Caster oil benefits : सुंदर आणि चमचकदार त्वचेसाठी बहुतांशजण नैसर्गिक उपाय करतात. यामुळे त्वचा बाहेरुनच नव्हे तर आतमधूनही हेल्दी राहण्यास मदत होते. अशातच कॅस्टर ऑइलचा वापर हेल्दी स्किनसाठी केला जातो. खरंतर, कॅस्टर ऑइलमुळे पचनक्रिया सुधारणे, जखमेवर उपयुक्त आणि पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत करते. पण हेल्दी स्किनसाठी कॅस्टर ऑइलचे सेवन करत असल्यास ते किती फायदेशीर आहे याबद्दल जाणून घेऊया…
कॅस्टर ऑइल नक्की काय आहे?
कॅस्टर ऑइलमध्ये एरंडाचे तेल आहे. याचा वापर आयुर्वेदातील औषधे आणि अन्नपदार्थात केला जातो. एरंडाच्या बियांपासून तेल काढले जाते. याचा वापर प्राचीन काळापासून केसांच्या वाढीसाठी ते हेल्दी त्वचेसाठी केला जातो. कॅस्टर ऑइलचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. पण याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
कॅस्टर ऑइलचे फायदे
लॅक्सटिव्ह प्रभाव
कॅस्टर ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात लॅक्सटिव्ह असते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहता. याशिवाय आतड्यांच्या स्नायूंसाठी फायदेशीर ठरते.
मॉइश्चराइजिंग एजेंट
कॅस्टर ऑइलचे दररोज सेवन केल्यास त्वचेमध्ये ओलसरपणा निर्माण होतो. याला व्हिटॅमिन ई चा उत्तम ऑप्शन मानले जाते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.
सूज कमी होते
कॅस्टर ऑइलमुळे सूजेची समस्या कमी होते. याचा वापर अर्थराइटिस, स्नायू आणि सांधेदुखीच्या समस्येवर केला जातो.
केसांसाठी वरदान (Caster oil benefits)
कॅस्टर ऑइलचा वापर केसांसंदर्भातील समस्यांसाठी करू शकता. याच्या वापराने पातळ केसांची समस्या दूर होईल. याशिवाय केस गळती आणि केस तुटण्याची समस्याही कमी होईल.