एडटेक कंपनी बायजूस (BYJUs) यांच्या अडचणीत सध्या वाढ झाली आहे. कारण नुकत्याच बाल अधिकार संरक्षण आयोगाने बायजूसवर काही गंभीर आरोप लावले आहेत. अयोगाने असे म्हटले की, कंपनीकडून मुलांचे फोन क्रमांक खरेदी करुन त्यांच्या पालकांना कोर्स खरेदी करण्यासाठी धमकावले जात आहे. एनसीपीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी असे म्हटले की, आम्हाला कळले की, बायजूस मुलांसह त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक खरेदी करत आहेत. त्याचसोबत जर कोर्स खरेदी केला नाही तर त्यांचे भविष्य वाईट असेल अशी धमकी सुद्धा देतात.
या व्यतिरिक्त प्रियांक यांनी असे म्हटले की, आम्हाला कळले की एडटेक कंपनी बायजूस ही मुलांची साइकोमेट्रिक स्टेट करतात आणि मुलांना पालकांना घाबरवतात की,त्यांच्या मुलाचे भविष्य संपलेले आहे. पण ते असे मुलांना बोलूच शकत नाही. आम्हाला जशा चुका मिळतील, त्याच पद्धतीने कारवाई करु. आम्हाला २०२१ मध्ये सप्टेंबरच्या महिन्यात तक्रार मिळाली होती की, कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांच्या पालकांना बायजूस सेल्स एग्जीक्युटिव्ह जायचे आणि ईएमआय बोलून आर्थिक कंपनीसोबत पालकांच्या क्षमतेपेक्षा त्यांना अधिक कर्ज द्यायचे.
राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने कंपनीचे सीईओ बायडजू रविंन्द्र यांना चौकशीसाठी समन्स धाडले आहेत. आयोगाच्या अध्यक्षांनी असे म्हटले आहे की, एडटेक कंपनीवर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना त्रास दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आम्हाला जशी चुक मिळेल त्यानुसार आम्ही कारवाई करु. पुढे असे म्हटले की, आम्ही शिक्षण मंत्रालय, SFIO, RBI ला सुद्धा या प्रकरणाबद्दल सांगितले आङे. त्यावेळी SFIO च्या तपासासाठी RBI आणि कॉर्पोरेट मंत्रालयाला पत्र लिहिले होते. शिक्षण मंत्रालयाने एडटेक कंपनीसाठी विस्तृत सल्ला जारी केला होता आणि बायजूसला नोटीस ही धाडली होती. (BYJUs)
हे देखील वाचा- ट्विटरच्या सीईओच्या पदावरुन राजीनामा देणार असल्याची एलॉन मस्क यांची घोषणा, पण ठेवली ‘ही’ अट
दरम्यान, नुकत्याच एका रिपोर्ट्मध्ये सुद्धा बायजूसने आपल्या कामाची पद्धत बदली नव्हती. त्यामुळे आम्ही नंतर बायजूसच्या सीईओला समन्स धाडले आणि कमीशन समोर २३ डिसेंबर पर्यंत हजर राहण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करु असे ही प्रियांक कानूनगो यांनी म्हटले आहे. अशातच आता बायजूसने नुकत्याच विद्यार्थ्यांचा डेटाबेस खरेदी करण्यासह त्यांच्या पालकांना धमकावल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीने हे स्पष्टीकरण अशावेळी दिले आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने बायजूसचे सीईओ यांना आपल्या समोर हजर होण्यास सांगितले होते.