Home » ब्राझील नट्स करू शकतात थायरॉइडवर मात

ब्राझील नट्स करू शकतात थायरॉइडवर मात

by Team Gajawaja
0 comment
Brazil Nuts
Share

उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार आवश्यक असतो. या आहारामध्ये सुक्या मेव्याचे स्थान महत्त्वाचे आहे. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते, मनुका, अंजीर या सुक्यामेव्याचे अनेक फायदे आहेत. त्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास चांगला फायदा होता. अनेक रोगांवरही या सुक्यामेव्यामुळे अटकाव येऊ शकतो. तसेच शरीराची त्वचा आणि केसांचे आरोग्यही या सुक्यामेव्याच्या सेवनानं सुधारते. मात्र हे सुक्यामेव्याचे प्रकार आपल्याला माहिती आहेत, त्यापेक्षा अधिक आहेत. जगभरातील अनेक सुक्यामेव्याचे प्रकार असून त्यांचाही आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होतो. अशाच एका सुक्यामेव्यात ब्राझील नट्स हा प्रकार आहे. अर्थात याला ब्राझील काजू म्हटले जाते. हे ब्राझील नटस (Brazil Nuts) थायरॉईडसारख्या आजारावर रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते. ब्राझील, बोलिव्हिया आणि पेरूच्या अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये आढळणाऱ्या झाडांपासून हे नट्स मिळतात. थोडे गुळगुळीत, लोणीयुक्त आणि बटरसारखी चव असणारे हे ब्राझील नट्स (Brazil Nuts) कच्चे किंवा उकडूनही खाल्ले जातात. आपल्याकडे फणसाच्या बिया जशा असतात, तशाच आकाराचे हे ब्राझील नट्स अनेक गुणांनी युक्त असेच असतात.  

ब्राझील नट्सचा (Brazil Nuts) उपयोग अनेक प्रकारे करता येतो. ब्राझील नट्सचा (Brazil Nuts) समावेश आहारात नेहमी केला तर त्यामुळे शरीराची त्वचा ही अतिशय मुलायम राहते.  तसेच हाडांचीही मजबूती होते. पण यासोबत ब्राझील नट्स (Brazil Nuts) हे थायरॉईडसाठी अतिशय चांगले मानले जातात. ब्राझील नट्समध्ये असलेले सेलेनियम हे थायरॉईड हार्मोन्सना सक्रिय करण्यास मदत करते. त्यामुळे शरीराचे वजनही कमी होते. थायरॉईडमुळे अनेकवेळा वजन अचानक वाढल्याची तक्रार असते. मात्र ब्राझिल नट्समुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते. ब्राझील नट्स हे सेलेनियमचा चांगला स्रोत आहे. सेलेनियममुळे थायरॉईडमुळे शरीरात निर्माण होणा-या वाईट हार्मोन्सवर नियंत्रण राहते. तसेच थायरॉईडमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही ब्राझील नट्स उपयुक्त ठरू शकतात. 

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबत हे नट्स (Brazil Nuts) हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच तणाव जाणवत असेल तर ब्राझील नट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील पोषक तत्वांमुळे या तणावावर नियंत्रण राहते. शरीरात जळजळ वाटत असेल तर हे ब्राझील नट्स उकडून खाल्ले जातात. त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील अभ्यासानुसार, या ब्राझील नट्समुळे (Brazil Nuts) रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण राहते. कोलेस्ट्रॉल 25 टक्क्यांहून अधिक कमी होण्यास मदत होते. याशिवाय ब्राझील नट्समध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. सेलेनियम हे एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट देखील आहे त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.  यासोबतच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आहे.  ज्यांचा रक्तदाब सतत कमीजास्त होत असतो. त्यांनाही ब्राझील नट्स (Brazil Nuts) खाण्याचा सल्ला दिला जातो. ब्राझील नट्स (Brazil Nuts) वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनसंस्था चांगली काम करु लागते. फायबरमुळे भूक नियंत्रणात रहाते.   पचनसंस्थेशी निगडीत समस्याही ब्राझील नट्समुळे (Brazil Nuts) सुधारतात. किडनीचे कार्य सुधारते. मुळात या ब्राझील नट्सचा (Brazil Nuts) वापर रोजच्या आहारत केल्यास रोग प्रतिका रकशक्ती वाढते. यासोबत शरीरातील टॉकसीन बाहेरे काढण्यासाठीही या ब्राझील नट्सचा उपयोग होतो.  

==========

हे देखील वाचा : तुमचे उजव्या बाजूचे डोकं सतत दुखतं? ही असू शकतात कारणं

==========

ब्राझील नट्समुळे (Brazil Nuts) मेंदूचे कार्य देखील सुधारते.  आपण शक्यतो बदाम किंवा अक्रोड यांचा वापर मेंदूच्या आरोग्यासाठी करतो.  पण सोबत आहारात ब्राझील नट्सचा वापर झाला तर त्याच्या अधिक फायदा मिळू शकतो.   त्यात इलॅजिक अॅसिड आणि सेलेनियम असते. या दोन्ही गोष्टी मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या ब्राझील नट्समध्ये (Brazil Nuts) अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.  त्यामुळे नैराश्य वाटत असेल तर हे नैराश्य दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ब्राझील नट्स (Brazil Nuts) खाल्ल्याने प्रजनन क्षमताही सुधारते. सेलेनियम शरीरात प्रजनन क्षमता विकसित करण्यास मदत करते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि शुक्राणूंची मात्रा वाढवण्यास देखील मदत करते.  एकूण हे ब्राझील नट्स म्हणजे सुपर फूड आहेत.  शरीराच्या सर्वांगिण आरोग्यासाठी त्याचा आहारत नियमीत वापर झाल्यास नक्कीच फायदा होतो.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.