Cardamom Water Benefits : हिरवी वेलीची केवळ पदार्थांचीच चव वाढवत नाही तर आरोग्याला देखील काही प्रकारे फायदेशीर ठरते. या वेलचीमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. खरंतर, बहुतांशजण हिरवी वेलची जेवणानंतर माउथ फ्रेशनरच्या रुपात खातात. याचे दररोज सेवन करणे आरोग्यासाठी हेल्दी ठरू शकते. तुम्ही दररोज एक हिरवी वेलची खाऊ शकता. एवढेच नव्हे वेलची चावून खाण्यासह त्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. तुम्हाला हेल्दी, ग्लोइंग स्किनसाठी वेलचीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे
-वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेलचीचे पाणी पिऊ शकता. यामधील काही पोषण तत्त्वे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासह कॅलरीजही बर्न करतात. वेलचीचे पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि ओव्हर इटिंगच्या समस्येपासून दूर राहता.
-वेलचीचे पाणी प्यायल्याने त्वचेला फायदा होता. यामधील अँटीबॅक्टेरियल तत्त्वे एक्ने, पिंपल्सची समस्या दूर ठेवतात. ब्रेकआउटची समस्या कमी होते. त्वचा स्वच्छ होते. याशिवाय पाणी शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर काढतात. यामुळे अॅलर्जीच्या समस्येपासून दूर राहता. त्वचेवर ग्लो आणि चमक येते.
-पचनासंबंधित समस्या असल्यास किंवा पोट स्वच्छ होत नसल्यास वेलचीचे पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय पोटात जळजळ, अपचन, आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता अशा पोटासंबंधित समस्याही दूर होतात.
-तोंडातून दुर्गंधी येत असल्यास वेलचीच्या पाण्याचे सेवन करू शकता. याशिवाय दातांसंदर्भात समस्याही वेलचीच्या पाण्यांमुळे आराम देतात.
-वेलचीच्या पाण्यामध्ये पोटॅशियम, अँटीऑक्सिडेंट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. अँटीऑक्सिडेंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणारे नुकसान कमी करते आणि हृदयासंबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत करते. वेलचीमध्ये अँटी-अँटीइंफ्लेमेंटरी तत्त्वेही असतात. जे इंफ्लेमेशन कमी करतात. यामुळे हार्ट डिजीज होण्याचा धोका कमी होते. याशिवाय उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.(Cardamom Water Benefits)
-मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास वेलचीचे पाणी फायदेशीर ठरते. याशिवाय वजन कमी देखील होण्यास मदत होते. मेटाबॉलिज्म अॅक्टिव्ह असल्यास शरीरातील कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करायचे असल्यास वेलचीचे पाणी नॅच्युरल ड्रिंक्सच्या रुपात पिऊ शकता.
=================================================================================================
हेही वाचा :
Urine Therapy : सगळीकडे चर्चेत असलेली युरीन थेरपी म्हणजे काय?
High Heels : हाय हिल्स वापरणे म्हणजे ‘या’ आजारांना आमंत्रण देणे
===================================================================================================
असे प्या वेलचीचे पाणी
सर्वप्रथम 2-3 हिरव्या वेलची घ्या. याची पावडर तयार करून घ्या. यानंतर पाण्यात पावडर मिक्स करुन रात्रभर ठेवा. सकाळी उठळल्यानंतर उपाशी पोटी वेलचीचे पाणी प्या.