Home » जेव्हा Cannes Film फेस्टीव्हल रद्द करावा लागला होता…

जेव्हा Cannes Film फेस्टीव्हल रद्द करावा लागला होता…

by Team Gajawaja
0 comment
Cannes Film Festival
Share

बॉलिवूड ते हॉलिवूड मधील कलाकार, नामांकित व्यक्ती कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या या रेड कार्पेटवर उपस्थिती लावतात. तर फ्रान्स सरकार कडून सुद्धा या फेस्टिव्हलसाठी जोरदार तयारी केली जाते. पण यंदाच्या वर्षी सुद्धा सरकारने येथे होणाऱ्या सर्व विरोधी आंदोलनांवर बंदी घातली. १६ ते २७ मे पर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हल दरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून सरकारने कठोर सुरक्षाव्यवस्था केली आहे. हेच कारण आहे की, राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांची ती पेंन्शन स्किम ज्यामध्ये बदलाव करण्यात आला आहे. सरकारला असे वाटत होते की, रिटायरमेंटचे वय वाढवले पाहिजे आणि फ्रान्सच्या कॉन्स्टिट्युशन काउंसिलने त्याला मंजूरी सुद्धा दिली आहे. (Cannes Film Festival)

नव्या नियमानुसार, रिटायरमेंटचे वय वाढून ६२ ते ६४ वर्ष करण्यात आले आहे. राष्ट्रपती मॅक्रों यांनी यासाठी हिरवा कंदील ही दाखवला आहे. यानंतर सुद्धा देशभरात आंदोलन सुरु झाली आहेत. सरकारपूर्पणे प्रयत्न करत आहे की, याचा परिणाम फिल्म फेस्टिवलवर होऊ नये.

जेव्हा रद्द करावा लागला होता….
असे पहिल्यांदाच झालेले नाही की, जेव्हा आंदोलनांचा परिणाम कान्सवर होईल याची अपेक्षा केली जात होती. गेल्या वर्षात सुद्धा फ्रांसमध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. सर्वाधित स्थिती बिघडली गेली ती म्हणजे १९६८ मध्ये. स्थिती अशी झाली होती, विरोधी आंदोलनामुळे कान्स फेस्टिव्हल रद्द करावा लागला होता.

खरंतर फेस्टिव्हल १० मे १९६८ रोजी होणार होता. तयारी सुद्धा जोरात करण्यात आली होती. कान्समध्ये सेलिब्रेटी येऊ लागले होते. पण अचानक तो रद्द करण्याची वेळ आली. तो असा काळ होता जेव्हा फ्रांन्सच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे आंदोलन केले जात होते. कर्मचारी आंदोलन करत होते. ३० लाख मजूर रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण देश बंद होता.

१३ मे ला फ्रेंच क्रिटिक्स एसोसिएशन स्टुटेंड्सने पाठिंबा देत फेस्टिव्हल रद्द करावा अशी घोषणा केली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलन हिंसक पोलिसांच्या विरोधात होते आणि त्यांनी पोलिसांच्या सिस्टिमवर देशातील स्वातंत्र्य संपवत असल्याचा आरोप लावला होता. पोलिसांनी काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांसंबंधिक कठोर नियम तयार केले होते.

Cannes Film Festival
Cannes Film Festival

तर १९६८ आणि आधीच्या आंदोलनावरुन सरकारने आधीच आदेश जारी केले होते. त्यांनी त्यात असे म्हटले होते की, फेस्टिव्हल दरम्यान कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नये. हा निर्णय घेण्यामागील आणखी एक कारण असे की, बहुतांश पोलिसांच्या तुकड्या या फेस्टिव्हलच्या येथे असतील. त्यामुळे आंदोलनची स्थिती निर्माण झाल्यास त्यांना नियंत्रण करण्यास पुरेसे पोलीस उपलब्ध नसतील. आधीच त्यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. (Cannes Film Festival)

हेही वाचा- लव्ह जिहादच्या भोवऱ्यात अडकलेल्या तरुणींच्या आयुष्यावर भाष्य करणारा The Kerala Story

सरकारच्या गाइडलाइन्सनुसार, कान्स मध्ये काही प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कान्सच्या त्या हॉटेलबाहेर खुप आंदोलकर्त्यांची गर्दी झाली होती जेथून ए-लिस्टर सेलिब्रिटीज रेड कार्पेटवर दिसणार होते. अशातच येथे पोलिसांना आंदोलनकर्त्यांना नियंत्रण करणे थोडं मुश्किल झाले होते. हॉलिवूड रिपोर्टरच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, लोकांचा अधिकार आहे की, ते आंदोलन करतील. स्वतंत्र रुपात आपला आवाज करु शकतात. याला ग्लॅमर पासन दूर ठेवू नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.