Home » देशात अर्थसंकल्पाची सुरुवात कशी झाली होती?

देशात अर्थसंकल्पाची सुरुवात कशी झाली होती?

by Team Gajawaja
0 comment
Union Budget 2023
Share

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या १ फेब्रुवारीला आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून व्यवसायिक आणि जमिनदारांना खुप अपेक्षा आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, या अर्थसंकल्पाची सुरुवात कशा पद्धतीने झाली होती? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात. पण देशात जेव्हा पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला गेला तेव्हा तो व्यावसायिक आणि जमिनदारांना पटले नव्हते. तर अर्थसंकल्पापूर्वी देशात कोणत्या व्यवस्था होत्या याची कारणे सुद्धा आपण पाहूयात. (Budget)

भारतात याआधी इनकम टॅक्स सारखी व्यवस्था नव्हती. पहिल्यांदा इंग्रजांच्या काळात १८६० मध्ये इनकम टॅक्सचा कायदा आला होता. भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात करणारे जेम्स विलसन यांनी सन १८६० मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प तयार केला होता. यामध्येच इनकम टॅक्स कायद्याचा समावेश करण्यात आला होता. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतात आर्थिक शानसनाचा एक महत्वाचा निर्णय घेतला होता.

परंतु तो व्यावसायिक आणि जमिनदारांना पटला नव्हता. याचा खुप विरोध केलागेला. मात्र विलसन यांच्या या पक्षाने तर्क देत असे म्हटले की, ब्रिटिश भारतीयांना व्यापार करण्यासाठी सुरक्षित स्थिती निर्माण करुन देतात. त्यानंतर बदलत्या इनकम टॅक्सच्या रुपात शुल्क चार्ज लावणे योग्य नाही. त्यासाठी त्यांनी इनकम टॅक्स कायदा आणला.

अशी सुरुवात झाली होती पेपर करेंसीची सुविधा
देशात इनकम टॅक्स आणि अर्थसंकल्पासह पेपर करेंसीची व्यवस्था ही विलसन यांनी सुरु केली होती. खरंतर १८५७ मध्ये देशात बंडखोरी झाली. यामध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी इंग्रज सरकार इनकम टॅक्स कायदा घेऊन आले होते. तेव्हा इनकमला चार हिस्स्यांमध्ये विभागले गेले होते. प्रॉपर्टी मधून मिळालेले उत्पादन, प्रोफेशन आणि ट्रेड मधील उत्पादन, सिक्युरिटीज मधून उत्पादन आणि सॅलरी किंवा पेंशन मधून मिळालेले उत्पादन. प्रत्ये कॅटेगरीत ५०० रुपयांहून अधिक ते कमी उत्पादनावर २ टक्के आणि ५०० रुपये ते अधिक उत्पादनावर ४ टक्के टॅक्स वसूल केला जायचा. म्हणजेच ५०० रुपयांपर्यंतच्या उत्पादनावर १० रुपये आणि त्यापेक्षा अधिक उत्पादनावर २० रुपये टॅक्स द्यावा लागत होता. (Budget)

हॅट-मेकरच्या रुपात सुरुवात
विलसन यांचा जन्म १८०५ मध्ये स्कॉटलँन्ड मधील शहर Hawick मध्ये झाला होता. विलसन यांनी आपल्या करियरची सुरुवात एक हॅट-मेकरच्या रुपात केली होती. मात्र त्याचसोबत त्यांनी आपले शिक्षण ही सुरु ठेवले. खुप वर्ष त्यांनी फाइनान्स आणि इकोनॉमिक्स संदर्भात सखोल अभ्यास केला. त्यानंतर ते भारतात वायसराय लॉर्ड कॅनिंगच्या काउंसिलमध्ये फाइनान्स मेंबर झाले. ते युके ट्रेजरीच्या फायनान्स सेक्रेटरी आणि बोर्ड ऑफ ट्रेडच्या वाइस-प्रेसिडेंट होण्यासह ब्रिटिश पार्लियामेंटचे सुद्धा सदस्य होते. विलसन यांनी स्टँडर्स चार्टर्ड बँकची स्थापना केली. त्यांचसोबत प्रसिद्ध मॅगझिन ‘द इकोनॉमिस्ट’ चे संस्थापक सुद्धा होते.

हे देखील वाचा- २०२३ मध्ये येणार जागतिक मंदी, जाणून घ्या तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

आज सुद्धा लागू आहे ही व्यवस्था
विलसन २८ नोव्हेंबर १८५९ मध्ये भारतात आले होते. तेव्हा इंग्रज १८५७ च्या सैन्यात बंडखोरी झाली होती. मात्र यामध्ये इंग्रजांना खुप खर्च करावा लागला होता. या कारणास्तव सरकारची स्थिती बिघडली गेली होती. तेव्हा विलसन यांनी इनकम टॅक्स कायदा आणून इंग्रजांना मोठा दिलासा दिला होता. पण ते भारतात जास्त काळ राहू शकले नाहीत. ११ ऑगस्ट १८६० रोजी अतिारामुळे त्यांचा मृत्यू झाला. परंतु भारतात अशी एक व्यवस्था (अर्थसंकल्प) दिला जो आज ही सुरु आहे. प्रत्येक वर्षी देशासाठी एक अर्थसंकल्प तयार केला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.