पृथ्वीवर अशा काही गोष्टी अस्तित्वात आहेत ज्यावर पटकन विश्वास ठेवणे दूरच पण लोक आपल्यालाच वेड्यात काढतील. कारण मॅजिकल गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवत नाहीत. परंतु निसर्गाची देणगी म्हणावी की देवाचे वरदान अशा काही गोष्टींना मिळाल्याचे मात्र नक्कीच बोलले जाते. अशातच कोलंबियातील अशी नदी जिथे पंचरंगी नदी तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल. कॅनो क्रिस्टल (Cano Cristales) असे नदीचे नाव असून येथे पंचरंगांचे मिलन दिसून येते.
कॅनो क्रिस्टल नदीच्या सुंदरतेमुळे तिला दैवीय बगीचा असे ही म्हटले जाते. ही नदी फक्त कोलंबियातील नागरिकांसाठी नव्हे तर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू आहे. खरंतर नदीचे पाणी हे पिवळ्या, हिरव्या, निळ्या, लाल, काळे आणि निळ्या अशा विविध रंगांनी वाहते. पंचरंगी पाण्यामुळेच या नदीला रिव्हर ऑफ फाइव्ह कलर्स असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त नदीच्या पाण्याला लिक्विड रेनबो (Liquid Rainbow) असे ही म्हणतात.
हे देखील वाचा- गोकर्ण मधील धार्मिक महत्व असलेली ‘ही’ प्राचीन मंदिर

नदी पाहिल्यानंतर असे वाटते की, एखाद्या चित्रासाठी पॅलेटमधील रंग वाहत आहेत. या नदीला जगातील सर्वाधिक सुंदर नदी म्हणून संबोधले जाते. याचे रुप पाहण्यासाठी जून ते नोव्हेंबर दरम्यान जगभरातून पर्यटक हे कोलंबियात येतात. नदीत येणारी खास झाडं मॅकेरेनिया क्लेविगरांमुळे असे वाटते की, संपूर्ण नदी ही रंगांनी भरली आहे. पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की पाणी लाल रंगाचे होते. तर सुर्यप्रकाशाच्या उजेडानुसार झाडांच्या विविध छटा या पाण्यात निर्माण होतात.
कॅनो क्रिस्टल नदीला भेट देण्यासाठी खुप पर्यटक येत जरी असले तरीही काही नियम ही तयार करण्यात आले आहेत.त्यानुसार येथे एका ग्रुपमध्ये ७ पेक्षा अधिक लोक येथे येऊ शकत नाहत. तसेच एकाच दिवसात २०० हून अधिक लोकांना या क्षेत्रात जाण्यास परवानगी मिळते. या नदीत कोणत्याही प्रकारचे मासे किंवा अन्य कोणतेही जल जीव आढळतात. त्यामुळे पर्यटकांना मुक्तपणे या नदीत स्विमिंग करण्याचा आनंद लुटता येतो. तर १९८९ आणि २००९ दरम्यान कॅनो क्रिस्टल नदी ही लोकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. परंतु हळूहळू परिसरात येणाऱ्या पर्यटक आणि टूर कंपन्यांसाठी ती राखीव करण्यात आली आहे. पर्यटक फक्त टुरिस्ट गाइड कंपन्यांच्या द्वारेच येथे प्रवेश करु शकतात.