झोपण्याची तुमची चुकीची पद्धत असेल तर शरिर दुखत राहते. तुम्ही पोटावर झोपणे अगदी अयोग्य आहे. ही स्थिती तुमच्या पाठीच्या मणक्यासाठी फार वाईट आहे. खासकरुन जेव्हा तुम्ही श्वास घेण्यासाठी तुमचे डोक एका बाजूला फिरवता. संपूर्ण रात्र तुमचे डोक एका बाजूलाच राहिल्याने स्नायूंवर ताण येतो आणि मान दुखण्यास सुरुवात होते.

-सुज आणि जळजळ
शरिरात सूज आल्याने दुखण्याची समस्या उद्भवू शकते. इम्युन इंफ्लेमेटरी सेल्स आणि साइटोकिन्स जे बॅक्टेरिया आणि अन्य आक्रमक एजेंटला फसवण्यासाठी एक इंफ्लेमेटरी रिअॅक्शन सुरु करतात याच कारणामुळे दुखणे, सुज येणे, दुखापत होऊ शकते. हेल्टी डाएट शरिरातील सूज कमी करण्यास मदत करु शकतो.

Causes of body pain
Causes of body pain

-अधिक वजन
जेव्हा तुम्ही सकाळी झोपून उठता तेव्हा शरिराचे अधिक वजन असल्याने तुमची बॉडी दुखते. अधिक लठ्ठपणामुळे तुमच्या मान आणि पाठीवर अतिरिक्त दबाव पडतो. त्यामुळे दुखणे सुरु होते.

-मेडिकल कंडिशन्स
वायरल इंन्फेक्शन्स, तणाव, चिंता, एनीमिया, विटामिन डी ची कमतरता, निमोनिया, थकवा.

याव्यतिरिक्त पूर्ण झोप झाल्यानंतर शरिरात दुखण्यामागील ही सुद्धा कारण असू शकतात
-क्रोनिक फटीग सिंड्रोम
झोप पूर्ण झाल्यांतर शरिरात दुखणे म्हणजे क्रोनिक फटीग सिंड्रोमचे लक्षण असू शकते. क्रोनिक फटींग सिंड्रोमच्या कारणामुळे मेंदू आणि शरिरात ताळमेळ होत नाही आणि शरिरात दुखण्यास समस्या होऊ शकते.(Causes of body pain)

-विटामिन डी ची कमतरता
विटामिन डी मुळे शरिरातीला हाडांना बळकटी मिळते. परंतु त्याची कमतरता असेल तर तुम्हाला क्रोनिक पेनची समस्या उद्भवू शकते.

-लोहाची कमतरता
संपूर्ण झोप घेतल्यानंतर ही शरिरात दुखण्याची समस्या लोहाच्या कमतरतेमुळे सुद्धा उद्भवू शकते. यामध्ये शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे थकवा येतो आणि फ्रेश ही वाटत नाही.

हे देखील वाचा- वयाच्या चाळीशीनंतर गुडघे दुखीच्या समस्येमुळे त्रस्त… ‘या’ टीप्सने हाडं बनवा मजबूत

-अधिक तणाव
अत्याधिक तणावामुळे लाइफस्टाइल डिस्टर्ब होते. यामुळे काही प्रकारचे संक्रमण होऊ शकते. सातत्याने तणावाखाली असल्याने बॉडी पेन होऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.