ऐंशी-नव्वदीतला असा एकही तरुण नसेल, ज्याने कार्टून नेटवर्कवरचं भन्नाट कार्टूनविश्व अनुभवलं नसेल. आपल्या सर्वांचच बालपण खास राहिलंय, ते कार्टून नेटवर्कमुळेच ! त्यामध्ये टॉम अँड जेरीची मनोरंजक भांडण असो वा Courage The Cowardly Dog मधल्या गुलाबी कुत्र्याच्या भेकड कथा असो Cartoon Network वर येणारा प्रत्येक कार्यक्रम वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करत राहीला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून RIP कार्टून नेटवर्क असं ट्रेंड होत आहे. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की, आपलं बालपण जगवणारं कार्टून नेटवर्क खरच बंद होतंय का की हे फक्त अफवा आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणारं #RIPCartoonNetwork नक्की आहे तरी काय ? (Cartoon Network)
ऐंशी-नव्वदीतला असा एकही तरुण नसेल, ज्याने कार्टून नेटवर्कवरचं भन्नाट कार्टून अनुभवलं नसेल. आपल्या सर्वांचच बालपण खास राहिलंय, ते कार्टून नेटवर्कमुळेच ! आजही आपण मित्रमंडळी एकत्र भेटलो आणि कार्टून नेटवर्कचा विषय निघाला की तासन तास आपल्या गप्प रंगतात. पॉपायचं पालक खाणं असो, डेकस्टरची लॅब असो, पावरपफ गर्ल्सची ताकद असो, टॉम अँड जेरीची मनोरंजक भांडण असो वा Courage The Cowardly Dog मधल्या गुलाबी कुत्र्याच्या भेकड कथा ! Cartoon Network वर येणारा प्रत्येक कार्यक्रम वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करत राहीला आहे. (Cartoon Network)
कार्टून च्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेश आणि माहिती पोहचवण्याच काम cartoon network ने केलय. ९० च्या दशकापासून ते आतापर्यंत अनेक पिढ्यांवर माहितीपूर्ण मनोरंजन बघण्याचे संस्कार cartoon network केलेत असं म्हंटलं तरी वावग ठरणार नाही. पण हेच cartoon network आता बंद होणारे अशी बातमी आहे. त्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर ट्रेंड होणारं #RIPCartoonNetwork. इतके वर्ष आपलं मनोरंजन करणार cartoon network खरच बंद होणारे का?
Cartoon network ची सुरवात १ ऑक्टोबर १९९२ ला टेड टर्नर यांनी केली. कार्टूनसाठी आणि लहानमुलांसाठी एक स्वतंत्र चॅनल असाव म्हणून ते सुरू केल गेलं आणि बघता बघता अमेरिकेत या चॅनलने अक्षरश: धुमाकूळ घातला. भारतात १ मे १९९५ ला Cartoon network केबल टीव्हीच्या मध्यमातून प्रसारित झालं आणि लगेच लोकप्रिय बनलं. कार्टून नेटवर्कने भारतात अनेक लोकप्रिय कार्यक्रम आणले. द फ्लिंटस्टोन्स, सुपरमॅन, स्कूबी-डू, आणि टॉम अँड जेरी हे त्यातील काही प्रमुख कार्यक्रम होते. या कार्यक्रमांनी लहान मुलांच्या मनावर गोड आठवणींचा ठसा उमटवला. (Cartoon Network)
डिजिटल युगात, कार्टून नेटवर्कने आपली उपस्थिती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वाढवली. यूट्यूब आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध झाले. आजही कार्टून नेटवर्क भारतात मुलांच्या मनोरंजनाच एक महत्त्वपूर्ण साधन आहे. बेन 10, क्रिश आणि अमेजिंग वर्ल्ड ऑफ गंबाल हे कार्यक्रम लहानग्या प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. पण अचानक सोशल मीडियावर #RIPCartoonNetwork ट्रेंड व्हायला लागलं आहे.
Animation Workers Ignited या अकाऊंट वरुन एक पोस्ट X या माध्यमावर टाकण्यात आली. ज्यामध्ये लिहिलं होतं की “कार्टून नेटवर्क बंद होत आहे, अॅनिमेशनसाठी काय धोक्यात आहे, याबद्दलचा संदेश पसरवूया. #rip cartoon network लिहून तुमचा आवडता कार्टून नेटवर्क शो ट्वीट करा”. या पोस्ट सोबत एक व्हिडिओ देखील attach होती त्यातून हे म्हणल जात होत की कार्टून नेटवर्क बंद होत आहे. कारण मार्केट मध्ये नवीन अॅनिमेशन स्टुडिओ आले आहेत. (Cartoon Network)
============================
हे देखील वाचा : ‘या’ दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होणार…
============================
त्यामुळे कार्टून नेटवर्क ने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलय. स्टुडिओचे सुरू असलेले अनेक प्रोजेक्ट्स बंद केले गेले आहेत. म्हणून कंपनीने काहीजणांना काढून टाकलं. अॅनिमेशन इंडस्ट्री मध्ये वाढत जाणारी स्पर्धा आणि ही इंडस्ट्री कीती आव्हानांना सामोरं जात आहे, हे दर्शवण्यासाठीच हे ट्वीट होतं. पण Cartoon Network पाहणारे किंवा एकेकाळी हे चॅनेल पाहत असणारे fans भावुक झाले आणि आपल्या आवडत्या शोबद्दल ट्वीट करून कार्टून नेटवर्क बंद होणार ही बातमी त्यांनी पसरवली, जी मुळातच चूक होती.
Cartoon network या चॅनेलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे की, कार्टून नेटवर्क किंवा स्टुडिओ बंद होत असल्याच्या बातमीत कोणतही तथ्य नाही. आम्ही जगभरातील आमच्या प्रेक्षकांचं असच मनोरंजन करत राहू. त्यामुळे कार्टून नेटवर्क तर बंद होतं नाहीये, पण या बातमीचा फायदा असा झाला की अनेकांना त्यांच्या लहानपणीच्या आवडत्या कार्टून्सच्या आठवणी जाग्या झाल्या. कार्टून नेटवर्कने प्रेक्षकांच्या मनात एक अमूल्य स्थान निर्माण केले आहे. आजही हे दोन पिढ्यांसाठी आवडतं चॅनेल आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. (Cartoon Network)