प्रत्येकालाच आपल्या हक्काच, स्वप्नातील घरं घ्याव असे नेहमीच वाटच असते. कारण स्वत:चे घर घेणे म्हणजे आयुष्यभराची कमाई त्यामध्ये टाकण्यासारखे आहे. परंतु काही वेळेस आपण नवं घर घेताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपली फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. एका आकडेवारीनुसार देशातील विविध कोर्टांमध्ये जवळजव साडेचार कोटी केस आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने प्रॉपर्टी संदर्भातील प्रकरण आहेत. त्यामुळेच नवं घरं खरेदी करताना काही सावधगिरी बाळगणे फार अत्यावश्यक आहे. खासकरुन घरासंबंधतची कागदपत्र. तर जाणून घेऊयात नवं खरेदी करताना कोणती महत्वाची कागदपत्र जरुर तपासून पाहिली पाहिजेत.(Buying new home)
महाराष्ट्र, गुजरात सारख्या राज्यांमध्ये रेरा (RERA) आहे. रेरा मध्ये दोन-तीन नियम असतात. त्यानुसार तुम्ही तुमचे कंस्ट्रक्शन हे कोणत्याही रजिस्ट्रेशन शिवाय करु शकता. जसे की एखादे कंस्ट्रक्शन हे ५०० स्वेअर मीटर पेक्षा कमी आहे तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. काही परिसर जसे कम्प्लीशन सर्टिफिकेट मिळाले आहे त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नसते. परंतु एखादे नवे डेव्हलपमेंट होत असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त सर्व प्रोजेक्ट्स हे रेरा मध्ये रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.
रेरामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिल्डर किंवा डेव्हलपरला एक रेरा रजिस्ट्रेशन क्रमांक मिळतो. ते पाहून कस्टमरला हे समजणे सोप्पे होते की, बिल्डरने रेरा अंतर्गत आपल्या सर्व कायदेशीर फॉर्मेलिटी पूर्ण केले आहे की नाही. बिल्डर्स आपल्या जाहिरातींमध्ये आणि प्रत्येक कागदपत्रांमध्ये हा क्रमांक टाकू शकता.
प्रोजेक्टच्या जमिनीचे टाइटल स्पष्ट असावे
प्लॉट ऑफ लँन्डमध्ये आपल्याला टाइटल सर्टिफिकेट लक्षात घेतले पाहिजे. यामधून आपल्याला अशी माहिती मिळते की, कोठून या प्रॉपर्टीची चेन डेव्हलप झाली आहे. त्याचसोबत या प्रॉपर्टीचे टाइटल डेव्हपरकडे आहे की नाही. जर प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंट होत असेल तर त्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंट एग्रीमेंट पाहू शकता.
हे देखील वाचा- पॅन कार्डच्या माध्यमातून फुकटात कसा तपासून पहाल तुमचा CIBIL Score?
लोकल अथॉरिटीकडून प्लॅनसाठी मंजुरी
याच्या सोबतचा जो युनिट, फ्लॅट किंवा शॉप खरेदी करत असाल त्यासाठी तुम्ही मंजुरी मिळालेला प्लॅन किंवा फ्लोर प्लॅन पाहून तुम्ही माहिती करुन घेऊ शकता की, या प्लॅनला लोकल अथॉरिटीने अप्रुव केले आहे की नाही.(Buying new home)
लीगल एक्सपर्टचा सल्ला घ्या
नवं घरं खरेदी करताना या कागदपत्रांकडे दुर्लक्ष करु नका. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या लीगल एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि त्याच्याकडून या बद्दल अधिक माहिती सुद्धा तपासून घ्या.