Home » रेडी टू मूव की अंडर कंस्ट्रशन, घर खरेदी करण्यापूर्वी कोणता निर्णय घ्याल?

रेडी टू मूव की अंडर कंस्ट्रशन, घर खरेदी करण्यापूर्वी कोणता निर्णय घ्याल?

by Team Gajawaja
0 comment
Buying flat tips
Share

एखाद्यासाठी घर बनवणे अथवा खरेदी करणे हे फार मोठे स्वप्न असते. त्यासाठी आयुष्यभराची कमाई त्यामागे लावली जाते. अशातच प्रत्येकाला वाटत असते की, आपल्याला परवडणारे घर हे लहान असेल तरीही चालेल पण उत्तम असावे. त्यामुळेच ज्या ठिकाणी घर खरेदी करायचे आहे तेथील आधीच माहिती काढली जाते. त्याबद्दल थोडा रिसर्च करावा लागतो. अशातच तुम्ही सुद्धा नवं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या कामी येऊ शकते.(Buying New Home Tips)

जेव्हा तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा बिल्डर अथवा डीलर तुमच्या सोबत २ पर्याय ठेवतो. एक राहण्यासाठी रेडी टू मूव आणि दुसरे म्हणजे अंडर कंस्ट्रशन मधील घर. अशातच तुम्ही या दोघांमधील कोणता पर्याय निवडला पाहिजे याबद्दल जाणून घेऊयात.

दोघांमध्ये फरक काय?
रेडी टू मूव इन हाउंसिंग प्रॉपर्टी म्हणजे ते घर पूर्णपणे तयार केलेले असते केवळ तुम्हाला तेथे रहायला जायचे असते. यामध्ये तुम्हाला कागदपत्रांसंबंधित काही गोष्टी कराव्या लागतात. तर अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी म्हणजे ज्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जर तुम्ही कर्ज घेऊन रेडी टू मूव घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावर २ लाखांपर्यंतचा डिडक्शन क्लेम करण्याचा हक्क आहे. म्हणजेच यावर टॅक्स बेनिफिट मिळेल.

कोणत्या घरासाठी पैसे खर्च कमी होतील?
जर तुम्ही प्रॉपर्टीत कमी पैसे लावू इच्छिता तर तुमच्यासाठी अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग अधिक फायदेशीर ठरु शकते. खरंतर अंडर कंस्ट्रक्शन घर तु्म्हाला रेडी टू मूव इनच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात मिळू शकते. रेडी टू मूवच्या घराची किंमत अंडर कंस्ट्रक्शनच्या तुलनेत १०-३० टक्के अधिक असते. म्हणजेच एखाद्या रेडी टू मूव इन घराची किंमत ७५ लाख रुपये आहे तर अशा प्रकारचा अंडर कंस्ट्रक्शन फ्लॅट तुम्हाला ५० ते ६५ लाखांपर्यंत मिळू शकतो. जर तुम्ही अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पूर्णपणे तयार असाल तर त्याची किंमत वाढेल हे लक्षात घ्या.(Buying New Home Tips)

हे देखील वाचा- रोख रक्कमेने व्यवहार करत असाल तर व्हा सावध! इनकम टॅक्स विभागाकडून येऊ शकते नोटीस

कोणतं घर कोणासाठी उत्तम?
जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवता तेव्हा एक गोष्ट जरुर लक्षात ठेवावी की, तुमचे पैसे अडकले नाही पाहिजेत. जर तुम्हाला प्रॉपर्टीची लगेच गरज नसेल तर तुम्ही अंडर कंस्ट्र्क्शन प्रॉपर्टीचा विचार करु शकता. हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. तर रेडी टू मूव इन प्रॉपर्टीसाठी अशा लोकांसाठी उत्तम पर्याय असेल ज्यांना लगेच नव्या घरात शिफ्ट व्हायचे आहे. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि कर्ज घेऊन रेडी टू मूव इन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भाड्याचे पैसे देण्याच्या चिंता राहणार नाही. जर तुम्ही भाड्याऐवजी ईएमआय भरु शकता तर ते पूर्ण झाल्यानंतर घर तुमच्या नावे होऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.