आपण रेल्वेच्या माध्यमातून खुप वेळा प्रवास करतो. मात्र रेल्वेच्या प्रत्येक डब्ब्यांमध्ये काही ना काही तरी सुचना, कॅमेरे, लाइट्स किंवा पंखे ही लावले दिसून येतात. अशातच तुम्ही कधी रेल्वेच्या डब्ब्यांमधील वरच्या बाजूला पाहिल्यास तर आपल्याला लहान भोकं असलेले गोलाकार दिसतात. पण ते का करत असतील याचा आपण कधीच विचार करत नाही किंवा लक्ष ही देत नाहीत. मात्र त्या गोलाकार झाकणांमागील काही कारण सुद्धा आहे. तर याच बद्दल अधिक जाणून घेऊयात अधिक. (Cap roof ventilator)
ट्रेनच्या छतावर लावलेल्या गोलाकार झाकणांना कॅप रुफ वेंटिलेटर असे म्हटले जाते. ते ट्रेनच्या वेंटिलेशनमध्ये मुख्य भुमिका बजावतात. जर ते लावलेच नाहीत तर ट्रेनमध्ये आगीचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांपासून दूर राहण्यासाठी ते ट्रेनमध्ये लावले जातात. आता हे रुफ वेंटिलेंटर कसे काम करतात ते पाहूयात.
ट्रेनचे एसी कोच हे पूर्णपणे बंद असतात. अशातच त्यांच्या खिडक्याही पूर्णपणे पॅक असल्याने तेथून हवा येतजात नाही. अशातच गरम हवा बाहेर जाण्यासाठी जागा नसते. मात्र सातत्याने गरम हवा भरली गेली तर आग लागण्याची शक्यता असते. अशातच कॅम्प रुफ वेंटिलेटर ट्रेनमध्ये तापमानाचे संतुलन बनवण्याचे काम करतो.
तर ट्रेनच्या कंम्पार्टमेंचे तापमान नियंत्रित करण्यासाठी छतावर भोक असलेली प्लेट लावलेली असते. अशातच यामधून डब्ब्यामधील गरम हवा बाहेर फेकली जाते. यामुळे लोकांना होणारे गरम यापासून दिलासा मिळतो. फक्त एसीच नव्हे तर ट्रेनच्या अन्य डब्ब्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे भोक असलेली प्लेट लावली जाते. मात्र एसी डब्ब्यातील त्याचे असणे फार महत्वाचे असते. (Cap roof ventilator)
हे देखील वाचा- भारतातील ‘हे’ आहे गुपित बेट, जो कोणी गेला त्याबद्दल आली आहे अशी बातमी
ते अशा प्रकारे डिझाइन केले जाते की, पावसाळ्याच्या दरम्यान सुद्धा यामधील हवेचे वेंटिलेशन होत राहिल. तसेच पाणी त्यामधून आतमध्ये शिरणार नाही. यासाठी त्याला एक झाकणं ही लावले जाते. जेणेकरुन पावसाळ्यादरम्यान सुद्धा कोचच्या आतमधील गरम हवा या छताच्या प्लेटच्या माध्यमातून बाहेर जाईल.
या व्यतिरिक्त प्रवाशांच्या डब्ब्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तर एक साखळी दिली गेलेली असते. ही साखळी खेचल्यानंतर रेल्वे चालक गाडी थांबवण्याचे संकेत मिळतात. परंतु विनाकारण साखळी खेचल्यास असे करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई तर केलीच जाते. पण काही वेळेस तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावली जाऊ शकते.