Career Tips- बदलत्या काळानुसार आता विद्यार्थी परदेशी भाषांमध्ये आपले करियर करण्याकडे वळताना दिसून येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर फक्त त्या विषयाचा अभ्यासच नव्हे तर काही कौशल्ये सुद्धा तुम्हाला आत्मसात करावी लागणार आहेत. कारण हिच कौशल्ये तुम्हाला परदेशातील भाषांमध्ये करियर करण्यासाठी फायद्याची ठरतील. तर सध्या आपल्या मातृभाषेसह तुम्हाला कोणती अन्य दुसरी भाषा येते याला सुद्धा फार महत्व दिले जाते. खासकरुन नोकरीच्या ठिकाणी याबद्दल आवर्जुन विचारले जाते. तर जाणून घेऊयात परदेशी भाषांमध्ये करियर करायचे असेल कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
करियरमध्ये एका स्तरापर्यंत पोहचण्यासाठी सुद्धा तुम्हाला या परदेशातील भाषांची कौशल्ये कामी येऊ शकतात. त्याचसोबत या क्षेत्रातील सध्या बहुतांश कोर्सेस हे ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतले जातात. मात्र तुमची कौशल्ये उत्तम असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये यशस्वी होऊ शकता.
तुमच्या उच्चारावर काम करा
परदेशी भाषांमध्ये करियर करायचे असेल तर तुमचा त्या संबंधित भाषेतील उच्चारावर तुमची कमांड असली पाहिजे. जर तुमचा उच्चार उत्तम आणि स्पष्ट असेल तर तुम्ही अधिकाधिक लोकांसोबत खुल्यापणाने बातचीत करु शकता. या कौशल्यासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी नियमित जी परदेशी भाषा शिकण्याचे ठरवले आहे त्याचा सराव करा.
स्वत:ला ती भाषा समजतेय का हे पहा
तुम्ही जी परदेशी भाषा शिकण्याचा विचार केला आहे ती शिकताना तुम्हाला स्वत: ला समजेतय का हे सुद्धा पहा. कारण जर तुम्हाला त्यामध्ये शिकून सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर त्यावर अधिक लक्ष द्या. त्याचसोबत जर तुम्ही उत्तम पद्धतीने ती भाषा बोलण्यास किंवा लिहिण्यास शिकल्यास त्याचा तुम्हाला करियरमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो.
लगेच विचार करण्याची कला
परदेशी भाषांमध्ये करियर करायचे असेल तर तुम्हाला लगेच एखाद्या गोष्टीबद्दल विचार करता आले पाहिजे. कारण कोणतीही समस्या आल्यास त्यावर तुम्हाला तोडगा काढायला सांगितल्यास तर त्या भाषेतूनच तुम्हाला तो काढावा लागले. त्यामुळे या कौशल्यावर अधिक लक्ष द्या.(Career Tips)
हे देखील वाचा- परदेशी भाषा शिकणे ठरेल तुमच्या करियरचा बेस्ट पर्याय
तुमचा हावभाव सुद्धा फार महत्वाचा
परदेशी भाषा शिकताना किंवा शिकल्यानंतर ही जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा तुमच्या चेहऱ्यासह अन्य हावभाव सुद्धा फार महत्वाचे असतात. कारण तुम्ही किती स्पष्टपणे आणि ठामपणे ती भाषा बोलत आहात ते तुमच्या हावभावांमधून दिसून येते. परंतु नेहमीच हावभाव हे सौम्य पद्धतीचे असू द्या.
व्याकरणावर काम करा
कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्याच्या व्याकरणावर तुमची पकड असली पाहिजे. फक्त भाषा शिकणे हे पुरेसे नव्हे. तर त्या भाषेतील व्याकरण आणि भाषांचा उच्चार हा व्यवस्थितीत करता येणे फार महत्वाचे आहे.