Home » पाकिस्तानला ‘या’ कारणास्तव भासली केअरटेकर सरकारची गरज

पाकिस्तानला ‘या’ कारणास्तव भासली केअरटेकर सरकारची गरज

पाकिस्तानात नॅशनल असेंबलीचा कार्यकाळ संपल्यानंतर आता तेथील राष्ट्रपती आरिफ अलवी यांनी अनवार उल हक काकर यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवले आहे.

by Team Gajawaja
0 comment
Care Taker govt
Share

पाकिस्तानात नॅशनल असेंबलीचा कार्यकाळ संपल्यानंतर आता तेथील राष्ट्रपती आरिफ अलवी यांनी अनवार उल हक काकर यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवले आहे. काकर यांनी १४ ऑगस्टला शपत घेतली. तर पाक असेंबलीचा कार्यकाळ १२ ऑगस्टला संपला होता. योगायोग असा की, काळजीवाहू पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीच शपथ घेतली. निवडणूका होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान आपले कार्य पार पाडणार आहेत. (Care taker govt)

माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि राजा रियाज यांनी त्यांच्या नावाची निवड केली. तसेच राष्ट्रपतींकडे शिफारसीसाठी त्यांचे नाव पाठवले गेले. ही दुसरी वेळ असेल जेव्हा नॅशनल असेंबलीने आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. यापूर्वी २०१३-२०१८ पर्यंत नॅशलन असेंबलीने आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाकिस्तानचे सरकार जो पर्यंत हवे तो पर्यंत सरकार चालवते, अथवा कधीकधी जनरल स्वत: सत्तेवर ताबा मिळवतात किंवा आपल्याच एखाद्या व्यक्तीला सत्तेच्या खुर्चीवर बसवतात. नुकतीच झालेली नियुक्ती सुद्धा सैन्याच्या सहमतीने झाल्याचे सांगितले जाते.

केयरटेकर सरकार म्हणजे काय?
निवडणूका होणार आहेत तर काळजीवाहू पंतप्रधानांची का गरज भासली असा येथे प्रश्न उपस्थितीत होतो. खरंतर पाकिस्तानात सार्वत्रिक निवडूका प्रॉसेस नॅशनल असेंबलीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सुरु होण्याचा नियम आहे. तर भारतात लोकभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूकीची प्रक्रिया सुरु होते आणि जो पर्यंत लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होतो तेव्हा नवे सरकार स्थापन होते. जगातील अनेक लोकशाही देशांमध्ये भारताप्रमाणेच निवडणूका होतात. परंतु पाकिस्तानात निवडणुक आयोग तेव्हाच अॅक्टिव्ह होते जेव्हा संसद भंग केली जाते.

त्यानंतर ६०-९० दिवसाच्या आतमध्ये निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रावधान आहे. आता जोपर्यंत निवडणूका लागत नाहीत तो पर्यंत काळजीवाहू सरकारच देश चालवणार आहे. यालाच केअरटेकर सरकार असे सुद्धा म्हटले जाते. अशी अपेक्षा केली जात आहे की, पाकिस्तानात यंदा निवडूका उशिराने होणार आहेत. कारण परिसीमनचे काम चालू आहे. अशी शक्यता आहे की, निवडणूका २०२४ मध्ये होऊ शकतात. नव्या सरकारची जबाबदारी असणार आहे की, निवडणूकीचे काम निष्पक्ष असावे. (Care taker govt)

हेही वाचा- पाकिस्तानातील असे हुकूमशाह जे नेहमीच भारताविरोधात कट रचायचे

पाकिस्तानातील नवे काळजीवाहू पंतप्रधान यांचे वय ५२ वर्ष आहे. त्यांनी बलूचिस्तान युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स डिग्री पूर्ण केली आहे. ते बलूचिस्तान मधील अवामी पार्टीचे को-फाउंडर आहेत. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात शिक्षकी पेशापासून सुरु केली होती. ते गावातील एका शाळेत शिकवायचे. त्यांचा राजकीय प्रवास शानदार असल्याचे म्हणू शकतो. कारण २००८ मध्ये राजकरणात आल्यानंतर अनवार उल हक आतापर्यंत एकदा पीएम म्हणून निवडले गेलेत आणि आता पाकिस्तानातील काळजीवाहू पंतप्रधान झाले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.