नुकतेच १० वी आणि १२ वी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अशातच १० वी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यासह पालकाला पडला असेल. तसेच आपल्याला चांगले गुण मिळालेत पण आपल्याला हवं तसं महाविद्यालयात प्रवेश मिळेल का असे विविध प्रश्न आता एसएससी पास झालेल्यांना पडला असेल. मात्र दुसऱ्या बाजूला १२ वी बोर्डाची परिक्षा पास झालेल्यांना आता आपण कोणत्या क्षेत्रात करियर करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे चिंता करु नका कारण आम्ही तुम्हाला १२ वी नंतर करिरसाठी सध्या कोणते बेस्ट पर्याय आहेत त्याबद्दलच अधिक माहिती देणार आहोत.(Career Options)
-पब्लिक रिलेशन (Public Relations)
डिजिटल मार्केटिंगच्या सध्याच्या काळात प्रत्येकजण पुढे जाऊ पाहत आहे. त्यामुळेच मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा पाहता कंपन्यांकडून पब्लिक रिलेशन एक्सपर्टची निवड केली जात आहे. समाजात आपल्या कंपनीबद्दल किंवा कामाबद्दल ओळख कशी अधिक काळ टिकून राहिल यासंदर्भातच कामे पब्लिक रिलेशन प्रोफेशनल काम करतो. बडे बडे सेलिब्रेटी, उद्योगपती किंवा राजकिय नेते सुद्धा पब्लिक रिलेशन प्रोफेशनलच्या मदतीने काही निर्णय घेतात. त्यामुळे या क्षेत्रात तुम्हाला यायचे असेल तर तुमचे बोलणे फार महत्वाचे आहे. आपले विचार इतरांपर्यंत आपण किती ठामपणे मांडतो आणि त्यांना पटवून देतो हे पब्लिक रिलेशन प्रोफेशनलची जबाबदारी असते.
-आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence)
कोरोनानंतर संपूर्ण जगभरासह भारतात ही आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर खुप प्रमाणात वाढला आहे. सध्या तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर केला जात आहे. हेच तंत्रज्ञान आपल्या कंप्युटर किंवा फोन मध्ये उपलब्ध आहे. जसे एखादा मोबाईल मधील खेळ, गुगल, अॅलेक्सासह रोबोटसारखी डिवाइस आपल्याला उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे जगातील सर्वाधिक श्रेष्ठ तंत्रज्ञानापैकी एक आहे. याच्या माध्यमातून सिस्टिम तयार करता येते. जी मानवाच्या बुद्धिमत्तेसमान असते.
हे देखील वाचा- Agneepath Scheme: भारतीय सैन्यात करिअरची सुवर्णसंधी! सरकारची नवीन ‘अग्निपथ’ योजना
-फोटोग्राफी (Photography)
बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा आपले करियर हटके असण्याकडे असतो. अशातच फोटोग्राफी ऑप्शन ही काहीजण करियर म्हणून निवडतात. यापूर्वीच्या तुलनेत सध्या फोटोग्राफीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासंदर्भातील विविध कोर्सेस ही विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आले आहेत. फोटोग्राफी सध्या एक ग्लॅमरस करियर ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर फोटोग्राफी मध्ये आवड असेल तर नक्कीच ते तुमचे प्रोफेशन म्हणून निवडा.(Career Options)
-रिस्क मॅनेजर (Risk Manager)
रिस्क मॅनेजर हे सध्याच्या काळातील बेस्ट करियर ऑप्शन आहे. कारण कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी अॅनालिसिस स्किल असणे फार महत्वाचे असते. त्याचसोबत मॅनेजमेंट आणि संभाषण कौशल्य ही यामध्ये फार कामी येते. रिस्क मॅनेजर हा प्रामुख्याने कंपनीला कोणत्याही परिस्थितीतून कसे बाहेर काढायचे हे असते. त्यामुळे तुमच्यात सुद्धा एखादी परिस्थिती व्यवस्थितीत हाताळून त्यावर ठोस काढण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही रिक्स मॅनेजमेंटचा करियर म्हणून विचार करु शकता.