अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीनं अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. अमेरिकेतील सर्वात सुंदर आणि महागडं शहर असलेल्या लॉस एंजेलिसला या भयानक आगीनं आपल्या कवेत घेतल आहे. समस्त सिनेसृष्टीचै वैभव मानण्यात येणा-या हॉलिवूडलाही या आगीचे रौद्ररुप बघायला मिळाले असून येथील मान्यवर कलाकारांची घरे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. लॉस एंजेलिस शहरात अमेरिकेतील गर्भश्रीमंतांची घरे असून या सर्व घरांना आगीचा फटका बसला आहेत. कमला हॅरिस यांचेही घर आता खाली करण्यात आले आहे. एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनीही एक्सवर या आगीच्या तांडवाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. (America)
कॅलिफोर्नियात लागलेली ही आग येणा-या वा-यांमुळे अधिक भडकत असून अमेरिकेला याचा फटका बसणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला शेवटचा परदेश दौरा रद्द केला आहे. अमेरिकेच्या एका भागात बर्फाचे वादळ सुरु होते. गेल्या अनेक वर्षात न झालेली बर्फवृष्टी एकीकडे होत असतांना कॅलिफोर्निया सारख्या राज्याला आगीनं आपल्या कवेत घेतलं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात आगीनं हाहाकार उडवून दिला आहे. या आगीत अनेक हॉलिवूड स्टार्सची घरे भस्मसात झाली आहेत. लॉंस एंजेलिस या अमेरिकेच्या महागड्या शहरात आता सर्वत्र धुर, राख आणि जळलेल्या वास्तू दिसत आहेत. (International News)
यात कमला हॅरिस यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या घरांचाही समावेश आहे. अमेरिकेत लॉस एंजलिसमध्ये व्हिला असणं हे प्रतिष्ठेचे लक्षण मानण्यात येते. आता याच सर्व प्रतिष्ठीतांच्या घरांना आगीनं मोठं नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत तब्बल 27 हजार घरांचे नुकसान झाले असून हा आकडा अधिक होण्याची भीती आहे. शिवाय लॉस एंजलिसमधील 3 लाख नागरिकांनी हे शहर सोडलं आहे. आगीमध्ये 1100 इमारती पूर्णपणे जळल्या आहेत. एकूण 4856 एवढे हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि चिंताजनक म्हणजे, यात तासाच्या अंतरानं वाढ होत आहे. त्यामुळे 50 हजार नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आदेश देत प्रशासनाने शहरात आणीबाणी जाहीर केली आहे. पॅसिफिक पॅलिसेड्सचे आगीमुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचीही बातमी आहे. येथे आग काही तासात 3000 एकर क्षेत्रात पसरली आहे. आगीमुळे 30 हजारांहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली आहेत. (America)
अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार पॅसिफिक पॅलिसेड्समधील ही आग एका मिनिटात पाच फुटबॉल मैदानांइतका परिसर जाळून राख करत आहे. कॅलिफोर्नियामधील पॅलिसेड्स या भागात हॉलिवड स्टार्सचे बंगले आहेत. हा सर्व भाग आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. मार्क हॅमिल, पॅरिस हिल्टन, जेमी ली कर्टिस, मॅंडी मूर, मारिया श्रीव्हर, अॅश्टन कुचर, जेम्स वुड्स, लेइटन मीस्टर, बिली क्रिस्टल मंडी मूर या सर्वांची घरे जळून नष्ट झाली आहेत. अन्य घरेही आगीत पडण्याची शक्यता असल्यानं त्यांना घरे खाली करण्याचे आदेश आहेत. शिवाय लॉस एंजलिसमधील अनेक धार्मिक स्थळांचेही मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी अचानक या आगीनं रात्री रौद्र रुप धारण केलं. या भागात वाहणा-या जोरदार वा-यांमुळे आग आणखी भडकली. त्यामुळे काही इमारतींमध्ये जेव्हा आग लागली तेव्हा त्यातील रहिवाश्यांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. या आगात आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. वा-याच्या प्रवाहामुळे आग लॉस एंजेलिसच्या टेकड्यांच्या माथ्यावर पोहोचली. रात्री दूरवरुन आगीमुळे टेकडी लाल रंगाची दिसत होती. (International News)
================
हे देखील वाचा : Steve Jobs : स्टीव्ह जॉब्सची बायको कुंभ मेळ्यात…
Sam Altman : ChatGPT च्या सीईओवर झाले गंभीर आरोप !
===============
कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहर हे पर्वतांच्या मध्ये वसलेले आहे. येथे पाइनची जंगले आहेत. यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणात व्हिला असून त्यात अमेरिकेचे गर्भश्रीमंत रहातात. मात्र आता याच पाइनच्या सुक्या वृक्षांना आगीनं प्रथम लक्ष केलं. पुढील काही तासांत आगीने लॉस एंजेलिसचा मोठा भाग वेढला गेला. या आगीमुळं आता शहराची हवा विषारी झाली असून तेथील AQI 350 च्या पुढे गेला आहे. कॉलिफोर्नियाच्या जंगलात अनेकवेळा आगीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र या दशकातील सर्वात विनाशकारी आग म्हणून आत्ताच्या आगीचे वर्णन करण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आपल्या कार्यकालातील शेवटचा परदेश दौरा रद्द केला आहे. बिडेन हे इटलीला भेट देणार होते. या आगीत ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी जो बिडेन यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हॉलिवूडला बसलेल्या या आगीच्या फटक्यानं ऑस्कर नामांकनाची तारीखही बदलण्यात आली आहे. (America)
सई बने