Home » Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये आता बुरखा बंदी !

Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये आता बुरखा बंदी !

by Team Gajawaja
0 comment
Switzerland
Share

नवीन वर्षाची (New Year) सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून युरोपमधील एका देशात नवा कायदा लागू झाला आहे. हा देश म्हणजे, स्वित्झर्लंड आहे. या स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी 2025 पासून एक नवा कायदा लागू झाला, यामुळे युरोपमध्ये आनंद व्यक्त होत असला तरी मुस्लिम बहुल देशात नाराजी पसरली आहे. हा कायदा म्हणजे, स्वित्झर्लंडमधील मुस्लिम महिलांना आता सार्वजनिक जागी बुरखा किंवा निकाब घालता येणार नाही. फक्त घालता येणार नाही, इथपर्यंतच हा कायदा थांबत नाही, तर याचे उल्लंघन करणा-यांना दंडाचीही तरतूदही आहे. स्वित्झर्लंडसह अनेक युरोपमधील देशांमध्ये बुरखा बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. काही देशात बुरखा घालण्यावरुन वादही होते. युरोपमध्ये राहणा-या काही मुस्लिमांनी इस्लामी कायदा लागू करावा अशी मागणी केली आहे, यावरुन युरोपमधील देशांमध्ये धुसपूस वाढली आहे. (Switzerland)

त्यातूनच बुरखा घालण्यावर बंदी आणावी अशी मागणी होत आहे. त्यात स्वित्झर्लंड या देशांनं आघाडी घेतली आहे. हा बुरखा बंदी कायदा पहिल्यापासून विवादास्पद ठरला. आत्ताही त्याला स्वित्झर्लंडमध्ये चांगलाच विरोध होत आहे. मात्र 2021 मध्ये सार्वमतामध्ये या कायद्याला मंजूरी देण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालणाऱ्या या कायद्याला मुस्लिम संघटनांनी प्रचंड विरोध केला. मुस्लिम बहुल देशांनीही स्वित्झर्लंडमध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे, अशी ओरड सुरु झाली. मात्र आमच्या देशात राहयचे असेल तर आमचे नियम पाळावे लागतील, अशी रोखठोक भूमिका स्वित्झर्लंडनं घेतली आहे. त्यामुळेच 1 जानेवारीपासून आता स्वित्झर्लंडच्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बुरखा घातलेल्या महिला दिसणार नाहीत. (International News)

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा बंदी लागू झाल्यावर आता अनेक प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत. स्वित्झर्लंडमधील हा कायदा 2021 मध्ये झालेल्या सार्वमताचा परिणाम आहे. यामध्ये स्विस मतदारांनी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याचे समर्थन केले. जवळपास 51.2% स्विस मतदारांनी या बुरखा बंदीच्या बाजुनं मतदान केले. तेव्हापासूनच ही बंदी वादात ठरली आहे. स्वित्झर्लंडपूर्वी हे पाऊल बेल्जियम आणि फ्रान्ससारख्या इतर युरोपीय देशांमध्येही उचलण्यात आले आहे. याशिवाय अन्य काही देश स्वित्झर्लंडच्या कायद्याला आपल्या देशात लागू करण्यासाठीही उत्सुक आहेत. याला कारण म्हणजे, या देशात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना. याशिवाय कट्टर धार्मिक वादही या भागात वाढू लागला आहे. स्वित्झर्लंडला प्रामुख्यानं युरोपमधील उच्चभ्रूंचा देश आहे. या देशात अनेक गर्भश्रीमंत युरोपवासी आपलं दुसरं घर म्हणून बघतात. (Switzerland)

शांत आणि संपन्न असलेल्या या स्वित्झर्लंडमध्ये आता मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या वाढू लागल्यानं येथेही इस्लाम कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळेच स्वित्झर्लंडमधील मुळ वासियांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला होता. त्यातूनच बुरखा बंदी संदर्भात कायदा आणावा अशी मागणी होत होती. आता या कायदा लागू कऱण्यात आला असला तरी याला काही संस्थांनी विरोध केला आहे. पण या सर्व विरोधाला स्वित्झर्लंड सरकारनं उत्तर देत सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचा युक्तिवाद स्विस केला आहे. संपूर्ण चेहरा झाकणारे कपडे परिधान केल्याने आपली ओळख लपवणे सोपे होते आणि गुन्हेगारी वाढू शकते, असे स्वित्झर्लंड सरकारचे स्पष्ट मत आहे. याशिवाय, या बंदीमुळे महिलांना स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही स्वित्झर्लंड सरकारने व्यक्त केला आहे. (International News)

====================

हे देखील वाचा : 

अफगाणिस्तानमध्ये महिलांना बोलण्यास सुद्धा बंदी !

Lovely Khatoon : बांगलादेशी लवली भारतात झाली सरपंच !

====================

याआधी फ्रान्समध्ये 2010 मध्ये त्यांच्या घटनेमध्ये बुरखा बंदी संदर्भात सुधारणा केली. अधिकृतपणे बुरखा बंदी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला. यावेळीही अनेक धार्मिक आणि मानवाधिकारी संघटनांनी विरोध केला. आता स्वित्झर्लंडमध्येही अशीच बंदी आहे. या कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला सुमारे 1000 स्विस फ्रँक म्हणजे सुमारे 97 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. आता सार्वजनिक ठिकाणी किंवा सहज उपलब्ध असलेल्या इमारतींमध्ये कोणतीही व्यक्ती तोंड, नाक किंवा डोळे झाकून ठेवू शकणार नाही. मात्र धार्मिक स्थळांवर फक्त चेहरा लपवण्याची परवानगी असणार आहे. हा कायदा लागू झाला आणि स्वित्झर्लंड सरकारवर विरोध होत असला तरी युरोपमधील अनेक देश या कायद्याचा अभ्यास करत असून या कायदा लागू करण्याचा विचार करीत आहे. (Switzerland)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.