Home » भारतात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी !

भारतात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी !

by Team Gajawaja
0 comment
Cambodian
Share

जगभरात मधुमेहाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातच 35 टक्के मुलांना मधुमेहानं ग्रासलं असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. जगभरात सुमार 6,52,000 मुले टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या सर्वांसाठी शरीरात जाणारी अतिरिक्त साखर आणि कमी शारीरिक हालचाली ही दोन प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. मुख्यतः लहान मुलांमधील एनर्जी ड्रिंक याला अधिक कारणीभूत ठरत आहेत. हेच ध्यानत घेऊन कंबोडियन सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कंबोडियामध्ये शाळांमध्ये मिळणा-या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात आली आहे. फारकाय शाळेच्या आसपासही एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यासाठी येथील तरुणांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण हे कारण देण्यात आले आहे. कंबोडियन सरकारच्या या आदेशाप्रमाणे, शाळांमध्ये आणि आसपास एनर्जी ड्रिंक्स पिण्यावर आणि विक्रीवर पूर्ण बंदी असणार आहे. (Cambodian)

साखर आणि एनर्जी ड्रिंक्सच्या अतिरेकी सेवनामुळे मधुमेहासह अनेक आजार पसरत असल्याचे तेथील सरकारचे म्हणणे आहे. मात्र एनर्जी ड्रिंक्सवर फक्त बंदी घालून मुलांना त्यापासून दूर ठेवता येणार नाही, याचीही जाणीव कंबोडियाच्या सरकारला आहे. त्यामुळेच या निर्णयाची अंमलबजावणी आणि सोबतच जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकरातर्फे एनर्जी ड्रिंक्सचे भविष्यातील तोटे सांगण्यासाठी काही गटांची स्थापना करण्यात आली आहे. यात तज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे. ही मंडळी शाळा-शाळांमध्ये जाऊन सरकारच्या या निर्णयाप्रती जागरुकता निर्माण करणार आहेत. अलिकडच्या काळात काही देशांनी लहान मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापरावर बंदी आणली आहे. शाळेत यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांनी मोजक्या वेळीच मुलांना मोबाईल द्यावा असा चक्क कायदा करण्याची गरज आली आहे. या कायद्याची जशी गरज भासली तशीच गरज एनर्जी ड्रिंक्सवरही आणणे गरजचे होते. कंबोडिया सरकारच्या या निर्णयाचे कंबोडियन नागरिकांनी जसे स्वागत केले आहे, तसेच जगभरातील अनेक देशांनीही आपल्याकडे अशा स्वरुपाचा कायदा होऊ शकतो का, अशी चाचणी सुरु केली आहे. भारतातही अशाच कायद्याची गरज असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. (International News)

कंबोडियामध्ये एक नवा कायदा करण्यात आला असून याचे जगभरात स्वागत होत आहे. कंबोडियन सरकारनं आता देशभरातील शाळांमध्ये एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच शाळेच्या आसपासही एनर्जी ड्रिंक्स विकता येणार नाहीत. शाळेत जाणारी मुले रोज 3 हून अधिक कॅन एनर्जी ड्रिंक्स पीत असल्याचा एक धक्कादायक अहवाल आला. सोबतच तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचेही स्पष्ट झाले. यामुळे कंबोडियन सरकारनं एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर कठोर नियम टाकले आहेत. कंबोडियाच्या क्रीडा मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला. साखर आणि एनर्जी ड्रिंक्सच्या वापरामुळे होणारे असंसर्गजन्य रोग, विशेषत: साखरेचा धोका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत. यानुसार सर्व सार्वजनिक आणि खाजगी शाळा तसेच तांत्रिक संस्थांवर लागू हा निर्यण लागू केला आहे. याशिवाय कोणत्याही शाळेने निर्बंधांचे उल्लंघन केल्यास शाळेतील आणि आजूबाजूच्या विक्रेत्यांकडून एनर्जी ड्रिंक्स जप्त करण्यात येणार आहे. शिवाय त्या शाळेचे आणि दुकानाचे लायन्ससही जप्त करण्यात येणार आहे. (Cambodian)

========

हे देखील वाचा : अमेरिकन नागरिकत्वाचा कायद्यात होतोय बदल

========

कंबोडियान सरकारनं यासंदर्भात एक अभ्यास समिती नेमली होती. या समितीमधून शालेय मुले फक्त एनर्जी ड्रिंक्सवरच दिवसभर राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. कंबोडियामध्ये मधुमेहानं मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचीही माहिती मिळाली. असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असून हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि तीव्र श्वसन रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या अहवालात पुढे आले, त्यामुळे कंबोडियन सरकारनं आता एनर्जी ड्रिंक्सवर बंदी आली आहे. कंबोडियाच्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहेच शिवाय जगभरातील अनेक देशांनी असाच निर्णय आपल्या देशात राबवण्याचे जाहीर केले आहे. बहुतेक एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर आणि कॅफिनचे प्रमाण सर्वाधिक असते. एनर्जी ड्रिंक्समध्ये अनेक उत्तेजक, कृत्रिम स्वाद आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाची धडधड आणि झोपेचे विकार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी शालेय जीवनापासूनच मुलांना एनर्जी ड्रिंक्सपासून दूर ठेवण्याची गरज आहे. त्यामुळेच कंबोडियाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.