जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे पण नक्की कोणता करायचा किंवा त्यासाठी भांडवल आणायचे कुठून असे प्रश्न पडले असतील तर चिंता करु नका. कारण असे काही व्यवसाय आहेत. जे तुम्हाला नफा तर मिळवून देतीलच पण शासनाची मदत ही तुम्हाला व्यवसायासाठी घेता येणार आहे. सर्व व्यवसायांपैकी एक आणि उत्तम नफा मिळवणारा व्यवसाय (Business Idea) म्हणजे साबणाचे उत्पादन. (Soap Manufacturing). या व्यवसायात तुम्हाला हाताने काहीच करायचे नाही. उलट मशीनच्या माध्यमातून साबण तयार करायचे आहेत. साबण तयार केल्यानंतर त्याच्या मार्केटिंगसाठी ते बाजारात पाठवले जातात. दरम्यान काही लोक हँन्ड मेड साबणाची ही विक्री करतात. या व्यवसायातील महत्वपूर्ण बाब अशी की, लहान स्तरावर या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करु शकता. खरंतर मागणी असल्याकारणास्तव हा व्यवसाय यशस्वीरित्या सुरु राहतो.
भारतात साबणाच्या विविध कॅटेगरी आहेत. साबणाच्या वापराच्या आधारावर तो विविध कॅटेगरीत विभागला जातो. जसे की, कपडे धुण्याचा साबण, भांड्यांचा साबण असो किंवा अंगाला लावण्याचा साबण. या साबणांची वेळोवेळी मागणी वाढत असते आणि याचा बाजार पाहता तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतील साबण उत्पादन करु शकता.
हे देखील वाचा- रेल्वेचे तत्काळ तिकिट अगदी सहज आणि जलद पद्धतीने बुकिंग कसे कराल? जाणून घ्या अधिक
केंद्र सरकारच्या मुद्रा स्कीम प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार तुम्ही यामध्ये १ वर्षात जवळजवळ ४ लाख किलोचे उत्पादन करु शकता. याची एकूण रक्कम ४७ लाख रुपये होईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्व प्रकारचा खर्च आणि अन्य देयकानंतर ६ लाख रुपये म्हणजेच प्रति महिन्याला ५० हजारांचा नफा होणार आहे.(Business Idea)
साबण तयार करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ ७० वर्ग फूटाची जागा लागणार आहे. यामध्ये ५०० वर्ग फीट झाकलेला आणि अन्य भाग न झाकलेला असेल. त्याचसोबत यामध्ये सर्व प्रकारच्या मशीनसह ८ प्रकारची उपकरणे ही आवश्यक आहेत. प्रोजेक्ट रिपोर्ट्नुसार, या मशीनींचा एकूण खर्च १ लाख रुपयांपर्यंत होईल. साबणाच्या व्यवसायात यश मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची शहर ते खेड्यापाड्यापर्यंत असणारी मागणी. त्यामुळे तुम्ही अत्यंत कमी पैशांच्या भांडवलात तुम्ही साबणाची एखादी फॅक्ट्री सुरु करुन त्याचा व्यवसाय करु शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत ८० टक्के कर्ज घेऊ शकता.
साबण तयार करण्यासाठी लागणाऱ्या युनिटसाठी तुम्हाला एकूण १५,३०,००० रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र हा व्यवसाय करणे सोप्पे असून यामध्ये युनिटची जागा, मशीन्स आणि तीन महिन्याच्या भांडवलाचा समावेश आहे. या १५.३० लाखांपैकी तुम्हाला केवळ ३.८२ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. उर्वरित रक्कम तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाच्या आधारावर मिळू शकते.