Home » California : हे शहर समुद्रात सामावणार !

California : हे शहर समुद्रात सामावणार !

by Team Gajawaja
0 comment
California
Share

अमेरिकामधील कॅलिफोर्निया हे राज्य कायम चर्चेत असतं. याच कॅलिफोर्निया येथे लागलेल्या भयानक आगीनं खूप मोठं नुकसान झालं आहे. पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या या राज्याला गोल्डन स्टेट असेही म्हटले जाते. हे अमेरिकेचे तिस-या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. याशिवाय भूकंप आणि वादळासाठीही हे कॅलिफोर्निया ओळखले जाते. कॅलिफोर्नियाच्या सीमेवरील राष्ट्रीय उद्याने जगप्रसिद्ध आहेत. येथील समुद्रकिना-यावर जगभरातील पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. मात्र आता याच कॅलिफोर्नियाच्या बाबतीत धक्कादायक अहवाल आला आहे. (California)

कॅलिफोर्निया राज्य दरवर्षी 20 सेमीनं समुद्रात बुडत असल्याचे यात म्हटले आहे. हा अहवाल अमेरिकन अंतराळ संस्था नासानंच दिल्यामुळे आता खळबळ उडाली आहे. वास्तविक गेल्या काही वर्षापासून कॅलिफोर्नियामध्ये येणा-या वादळांचे प्रमाण वाढले आहे. सातत्यानं येणा-या वादळानं येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्यातच काही महिन्यापूर्वी लागलेल्या आगीनं या राज्याचे मोठे नुकसान केले आहेत. हजारो घरे, हॉस्पिटल आणि शाळाही या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. शिवाय कॅलिफोर्नियाची ओळख असलेली मोठी वनसंपदाही आगीत स्वाहा झाली आहे. या सर्वांमुळे कॅलिफोर्नियाच्या बदलत्या वातावरणाचा अभ्यास नासातर्फे करण्यात येत आहे. त्यात या कॅलिफोर्नियाचे समुद्रकिना-यावरील जमिन दरवर्षी काही प्रमाणात समुद्रात सामावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नासाचा हा अहवाल आल्यापासून कॅलिफोर्निया प्रशासनानं राज्याचे भविष्य वाचवण्यासाठी काय करता येईल, याबाबत तज्ञांबरोबर बोलणी सुरु केली आहेत. (International News)

कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या राज्यात गेल्या काही वर्षापासून सातत्यानं येणा-या चक्रिवादळांचा अभ्यास कऱण्यात येत आहे. या वादळाच्या तडाख्यामुळे कॅलिफोर्नियामधील काही समुद्रीभागात पाण्याची पातळी वाढल्याचे लक्षात आले आहे. येथील नागरी वस्तीला त्याचा धोका असल्याचे सांगून अनेक नागरिकांचे स्थलांतर कऱण्यात आले आहे. आता याबाबत अमेरिकेची अंतराळ संस्था नासा अभ्यास करीत आहे. नासाच्या नेतृत्वाखाली तज्ञांची टिम असून या टिमचा अहवाल धक्कादायक आहे. यात कॅलिफोर्नियासह अमेरिकेतील अन्य सागरी शहरेही धोक्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवरील जमिन पाण्यात सामावली जात आहे. कॅलिफोर्नियाचे काही भाग हे दरवर्षी 8 इंचाने पाण्यात बुडत आहेत. (California)

प्रारंभी हे आकडे लहान वाटत असले तरी भविष्यात यामुळे मोठे संकट येऊ शकते, असा इशारा या तज्ञांनी दिला आहे. यामुळे कॅलिफोर्नियाच्या जलस्त्रोतांनाही धोका पोहचू शकतो. काही जसस्त्रोत पाण्याखाली गेल्यास त्यामध्ये खा-या पाण्याचा अंश येणार असून भविष्यात पिण्यायोग्य पाण्याची कमतरता जाणवू लागणार आहे. 2050 मध्ये कॅलिफोर्नियातील समुद्राची पातळी 15 ते 37 सेंटीमीटर पर्यंत वाढण्याची भीती आहे. असे झाल्यावर बर्फ वितळण्याचे प्रमाणही वाढणार असून अनेक रहाण्याजोगी शहरे पाण्यात जाणार आहेत. या सर्वांमुळे समुद्रकिना-याजवळील घरांमध्ये कायम ओल येणे, बुरशी येणे आदी समस्या जाणवतील. तर काही वर्षांनी या घरांचा पाया भुसभुशीत झाल्याचे उघड होणार आहे. परिणामी कॅलिफोर्नियाचा मोठा भाग हा मनुष्य वस्तीसाठी उपयोगी रहाणार नाही. कॅलिफोर्नियामध्ये सध्याही या धोक्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. (International News)

=============

हे देखील वाचा : Neutron Star : पुणे शहराइतके तारेसुद्धा आपल्या ब्रम्हांडात आहेत.

Modi Trump : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत काय ठरलं?

=============

समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टनच्या किनाऱ्यावरील अनेक बांधकामे कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागातील पाणथळ जागा वाढू लागल्यामुळे नागरिकही चिंता व्यक्त करीत आहेत. ब-याच ठिकाणी घरांना वाळवी लागल्याच्या घटना घडत आहेत. तज्ञांच्या मते जमिन सतत पाण्याखाली असल्यास यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. यासर्वांमुळे कॅलिफोर्निया प्रशासनानं समुद्रकाठापासून जवळ असलेल्या सर्वच घरांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. हवामान तज्ञांच्या मते एल निनोसारख्या घटनांमुळे बर्फ वितळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी समुद्राची पातळी वाढली आहे. यातच कॅलिफोर्नियामध्ये गेल्या काही वर्षात भूकंपाचे प्रमाण वाढले आहे. अशात चक्रिवादळेही येत आहेत. या सर्वांचा परिणाम कॅलिफोर्नियासह ओरेगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये जास्त जाणवत आहे. या सर्व राज्यांसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून ही समिती समुद्रच्या पातळीत होणा-या वाढीवर लक्ष ठेवणार आहे. (California)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.