Home » केवळ दुधातच नाही, तर ‘या’ पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात ‘कॅल्शियम’; हाडं राहतील मजबूत आणि तंदुरुस्त

केवळ दुधातच नाही, तर ‘या’ पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात ‘कॅल्शियम’; हाडं राहतील मजबूत आणि तंदुरुस्त

by Team Gajawaja
0 comment
Calcium Rich Foods
Share

कॅल्शियम हे शरीरातील सर्वात जास्त प्रमाणात असलेले खनिज आहे. हे शरीराच्या एकूण वजनाच्या १ ते २ टक्के आहे. कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी ९० टक्के प्रमाण हाडे आणि दातांमध्ये असते. उर्वरित १०% कॅल्शियम रक्त, शरीरातील द्रव, मज्जातंतू, स्नायू पेशी, इतर पेशी आणि ऊतींमध्ये असते जे त्यांना त्यांचे कार्य करण्यास मदत करतात. (Calcium Rich Foods)

कॅल्शियम शरीरासाठी अनेक प्रकारे आवश्यक आहे. कॅल्शियम विशेषतः हाडांसाठी आवश्यक आहे. हे केवळ हाडे मजबूत करत नाही, तर रक्ताभिसरणात, म्हणजे रक्तप्रवाह, स्नायू बनवणे आणि मेंदूला संदेश पाठवणे यासाठी देखील फायदेशीर आहे. (Calcium Rich Foods)

आपले शरीर कॅल्शियम बनवत नाही, त्यामुळे शरीराची कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला जातो. व्हिटॅमिन डीच्या मदतीने कॅल्शियम शरीरात शोषले जाते. प्रौढ व्यक्तीला दररोज किमान १००० मिलीग्राम कॅल्शियम आवश्यक असते. चला जाणून घेऊया दुधाव्यतिरिक्त अशा शाकाहारी पदार्थांबद्दल जे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. 

बदाम 

बदाम आपण रोज थोडे थोडे खाऊ शकतो. एक कप बदामात सुमारे ३०० मिलीग्राम कॅल्शियम आढळते. याव्यतिरिक्त, इतर पोषक तत्वांनी देखील बदाम समृद्ध आहे.  (Calcium Rich Foods)

टोफू 

टोफू हे केवळ शाकाहारी लोकांसाठीच नाही, तर वेगन लोकांसाठीही कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. १०० ग्रॅम टोफूमध्ये सुमारे ३५० मिलीग्राम कॅल्शियम आढळते. हे पनीर सारखे बनवले जाते आणि खाल्ले जाते. 

चणे

चण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. २ कप चण्यांमधून शरीराला सुमारे ४२० मिलीग्राम कॅल्शियम मिळते. त्याची भाजी, चाट, सँडविच वगैरे आरामात बनवून खाता येते. (Calcium Rich Foods)

सोयाबीन 

सुमारे १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये २३९ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. त्यात लोह आणि प्रथिनेही चांगल्या प्रमाणात असतात. सोयाबीनपासून बनवलेल्या अन्नाचाही आहारात समावेश करता येईल. 

नाचणी

ग्लूटेन फ्री नाचणीचा आहारात सहज समावेश करता येतो. १०० ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे ३४५ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. नाचणीपासून बनवलेला चिला किंवा उपमा आठवड्यातून ३-४ वेळा खाऊ शकतो. (Calcium Rich Foods)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.