Home » ‘या’ मंदिरात प्रसादात पेढे नव्हे, तर मिळतात ब्राउनी, बर्गर आणि सँडविच

‘या’ मंदिरात प्रसादात पेढे नव्हे, तर मिळतात ब्राउनी, बर्गर आणि सँडविच

0 comment
Share

आपल्या देशातील लोकांची देवावर नितांत श्रद्धा आहे. जेव्हा आपण देवाचा विचार करतो, तेव्हा मंदिर ही पहिली गोष्ट लक्षात येते. बहुतेक लोक पहाटेच मंदिरात जातात. ते देवाची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात. लाडू किंवा मिठाईचा प्रसाद सहसा सर्व मंदिरांमध्ये आणला जातो. मंदिरातील पुजारी हेच प्रसाद म्हणून भाविकांना देतात. (Modern Prasad)

पण आपल्या देशात एक मंदिर आहे, जिथे ब्राउनी, बर्गर आणि सँडविच प्रसाद म्हणून दिले जाते. हे अनोखे मंदिर तामिळनाडूमध्ये आहे. चेन्नईच्या पडप्पाई येथे असलेले जय दुर्गा पीठम मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराबद्दल आणि देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादबद्दल जाणून घेऊया. (Modern Prasad)

FSSAI द्वारे प्रमाणित असतो प्रसाद

चेन्नईच्या पडप्पाई येथे असलेल्या जय दुर्गा पीठम मंदिरात लोकांना ब्राउनी, बर्गर आणि सँडविच प्रसाद म्हणून दिले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मंदिरातील प्रसाद FSSAI द्वारे प्रमाणित असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या प्रसादावर एक्सपायरी डेट देखील नमूद असते. (Modern Prasad)

हे देखील वाचा: हवेत उडणारे हॉटेल, मॉल-जिमसह मिळणार ‘या’ सुविधा

मंदिराचं केलं गेलंय आधुनिकीकरण

येथे मंदिराचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. येथे व्हेंडिंग मशीनमध्ये टोकन टाकल्यानंतर लोकांना प्रसादाचा डबा मिळतो. हर्बल ऑन्कोलॉजिस्ट के. श्री श्रीधर यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. ते म्हणतात की, हा प्रसाद वाटण्याचा उद्देश असा आहे की, पवित्र भावनेने आणि पवित्र स्वयंपाकघरात बनवलेली कोणतीही वस्तू देवाला प्रसाद म्हणून अर्पण करता येते. (Modern Prasad)

दूरदूरवरून येतात लोक

मंदिरातील प्रसादाचा मेनूही आधुनिक करण्यात आला आहे. यामध्ये लाडू आणि मिठाईच्या प्रसादाची जागा बर्गर आणि सँडविचने घेतली आहे. ते म्हणाले की, या प्रसादामुळे येथे अनेक पर्यटक येतात आणि आजूबाजूच्या परिसरातही हे खूप प्रसिद्ध आहे. (Modern Prasad)

वाढदिवसाला मिळतो केकचा प्रसाद

या मंदिरात अनेक भाविक येत असले, तरी नियमित भाविकांसाठी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जे येथे सतत येतात, त्यांचे नाव आणि जन्मतारीख नोंदवली जाते. जेव्हा भक्त त्यांच्या वाढदिवशी मंदिरात जातात, तेव्हा येथे बर्थडे केकचा प्रसाद दिला जातो. (Modern Prasad)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.