62
बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की बहुतेक लोक सकाळी पार्क किंवा जिममधून परतल्यानंतर काही ज्यूस चे सेवन करतात. ज्यात गाजर , बीट तसेच अगदी कारल्याचा रस ही सकाळी घेणे पसंत करतात. अर्थात त्याच कारण निरोगी राहण्यासाठी रस महत्त्वाची भूमिका बजावतो.असाच एक आरोग्यदायी रस म्हणजे गाजर. गजराचा केवळ रंगच आकर्षित करणारा नाहीये तर त्याचे फायदे ही खुप आहेत. गाजरात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि लोह यासारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असतात. जर तुम्हीही गाजर खाण्याच्या फायद्यांचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की गाजर खाल्ल्याने शरीराला पोषक तत्व तर मिळतातच, शिवाय अनेक शारीरिक आजारांपासून ही बचाव होऊ शकतो. गाजराच्या रसात ऊर्जा, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.आजच्या लेखात आपण गाजर ज्यूस पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.(Carrot Juice Health Benefits)

Carrot Juice Health Benefits
*सकाळी गाजर ज्यूस पिण्याचे फायदे*
– गाजराचा रस अँटीऑक्सिडंट्स वाढवून हृदयाच्या कार्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच गाजराचा रस गरोदरपणात आवश्यक वजन वाढवण्याचे काम करू शकतो. हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील ओळखले जाते. इतकंच नाही तर यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं.
– जेव्हा जेव्हा आपण आरोग्याच्या गुणधर्मांबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यांसाठी गाजराचे नाव सर्वात आधी येते. गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ज्यांना दूरच्या गोष्टी दिसत नाहीत त्यांच्यासाठी गाजराचे सेवन खूप फायदेशीर आहे, शिवाय गाजरात असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांचे मोतीबिंदू पासून संरक्षण करते.
– आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी चयापचय प्रणाली निरोगी असणे महत्वाचे आहे. गाजराचा रस प्यायल्याने तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळते तसेच कॅलरीजही खूप कमी असतात. चयापचय शरीरातील अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करते. गाजराच्या रसामुळे पित्ताचा स्राव वाढतो ज्यामुळे चयापचय दर वाढू शकतो.

Carrot Juice Health Benefits
– मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही गाजराच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.काही संशोधनात असे दिसून आले आहे की, याच्या रसात अँटी डायबेटिक गुणधर्म आहेत जे रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करण्याचे काम करतात. गाजराच्या रसात असलेले मॅग्नेशियम, कॅरोटीनोईड्स आणि मॅंगनीज सारखे घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि मधुमेहाची समस्या दूर करतात.
– आई होण्याआधी गरोदरपणात आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. गाजराच्या रसाचेही या काळात फायदे असतात, त्यामुळे त्याचा आहारात समावेश करता येतो. असे म्हटले जाते की, गाजराचा रस गरोदरपणात मधुमेहापासून बचाव करू शकतो तसेच या काळात महिलेचे वजन योग्य असणे महत्वाचे आहे, त्यामुळे ज्यांचे गरोदरपणात वजन कमी होते , त्यांना डॉक्टर गाजराचा रस पिण्याचा सल्ला देऊ शकतात. यासाठी रसामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन फायदेशीर मानले जाते.
– तोंड निरोगी ठेवण्यासाठी गाजराचा वापर करता येतो आणि त्यात असलेले व्हिटॅमिन-ए येथे प्रभावी ठरू शकते. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की व्हिटॅमिन-ए पीरियडॉन्टल आरोग्य राखण्यास मदत करू शकते. या पोषक तत्वांनी समृद्ध गाजराचा रस त्वचेला आवश्यक पोषण देण्याचे, त्वचेचा रंग सुधारण्याचे, वृद्धत्वाची समस्या दूर करण्याचे आणि चेहऱ्याची चमक वाढविण्याचे काम करतो. त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण नियमितपणे एक ग्लास गाजराच्या रसाचे सेवन केले पाहिजे.
===========================
===========================
– धूम्रपान करणाऱ्यांना सहसा एम्फिसीमाचा धोका असतो. म्हणूनच धूम्रपान करणार्यांना गाजराचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो कारण ते व्हिटॅमिन ए समृद्ध असते. हे फुफ्फुसांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि धूम्रपान करण्याच्या वाईट दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे.
– केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी गाजराच्या रसाचे सेवन देखील केले जाऊ शकते. याचा रस केसांना आवश्यक पोषण पुरवतो. यामध्ये असलेले पोषक घटक केसांना दाट, मजबूत आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. तसेच याचे नियमित सेवन केल्याने केस गळण्याच्या समस्येला आळा बसण्याचे ही काम होते.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.)