कॅमरुन मधील बाफुतच्या ११ वा फॉन म्हणजेच राजा अम्बुम्बी द्वितीय याच्या १०० राण्या आहेत. त्याने या सर्वांसोबत लग्न केलेले नाही. खरंतर स्थानिक परंपरेनुसर जेव्हा एका फॉनचा मृत्यू होतो तेव्हा उत्तराधिकाऱ्याला त्याच्या सर्व पत्नी वारसा म्हणून दिल्या जातात. त्यानंतर तो आपल्या राण्यांसोबत लग्न करतो. बाफुतचा प्रिंस निकसनच्या मते, राण्यांची साम्राज्यात फार मोठी भुमिका असते.पुरुषाला शाही पुरुषाचा मान देणे या सर्व महिलांवर अवलंबून असते. अबुम्बीची तिसरी पत्नी क्वीन कॉन्स्टेंस ही असे मानते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक अत्यंत यशस्वी आणि कट्टर महिलेचा हात असतो. (Cameroon King Abumbi)
कॉन्स्टेंसच्या मते, जेव्हा तुम्ही राजा असता तेव्हा वयस्कर झालेल्या पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांना स्थानिक रीति-रिवाज सांगतात. त्याचसोबत नव्या राजाला आपल्या परंपरांचे शिक्षण सुद्धा त्या देतात. कॅमरूनमध्ये बहुविवाह कायदा मान्य आहे. त्यानंतर सुद्धा आकडेवारी असे सांगते की, अफ्रिकी खंडात फार कमी लोक बहुविवाहकरतात. यामागे काही कारणे आहेत. त्यामधील सर्वात पहिले तर बदलते मूल्य, ख्रिस्ती धर्माचा प्रसार, पाश्चिमात्य लाइफस्टाइल बद्दल वाढत्या आकर्षणामुळे लोक बहुविवाहापासून दूर राहतात. तर मोठ्या परिवारासाठी लागणाऱ्या खर्चामुळे सुद्धा बहुविवाहाला आव्हान दिले गेले आहे.

Cameroon King Abumbi
कॅमरुनच्या पारंपारिक शासकांच्या बदलत्या विचारसणी आणि जुन्या परंपरांमधील दोन विरुद्ध संस्कृतींमध्ये आपले आयुष्य जगावे लागते. बाफुत वर शासन करणारे अम्बुबी द्वितीय यांनी स्विकारले आहे की, वसाहतवादादरम्यान शासनाची दुसरी मुल्य आली. जी त्यांच्या पारंपारिक मुल्यांपेक्षा फार वेगळी होती. त्यामुळे पारंपारिक मुल्ये आणि आधुनिक पश्चिमात्य मुल्यांमध्ये सातत्याने संघर्ष होत राहिला. बाफुत ४७ वर्षांपासून क्षेत्रातील सर्वाधिक मोठे साम्राज्य आहे. अबुम्बी द्वितीय असे सांगतात की, माझी भूमिका सर्व मुल्यांना घेऊन पुढे जात मार्ग शोधण्याची आहे. जेणेकरुन प्रजा आपल्या संस्कृतीला धक्का न लागू देता विकास आणि आधुनिकतेचा आनंद घेतील. (Cameroon King Abumbi)
बाफुतच्या प्रथेनुसास एका नव्या राजाला आपल्या वडिलांच्या वारसातून सर्व पत्नी दिल्या जातात. असे काही राजेशाही परिवार यशस्वी आहेत. कॅमरुन मध्ये सर्वाधिक तरुण पारंपारिक शासकांपैकी एक बाबुंगोच्या फॉन एनडोफुआ जोफिया द्वितीयच्या राण्या शासनात राजाची खुप मदत करतात. त्या सर्व तरुण पत्नी फ्रेंच क्षेत्रात इंग्रजी बोलायच्या. त्या उत्तम मार्केटिंग सुद्धा करायच्या. या सर्व राण्या परंपरेच्या कारणास्तव जोफिया द्वितीय सोबत होती.
हेही वाचा- 2700 वर्षांपूर्वी युनानमध्ये बनला होता पहिला रोबोट, असा आहे AI चा इतिहास
राजा अबुम्बी द्वितीयने १९६८ मध्ये वडिलांच्या निधनानंतर गादी सांभाळली होती. अबुम्बी द्वितीय वडिलांच्या निधनानंतर तेथील राजा झाला. त्याला आपल्या स्वर्गीय वडिलांकडून 72 राण्या आणि त्यांची मुलं वारसा म्हणून मिळाले. त्यानंतर त्यांने स्वत: २८ लग्न सुद्धा केली. अफ्रिकन देश कॅमरुनमध्ये बहुविवाह महिलांसोबत लग्न करण्याची परंपरा आहे. कोणताही व्यक्ती कितीही वेळा लग्न करु शकतो. त्यासाठी मर्यादा नाही.