जर तुम्हाला आणखी एखादे नवं घरं खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पासून बचाव करु पाहत आहात? तर कॅपिटल गेन्स अकाउंट स्किम अत्यंत फायदेशीर ठरु शकते. या खात्यात रक्कम ठेवल्यास तुम्हाला फक्त लाभच नव्हे तर मोठ्या रक्कमेचा टॅक्स भरण्यापासून सुद्धा दिलासा मिळू शकतो. त्याचसोबत जमलेल्या रक्कमेवर व्याजाची रक्कम सुद्धा योग्य मिळते. खरंतर कॅपिटल गेन्स अकाउंट स्किमला मुख्य रुपात लोकांना संपत्ती विक्री करुन झालेल्या लाभाला अन्य कोणत्याही असेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आहे. (Capital Gains Account Scheme)
लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स काय आहे?
भांडवली संपत्तीचे हस्तांतरण झाल्यानंतर होण्याऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन अंतर्गत आणले जाते. ज्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असे म्हटले जाते. यामध्ये शेअर मार्केट, घर, संपत्ती, दागिने, कार, बँक एफडी, एनपीएस आणि बॉन्डच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल टॅक्स द्यावा लागतो.

हे देखील वाचा- दुर्लभ गुलाबी हिऱ्याची तब्बल ४८० कोटींना लिलावात विक्री, का आहे हा हिरा एवढा महाग?
कॅपिटल गेन अकाउंट स्किमचा काय होतो फायदा?
कॅपिटल गेन अकाउंट स्किमच्या माध्यमातून शेअर, बॉन्ड, म्युचअल फंड्स आणि दागिन्यांची विक्री करुन होणाऱ्या लाभाला पुन्हा गुंतवणूक करण्याची सुविधा देते. कॅपिटल गेन अकाउंट स्किम तुम्हाला शेअर, बॉन्ड, डेट किंवा इक्विटी म्युचअल फंड आणि सोने किंवा हिऱ्याचे आभूषण विक्री करताना जमा करुन झालेला लाभ ट्रांन्सफर करायचा असतो आणि यामुळे तुम्हाला टॅक्समध्ये जवळजवळ १०-२० टक्क्यांनी कपात करण्यास मदत मिळू शकते. (Capital Gains Account Scheme)
हैदराबादच्या एका व्यवसायिकाने नाव न छापण्याच्या एका अटीवर मनीकंट्रोलला सांगितले की, त्यांनी आपल्याच कंपनीच्या शेअरची विक्री करन ३२ कोटी रुपये कमावले होते. त्यासाठी सीजीएएसमध्ये पुर्ण रक्कम वाचवली आणि एका वर्षानंतर २५ कोटी रुपयांमध्ये एक घरं खरेदी केली. संपूर्ण ३२ कोटी रुपयांऐवजी केवळ ७ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम टॅक्ससाठी होती.
Capital Gains Account Scheme संदर्भात खास गोष्टी
-या स्किममध्ये दोन प्रकारचे खाते सुरु केले जातात. टाइप ए सेविंग डिपॉझिट आणि टाइप बी टर्म डिपॉझिट.
-आपले खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रांन्सफर केले जाऊ शकते. मात्र एक ही बँकेच्या अन्य शाखेत ते ट्रांन्सफर करता येते.
-हे खाते सुरु करण्याची सुविधा बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध नसते. जसे की, देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआयच्या ग्रामीण शाखेत या योजनेअंतर्गत खाते सुरु करु शकत नाहीत.