Home » फॅशनच्या जगात Calvin Klein ची जादू

फॅशनच्या जगात Calvin Klein ची जादू

by Team Gajawaja
0 comment
Calvin Klein
Share

फार कमी लोक असतील ज्यांना केल्विन क्लेन यांच्या प्रोडक्ट्स बद्दल ऐकले नसेल. केल्विन क्लेन हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय फॅशन हाउसपैकी एक आहे. ते आपल्या ग्राहकांना रेडी-टू-वेअर कपडे, डिझाइनर अंडरगारमेंट्स, डेनिम, अत्तर, बूट, ब्युटी प्रोडक्ट्स, होमवेयर, आयवेअर असे विविध प्रोडक्ट्स उपलब्ध करुन देतात. केल्विन क्लेनचे प्रोडक्ट्स १९८० च्या दशकापासून जगभरातील बाजारात एक वेगळीच उंची गाठली आणि आज ही ते त्याच उंचीवर कायम आहेत. दरम्यान, २०२१ मध्ये या कंपनीने ८.५ बिलियन डॉलरची विक्री केली होती. आजच्या तारखेला कंपनीचे ११० पेक्षा अधिक देशांमध्ये सेंटर्स आहेत. (Calvin Klein)

केल्विन क्लेन ब्रांन्ड खासकरुन आपले कपडे आणि अत्तरसाठी प्रसिद्ध आहे. पाच दशकांपासून अधिक काळ ते या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपला पाय घट्ट रोवून आहेत. जस्टिन बीबर, केंडल जेनर, किम कार्दशियन, केट मॉस, जे-जेड, हॅरी स्टाइल्स, जी चांग वूक, एम्मा वॅटसन, सेलेना गोमेज, निक जोनस अशा काही प्रसिद्ध सेलिब्रेटी या ब्रँन्डचे कपडे घालतात.

१९ नोव्हेंबर १९४२ रोजी केल्विन रिचर्ड क्लेन यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रोंक्समध्ये झाला. त्यांचे वडिल लिओ क्लेन हंगरी मधील अप्रवासी होते. त्यांची आई, फ्लोर स्टर्न ही मूळची ऑस्ट्रियाई होती. केल्विन यांना लहानपणापासून शिलाईची आवड होती. तारुण्यात आल्यानंतर त्यांनी ब्रोंक्स मध्ये स्केचिंग आणि शिलाई काम शिकून घेतले.

शालेय शिक्षणादरम्यान, डिझाइन आणि शिलाई बद्दल शिकण्याची आवड पाहता त्यांच्या आईने त्यांना फॅशन आणि कलेच्या प्रति प्रोत्साहन दिले. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मॅनहट्टन मधील हायस्कूल ऑफ आर्ट अॅन्ड डिझाइनमध्ये प्रवेश घेतला.

मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर केल्विन यांनी न्यूयॉर्कमध्ये फॅशन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये भाग घेतला. त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले नाही. केल्विन यांनी प्रशिक्षणादरम्यानच शहरातील विविध दुकांनांसाठी डिझाइन करणे सुरुच ठेवले होते. एका कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी आपला बालपणीचा मित्र बॅरी याच्या सोबत आपला व्यवसाय सुरु केला. (Calvin Klein)

व्यवसाय सुरु करण्यासाठी बॅरी आणि केल्विन यांनी १० हजार डॉलरची उधारी घेतली. व्यवसाय स्थापन केल्याच्या काही काळातच क्लेन यांना एक मोठी संधी मिळाली. आलिशान डिपार्टमेंट स्टोर बोनविट टेलर येथून कोट खरेदी करणारी एक महिला चुकून दुसऱ्या मजल्यावर गेली. तेव्हा तिला जमिनीवर केल्विन क्लेन यांचे कोट दिसले. त्यांच्या डिझाइन त्या महिलेला ऐवढ्या आवडल्या की, तिने केल्विन यांना बोनविट टेरलच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी आमंत्रित केले. येथून ५० हजार डॉलरचा करार केला गेला. त्यानंतर केल्विन यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

एका वर्षातच ब्रँन्डला शहरात आपली ओळख मिळाली. सप्टेंबर १९६९ मध्ये प्रतिष्ठित लाइफ स्टाइल पत्रिका Vouge ने केल्विन यांना आपल्या कवर पेजवर आणले. येथूनच त्यांची आणखी पब्लिसिटी झाली आणि ब्रँन्डचे नाव ही झाले. एक उत्तम कोट आणि ड्रेस बनवल्यानंतर केल्विन क्लेनेने महिलांसाठी स्पोर्ट्सवेअर, इनरवेअर, क्लासिक ब्लेजर तयार करण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये ब्रँन्डने ३० मिलियन डॉलरचा वार्षिक नफा मिळवला. १९८० च्या दशकादरम्यान, केल्विन क्लेन यांचा व्यवसाय कॅनडा, ब्रिटेन, जापान, न्यूझीलंड, आयरलँन्ड आणि ऑस्ट्रेलिया पर्यंत पोहचला होता.

१९८० च्या दशकानंतर ते अमेरिकेतील बाजारात गेम चेंजर ठरले. महिलांसाठीचे त्यांचे कलेक्शन बाजारात खुप प्रसिद्ध झाले. दरम्यान, अमेरिकेत १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला मंदी वेळी ब्रँन्डला दिवाळखोरीचा सामना करावा लागला. पण केल्विन क्लेन यांनी हार न मानता अखेर यश मिळवलेच.

हे देखील वाचा- पुतिन यांच्या प्रियसीचा भव्य महल आला जगासमोर…

१९९० आणि २००० च्या दशकाच्या अखेरीर ब्रँन्ड यशस्वी झाला. सप्टेंबर २००२ मध्ये PVH ने ४०० मिलियन पेक्षा अधिक केल्विन क्लेनचे अधिग्रहण केले आणि त्यानंतर ब्रँन्डने रेडी-टू-वेअर ड्रेसमध्ये प्रवेश केला. आज हा ब्रँन्ड जगातील सर्वाधिक टॉप फॅशन ब्रँन्ड आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.