Home » वयाच्या 60 व्या वर्षानंतर कार्डिओ एक्सरसाइज करणे किती सुरक्षित?

वयाच्या 60 व्या वर्षानंतर कार्डिओ एक्सरसाइज करणे किती सुरक्षित?

by Team Gajawaja
0 comment
cardio exercise
Share

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज करणे फायदेशीर मानले जाते. कारण ही एक्सरसाइज करताना तुमच्या संपूर्ण शरिराची हालचाल होत राहते. परंतु एका मर्यादित वयानंतर कार्डिओ एक्सरसाइज करणे मुश्किल होते. खरंतर वयाच्या ६० वर्षानंतर कार्डिओ एक्सरसाइज करणे फारसे झेपत नाही.अशातच असा प्रश्न उपस्थितीत होते की, या वयात सुद्धा कार्डिओ एक्सरसाइज केली पाहिजे का? काही लोक ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि एक्सरसाइज करणे बंद करतात. मात्र वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करु शकता की नाही याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Cardio Exercise)

कार्डिओ एक्सरसाइजमध्ये आपण जसे पाहिले की, संपूर्ण शरिराची हालचाल होतेच. पण त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत ही घ्यावी लागते. परंतु वयाच्या ६० व्या वर्षी ही तुम्ही एक्सरसाइज करणे मुश्किल होते. या वयात कार्डिओ एक्सरसाइज करणे धोकादायक ठरु शकते. डॉक्टर या वयातील लोकांना अशी एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात ज्यामुळे हृदयाचे ठोके लगेच वाढले जाणार नाहीत किंवा थकवा जाणवणार नाही.

-दिवसातून दोन वेळा वॉकला जा
कार्डिओ एक्सरसाइजसाठी तुम्ही ट्रेडमिलचा वापर करु शकता. परंतु यासाठी काही मर्यादित वेळ ठरवा. कारण वयाच्या ६० व्या वर्षानंतर श्वास घेण्यास अधिक समस्या उद्भवली जाते. त्यामुळे ट्रेडमिलवर केवळ वॉक करा. दिवसातून दोन वेळा तरी वॉक करा. जर तुमच्या घराजवळ एखादे गार्डन किंवा पार्क असेल तेथे वॉकला जा.

-पायऱ्या चढणे
जर तुम्हाला हृदयासंबंधित आजार किंवा दमा नसेल तर तुम्ही हळूहळू दररोज पायऱ्या चढा. यामुळे तुमच्या संपूर्म शरिरावर प्रभाव पडेल. तुमची स्ट्रेथ सुद्धा सुधारली जाईल. तुमच्या या स्थितीकडे वारंवार लक्ष ठेवा. जर एखादी समस्या उद्भवली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Cardio Exercise)

-स्ट्रेचिंग करणे
तुम्ही कार्डिओ ऐवजी स्ट्रेचिंगवर लक्ष द्या. आपले हात-पाय ठणठणीत रहावेत म्हणून दररोज सकाळी स्ट्रेचिंग करा. ही एक अशी गोष्ट आहे, ती तुम्ही घरी सुद्धा करु शकता. दररोज विविध मसल्ससाठी स्ट्रेचिंग करा. यामुळे तुमचे हात-पाय फिट राहतील.

हेही वाचा- थायरॉईडची समस्या असणाऱ्यांनी आजपासूनच करा ‘या’ गोष्टींचे सेवन !

-स्विमिंग सुद्धा फायदेशीर
वयाच्या ६० व्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही स्विमिंग करु शकता. दररोज अर्धा तास जरी स्विमिंग केले तरीही तुम्ही फिट राहू शकता. केवळ स्विमिंग करताना वेगाने पोहू नका. आपल्या क्षमतेनुसार स्विमिंग करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.